Agriculture news in marathi Crops damaged by rains for second day in a row | Page 2 ||| Agrowon

सलग दुसऱ्या दिवशी पावसाने पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 जानेवारी 2021

जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ८) सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला आहे. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, आंबा या नगदी पिकांसह रब्बीच्या ज्वारी, बाजरी आणि भाजीपाला पिकांचा समावेश आहे.  

पुणे : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ८) सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला आहे. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, आंबा या नगदी पिकांसह रब्बीच्या ज्वारी, बाजरी आणि भाजीपाला पिकांचा समावेश आहे. काढणीसाठी तयार असलेल्या द्राक्षबागांना पावसाच्या फटक्यामुळे नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. मोहोरात आणि फळधारणेच्या अवस्थेत असलेल्या आंब्याला मोठा फटका बसला आहे. उत्तर पुणे जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. तुलनेत बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यांता पाऊस कमी झाला आहे.

उत्तर पुणे जिल्‍ह्यात जुन्नर खेड, आंबेगाव, शिरुर तालुक्याला गुरुवारी (ता. ७) सायंकाळी वादळी पाऊस झाला. या पावसाने नारायणगाव, ओतूर, आळेफाटा परिसरातील पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा पिकामध्ये पाणी साठल्यामुळे सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर उगवलेल्या कांद्यावर मावा, भुरी, करपा या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची धोका निर्माण झाला आहे. गव्हावर मावा, तुडतुडा, तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असून, पावसाचे पाणी शेतात साठल्यामुळे गहू व इतर सर्वच पिकांचे ही थोडे कमी अधिक प्रमाणात नुकसान होणार आहे.

सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात गुरुवारी (ता. ७) रात्री सुमारे दोन तास मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर रात्रभर तुरळक पाऊस पडल्यानंतर पुन्हा शुक्रवारी पहाटे पेठ परिसरात अर्धा तास जोरदार पाऊस पडला. या जोरदार झालेल्या पावसाने बहुतांशी शेतात उभे असलेले ज्वारीचे पीक भुईसपाट झाले आहे. उत्पादनात घट येणार असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने पीक भुईसपाट झाले आहे. जनावरांच्या खायला वापरला जाणारा कडबा पावसाने भिजणार आहे.

शुक्रवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणांच्या पाणलोटनिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये    

 • धरण    झालेला पाऊस
 • येडगाव    ४२
 • वडज    ५
 • डिंभे    ६
 • वडिवळे    ६
 • टेमघर    ५
 • खडकवासला    १
 • भाटघर    २
 • वीर     २
 • उजनी    २
 • चिल्हेवाडी    २

इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...