agriculture news in marathi, crops damge but paisewari increase, amravati, maharashtra | Agrowon

तीन जिल्ह्यांत पावसाअभावी पिके करपली; पैसेवारी मात्र बहरली
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

बुलडाणा, अकोला, वर्धा, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांचा मी गेल्या तीन दिवसांत दौरा केला आहे. या वेळी शेतकऱ्यांशी चर्चा करताना प्रत्येकाने सोयाबीनचे एकरी अवघे साडेतीन क्‍विंटल उत्पादन झाल्याचे सांगितले. परंतु प्रशासनाला हाताशी धरून सरकारकडून खोटा अहवाल तयार केला जात आहे. विमा कंपन्याचे हित जपण्यासाठी हा सारा प्रकार सुरू आहे. विमा कंपन्या, सरकारी अधिकारी, शासन यांची यात मिलीभगत आहे.
- राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना

अमरावती  ः पश्चिम विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ, अमरावती या तीन जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असतानाच खरिपाची नजरअंदाज पैसेवारी सरासरी ६६ पैसे घोषित करण्यात आल्याने शासनाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. नजरअंदाज पैसेवारी कमी जाहीर करु नका, अशा अलिखित सूचना शासनानेच अधिकाऱ्यांना दिल्याची चर्चा दबक्‍या आवाजात होऊ लागली आहे.

या वर्षीच्या खरीप हंगामात सुरवातीला पाऊस उशिरा झाल्याने मूग, उडदाला याचा फटका बसला. त्यानंतर फुले लागणे आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत पावसाने दडी मारल्याने सोयाबीनही शेतकऱ्यांच्या हातून गेले. फुलोरा अवस्था, तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेतच या पिकाला पावसाची गरज असते. अमरावती विभागात १० ऑगस्टपासून पावसाने दडी मारली. अमरावती जिल्ह्यात सरासरीच्या ७८, यवतमाळ जिल्हयात ७८ तर बुलडाणा जिल्ह्यात ७० टक्‍के इतक्‍या पावसाची नोंद झाली. अकोला व वाशीम जिल्ह्यात १०१ टक्‍के पाऊस पडल्याची नोंद आहे. विभागातील तीन जिल्ह्यांत पावसाने सरासरीदेखील गाठली नसताना शासनाच्या लेखी मात्र सारे अलबेल असल्याचे नजरअंदाज पैसेवारीवरुन सिद्ध होत आहे.

मूग, उडदात किमान ४० टक्‍के तुटीचा अंदाज जाणकार व्यक्‍त करतात. परंतु शासनाने ६६ टक्‍के पैसेवारी जाहीर करीत शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...