नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात गारपीटीमुळे हळदीसह पिकांचे नुकसान

शिजवून वाळवत ठेवलेली हळद पावसात भिजली. त्यामुळे खूप नुकसान झाले. हळद परत वाळवावी लागेल. - ज्ञानेश्वर माटे, शेतकरी,अर्धापूर, जि. नांदेड. वादळी वारे, गारपीटीमुळे केळीच्या पाने फाटली. हळद भिजल्याने हानी झाली. - सदाशिव गवळी, शेतकरी,कुरुंदा, ता. वसमत, जि. हिंगोली.
Crops including turmeric damaged due to hail in Nanded, Parbhani, Hingoli districts
Crops including turmeric damaged due to hail in Nanded, Parbhani, Hingoli districts

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत मंगळवारी (ता.२८) दुपारी दोन ते चारच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पाऊस झाला. यावेळी झालेल्या गारपीटीमुळे शिजवून वाळवत ठेवलेली हळद, केळी, भाजीपाला, फळपीकांचे मोठे नुकसान झाले. 

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात मंगळवारी दुपारी दोन वाजेनंतर वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अर्धापूर मंडळात १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव, कुरुंदवाडी, भेंडेगाव आदी गावांत वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली. 

परभणी जिल्ह्यातील पूर्णा, परभणी तालुक्यातील अनेक गावांत हलका पाऊस झाला. सध्या या तीन जिल्ह्यात हळद शिजविणे, वाळवणे, पॉलिसिंगची कामे सुरु आहेत. पावसामुळे हळद झाकून ठेवताना शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. वादळामुळे केळीची पाने फाटून झिरमाळ्या झाल्या. आंबा तसेच अन्य फळपिके, भाजीपाला पिकांनाही गारपीटीचा तडाखा बसला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com