सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका

सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सलग झालेल्या पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १० हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.
Crops hit 10,000 hectares in Solapur district
Crops hit 10,000 hectares in Solapur district

सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सलग झालेल्या पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १० हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. तर, १५० हून अधिक जनावरे या पावसाची बळी ठरली आहेत. प्रामुख्याने पंढरपूर, माळशिरस, सांगोला, दक्षिण सोलापूर, बार्शी, मंगळवेढा या तालुक्‍यांना त्याची सर्वाधिक झळ बसली. पावसाचे पाणी घरात शिरल्याने लोकांचे स्थलांतर करणे, पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ते बंद करण्याची वेळही या पावसाने आणली. आता या भागातील नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने मदत देण्याची मागणी होते आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. पण, गेल्या आठवड्यात सलग तीन-चार दिवसांपासून रोजच पावसाने हजेरी लावली. त्याचा मोठा फटका जिल्ह्याला बसला. आधीच उजनी धरणामध्ये पाणी सोडल्याने पंढरपूर, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील काही गावांना त्याचा फटका बसला होता. त्यात पुन्हा पाऊस झाल्याने मोठी अडचण झाली. 

मंगळवेढा तालुक्‍यातील सिद्धेवाडी येथील माण नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने पंढरपूर, पुणे व अहमदनगर हे रस्ते बंद करण्यात आले आहेत. पंढरपूर तालुक्‍यातील भंडीशेगाव पूल पाण्याखाली गेल्याने पुणे व अकलूज रस्ता बंद आहे. उपरी येथील पूल पाण्याखाली गेल्याने सातारा व सोलापूर-सातारा हे दोन रस्ते बंद आहेत. माळशिरस तालुक्‍यातील सांगोला-अकलूज, सांगोला-पुणे व अकलूज-इंदापूर हे तीन रस्ते बंद करण्यात आले आहेत. सलगपणे झालेल्या जोरदार पावसामुळे महावितरणची अनेक उपकेंद्रेही बंद पडली. 

पंढरपुरातील पळशी, उपरी, कासेगाव भागात पावसाने अनेक भागातील द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागात पाणी साठले. सांगोला तालुक्‍यातील महूद, वाकीशिवणे, गार्डीसह २० गावात पावसाने मोठा कहर केला. या भागात १८३ हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस, डाळिंबाचे नुकसान झाले. माळशिरसमध्ये पिलीव, मळोली, वेळापूर, अकलूजसह १६ गावात पावसाने चांगलाच जोर लावला. या भागातील ८१० हेक्‍टररील ऊसासह अन्य पिकांचे नुकसान झाले. पंढरपूर तालुक्‍यातील १८ गावांना पावसाचा फटका बसला. साडेपाच हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. तसेच २७९ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. तर, ८० जनावरांचा मृत्यू झाला. त्याशिवाय सात पाझर तलावांचे नुकसानही झाले.  ऊस, कांद्यालाही दणका 

बार्शी तालुक्‍यात ३०१ हेक्‍टरवरील पिकांना फटका बसला आहे. मंगळवेढा तालुक्‍यातील १७ गावांतील ३५० हेक्‍टर पिकांचे नुकसान झाले आहे. तर, दक्षिण सोलापुरातील ३५ गावातील पाच हजार हेक्‍टरवरील ऊस, कांद्यासह अन्य पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  दिडशे जनावरे दगावली 

जिल्ह्यात शंभराहून अधिक गावांना पावसाचा फटका बसला. ऊस, डाळिंब, कांदा भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. १५० हून अधिक जनावरे दगावली. ५० हून अधिक पाझर तलावांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील प्रमुख १० मार्गावरील वाहतूक बंद पडली. ५५० लोकांचे स्थलांतर करावे लागले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com