Agriculture news in marathi crops destroyed due to hailstorm In Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात गारपीटीमुळे पिके मातीमोल

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 एप्रिल 2020

नांदेड : जिल्ह्यातील ४० मंडळांमध्ये मंगळवारी (ता.७) सकाळ पर्यंतच्या २४ तासांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. गारपीट देखील झाली. त्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा, हळद,फळपिके, भाजीपाला पीकांचे अतोनात नुकसान झाले.

नांदेड : जिल्ह्यातील ४० मंडळांमध्ये मंगळवारी (ता.७) सकाळ पर्यंतच्या २४ तासांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. गारपीट देखील झाली. त्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा, हळद,फळपिके, भाजीपाला पीकांचे अतोनात नुकसान झाले. एकीकडे ‘लॅाकडाऊन’मुळे शेतमाल विक्रीसाठी अडचणी येत आहेत. त्यात नेमकी सुगीमध्येच गारपीट झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. 

जिल्ह्यातील कंधार, मुखेड, देगलूर, नांदेड, मुदखेड, अर्धापूर, हदगाव, किनवट, हिमायतनगर, भोकर, उमरी, लोहा आदी तालुक्यातील ४० मंडळांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. कंधार, मुखेड तालुक्यातील अनेक मंडळांत जोरदार पाऊस झाला.

कंधार तालुक्यातील बाचोटी, मानसपूरी, फुलवळ,अंबुलगा, वाखरड,पानशेवडी, बोरी बु.,चिंचोली आदी गावांत वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. त्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा आदी रब्बी पिके, काढणी केलेली व शिजवलेली हळद, आंबा, संत्रा, टरबूज, खरबूज आदी फळपिके, टोमॅटो, वांगी, कांदे आदी भाजीपाला पिके, उन्हाळी भूईमूग, उन्हाळी ज्वारी, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. 

उशीरा पेरणी केलेली ज्वारी, गहू आदी पिके अजून उभी आहेत. तर, अनेक काही या पिकांची खळी सुरु आहेत. हळद पिकाची काढणी, तसेच शिजवणीची कामे सुरु आहेत. गारपीटीचा तडाखा बसल्यामुळे सर्वच शेतमालाची प्रत खराब झाली. नुकसानीचे पंचनामे करुन तत्काळ मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

मंडळनिहाय पाऊस (मि.मी) 

 कंधार ८, कुरुला ४, उस्माननगर ६, बारुळ ६, पेठवडज २७, फुलवळ २२, किनी ४, मातुल ५, कलंबर ५, देगलूर ४, खानापूर २, शहापूर ३, मरखेल २, मालेगाव ४, हानेगाव ३, किनवट ७, इस्लामपूर ४, जलधारा ६, शिवणी २, मुदखेड १५, बारड ५, मुगट ९, अर्धापूर १, दाभड ९, हिमायतनगर ७, सरसम ६, जवलगाव ५, मुखेड २९, जांब ३३, येवती २०, जाहूर १२, चांडोळा ४०, बाऱ्हाळी ४, सिंधी ४, हदगाव ३, पिंपरखेड ८, नांदेड शहर ९, वसरणी २, वजीराबाद २, तरोडा २. 
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...