नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पिकांना तडाखा

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यात प्रामुख्याने मालेगाव, येवला, चांदवड, नांदगाव या तालुक्यांमध्ये बाजरी, मका, सोयाबीन, कापूस यासह भाजीपाला पिकांना चांगलाच तडाखा बसला आहे.
 Crops hit by heavy rains in Nashik district
Crops hit by heavy rains in Nashik district

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यात प्रामुख्याने मालेगाव, येवला, चांदवड, नांदगाव या तालुक्यांमध्ये बाजरी, मका, सोयाबीन, कापूस यासह भाजीपाला पिकांना चांगलाच तडाखा बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके मातीमोल झाली आहेत. 

जिल्ह्यात मृग नक्षत्रात पेरण्या झालेल्या बाजरीचे पीक सोंगणीसाठी आले आहे. मात्र सततच्या वादळ वाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे शेतात ओल आहे. त्यामुळे सोंगणी करताना अडचणी येत आहेत. त्यातच जोरदार पावसामुळे बाजरी भुईसपाट झाली आहे. जिल्ह्यात चालू वर्षी मक्याचे लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र आता मका कणसे भरण्याच्या अवस्थेत असताना हेही पीक आडवे झाले आहे. 

येवला तालुक्यातील दक्षिण व पश्चिम भागातील बदापूर, निमगाव, भिंगारे महालखेडा, तर पश्चिम भागात मुखेड, मानोरी, सत्यगावात जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. यात तालुक्यातील टोमॅटो, मका, बाजरी पिकांना या पावसाचा जोरदार तडाखा बसला. यासह उभा असलेला ऊस भुईसपाट झाला. तर, काही हस्त बहारातील काढणीला आलेल्या बागांमध्ये फळगळ झाली. 

चांदवड तालुक्याच्या पूर्व भागातही रायपूर, वागदरर्डी, वडगाव पंगू, शिंगवे, पिंपळगाव, कातरवाडी, निंबाळे या परिसरात पावसाचा जोर होता. त्यामुळे येथेही बाजरी, मका ही उभी पिके आडवी झाली. तर, लेट खरीप व उन्हाळ कांदा रोपे खराब झाली आहेत. काही ठिकाणी कांदा रोपे वाहून गेली. 

मंडळनिहाय पाऊस (मिमी)

येवला २०
पाटोदा ११
सावरगाव २९
जळगाव नेऊर  ४०
मालेगांव ४२
कळवाडी १९
निमगाव २६ 
दुगाव २४
दीघवद  २३.२
चांदोरी १८
सायखेडा १६
रानवड १७
सटाणा १२
ब्राह्मणगाव २२ 
इगतपुरी ४०
मनमाड ३१
हिसवळ १८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com