पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीने पिके उध्वस्त

पुणे : परतीच्या पावसाने जिल्ह्यात बुधवारी (ता.१४) सायंकाळी व गुरूवारी दिवसभर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. जिल्ह्यात जवळपास सर्वच भागात अतिवृष्टी झाली.
Crops destroyed by heavy rains in Pune district
Crops destroyed by heavy rains in Pune district

पुणे : परतीच्या पावसाने जिल्ह्यात बुधवारी (ता.१४) सायंकाळी व गुरूवारी दिवसभर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. जिल्ह्यात जवळपास सर्वच भागात अतिवृष्टी झाली.

या पावसामुळे नाझरे, वीर, डिंभे, वडज, विसापूर,  घोड, चासकमान, आंध्रा, कासारसाई, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, भाटघर याधरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. तर, पावसामुळे अनेक ठिकाणी शेतांना नद्यांचे स्वरूप आले. कांदा, भाजीपाला, सोयाबीन, बाजरी, भात पिके मोठ्या प्रमाणात उध्वस्त झाली. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.  

जिल्ह्यात बुधवारी पावसाने दिवसभर अधूनमधून जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडून शेतीकामे खोळंबली होती. सध्या सोयाबीन, कापूस पिकांची काढणी सुरू आहे. तर, भात पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. सायंकाळी पाच वाजेनंतर पावसाचा जोर वाढल्याने भात पिकांना सर्वाधिक फटका बसला. कांदा, भाजीपाला, सोयाबीन पिके सडली. ऊस, मका आडवी झाली. फळबागांमध्ये पाण्याचे पाट वाहत असल्याचे चित्र होते.

हवेली, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, जुन्नर, आंबेगाव, खेड, पुरंदर, इंदापूर, बारामती, दौंड तालुक्यात पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिके उध्वस्त झाल्याचे चित्र आहे. याशिवाय द्राक्षे व डाळिंब पिकांचेही मोठे नुकसान झाले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह विविध भागात पावसाचा जोर अधिक होता. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आत्तापर्यतचा सर्वाधिक १४० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. 

खडकवासला ८३, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १३७ मिलिमीटर, नाझरे १०६, टेमघर ११३, येडगाव १०५, डिंभे १०५, कासारसाई १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने नद्या दुथडी भरून वाहत होत्या. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाल्याची स्थिती होती.

१०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची ठिकाणे ः

केशवनगर १२१.८, खडकवासला १३९.०, थेऊर १६१.८, उरूळी कांचन १६०.८, खेड १०२.०, हडपसर १११.८, वाघोली १५८.८, वेळू १११.८, आळंदी १४१.८, रांजणगाव १००.५, बारामती १३५.३, माळेगाव १०२.५, वडगाव १०८.३, लोणी ११७.८, उंडवडी १३१.८, भिगवण १४८.६, इंदापूर १४८.६, लोणी १४८.६, बावडा १२५.३, काटी १०७.०, निमगाव १४८.६, अंथुर्णी २१३.५, सणसर १४८.६, देऊळगाव १२०.८, पाटस १०१.०, राहू १००, रावणगाव १५०., दौंड ११९.३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com