agriculture news in marathi, crops due to heavy rain, satara, maharashtra | Agrowon

अतिपावसाने साताऱ्यातील सतरा हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

सातारा  : अतिपावसामुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाने हाती घेतले असून नुकसानीचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. शासनाने जाहीर केलेला मदतीचा आकडा कोटीत असला तरी जिल्हास्तरावर अद्याप नुकसान आणि त्यापोटी शेतकऱ्यांना किती मदत मिळणार हे निश्‍चित झालेले नाही. ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ५१ हजार ३५४ शेतकऱ्यांचे १६ हजार ९७१ हेक्‍टरवरील पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यातील १३९४ गावे बाधित असून सर्वाधिक नुकसान फलटण तालुक्‍यात ३९७० हेक्‍टरचे झाले आहे. 

सातारा  : अतिपावसामुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाने हाती घेतले असून नुकसानीचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. शासनाने जाहीर केलेला मदतीचा आकडा कोटीत असला तरी जिल्हास्तरावर अद्याप नुकसान आणि त्यापोटी शेतकऱ्यांना किती मदत मिळणार हे निश्‍चित झालेले नाही. ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ५१ हजार ३५४ शेतकऱ्यांचे १६ हजार ९७१ हेक्‍टरवरील पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यातील १३९४ गावे बाधित असून सर्वाधिक नुकसान फलटण तालुक्‍यात ३९७० हेक्‍टरचे झाले आहे. 

जिल्ह्यात पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे उभ्या व काढून ठेवलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे सोयाबीन काळे पडले आहे. काढणीस आलेला भात झडल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. तसेच दुष्काळग्रस्त फलटण व माण तालुक्‍यांत द्राक्ष व डाळिंब बागांनाही तडाखा बसला आहे. द्राक्षांचे घड फुटले असून डाळिंबाची फुलगळती झाली आहे. तसेच पाणी तुंबून राहिल्याने आले व हळद पिकात कंदकुज वाढू लागली आहे. अतिवृष्टीतून शेतकरी सावरत असतानाच वादळी पावसाने पुन्हा झोडपल्याने खरीप हंगामातील काढणीस आलेल्या व काढणी झालेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे ५१ हजार ३५४ शेतकऱ्यांचे १६ हजार ९७१ हेक्‍टरवरील पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या नजर अंदाज पत्रकानुसार ही आकडेवारी असली तरी प्रत्यक्षात नुकसानीचे क्षेत्र वाढणार आहे. 

जिल्ह्यात खरिपात तीन लाख चार हजार ८१० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये कऱ्हाड, पाटण व सातारा तालुक्यांच्या प्रमुख नद्यांना पूर आल्याने शेतात पाणी घुसून उसासह खरीप पिके पाण्याखाली गेली. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतायत तोपर्यंत मॉन्सूनोत्तर व वादळी पावसाने थैमान घातले. यामध्ये सोयाबीन, बाजरी, भात, भुईमूग, आले, हळद, मका या प्रमुख पिकांसह कडधान्याचे नुकसान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान फलटण तालुक्‍यात झाले असून येथील तीन हजार ९७० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

मुख्यमंत्र्यांनी शेतीच्या नुकसानीपोटी मदत म्हणून दहा हजार कोटींची मदत जाहीर केली असली तरी ही मदत देताना कोणते निकष असणार हे कोणालाच माहीत नाही. कोणत्या पिकाला किती भरपाई मिळेल, याचा अंदाज देखील नाही. २०१५मधील भरपाई अध्यादेशानुसार जिरायती पिकांना हेक्‍टरी सहा हजार ८०० रुपये तर बागायती पिकांना हेक्‍टरी १३ हजार पाचशे रुपये भरपाई दिली जात होती. सध्याचे नुकसानीचे चित्र गंभीर असून वाढलेली महागाई आणि वाढलेले दर लक्षात घेता ही मदत तोकडी ठरणार आहे. बाजारभाव व भांडवली खर्च हा ग्राह्य धरून शेतकऱ्यांना मदतीचे निकष ठरविणे गरजेचे आहे. 
 
तालुकानिहाय नुकसानग्रस्त क्षेत्र (हेक्टर)  : सातारा : २२१७, कोरेगाव ८८६.५५, खटाव २२५२.६, महाबळेश्‍वर १०८.६, वाई १०.९३, जावली ६१.५, खंडाळा ३३१.६, कऱ्हाड ११६०, पाटण २७८०.७, फलटण ३९७०.१, माण २१०९. 
 
अधीक्षकांविनाच कृषी विभाग
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी अद्याप नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. तीन महिन्यांपासून हे पद रिक्त असून सध्या श्री. झेंडे यांच्याकडे प्रभारी कार्यभार आहे. त्यामुळे सध्या अतिवृष्टीने नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त असताना कृषी विभागात मात्र म्होरक्याविनाच काम सुरू आहे. 


इतर ताज्या घडामोडी
मधमाशीला हानिकारक कीटकनाशके टाळा : आर....‌अंबाजोगाई : ‘‘शेतकऱ्यांनी मधमाश्यांच्या जाती...
परभणी जिल्ह्यात साडेसहा हजारांवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...
सोलापूर : कांदा लिलाव बंद पाडण्याचा डाव...सोलापूर : सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या काही...
कोल्हापूर : शेती, घरांच्या नुकसानीसाठी...कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि...
विज्ञान, अध्यात्माच्या ताकदीने देश विश्...कुंडल, जि. सांगली :  ज्ञान, विज्ञान, संगणक व...
संत्र्याचे विपणनाचे जाळे विणण्याची गरज...अमरावती  ः सांघिक तत्त्वावर संत्रा...
फडणवीसांविरोधात पक्षांतर्गत नाराजांची...मुंबई ः भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की...
कृषी पदवीधर तरूणांनी समाजासाठी काम...नगर : ‘‘देशात प्रामाणिकपणे काम केलेले अनेक शेतकरी...
फडणवीस सरकारची ३१० कोटींची हमी रद्द...मुंबई ः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र...
आचारसंहितेपूर्वीच्या निर्णयांची...मुंबई ः विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू...
पुणे जिल्ह्यात भातकाढणी अंतिम टप्प्यातपुणे ः पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी...
पश्‍चिम महाराष्ट्रात...पुणे ः पश्‍चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि...
सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना...कऱ्हाड, जि. सातारा ः राजकीय पक्षांचा आदर्श घेऊन...
नगर जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामावर सात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये आता रोजगार हमी योजनेच्या...
चंद्रशेखर भडसावळे यांना मार्टचा ‘फादर...खडकवासला, जि. पुणे : कृषी पर्यटन संकल्पनेचे...
देशी कापूस संशोधन केंद्राचा उद्या...परभणी: वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या...
गांडूळखत अर्क निर्मितीसेंद्रिय शेतीमध्ये गांडुळे व गाडूळखताचे मोठे...
राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दरअकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची...
मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरचमुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१...
केंद्राने कांदा साठवणूक मर्यादा ५०...नाशिक : गेल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस...