खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटात

जळगाव ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून अपवाद वगळता पाऊस झालेला नाही. कडक ऊन सकाळपासून तापत आहे. यामुळे हलक्या, मुरमाड जमिनीतील पिकांची अवस्था बिकट आहे.
Crops in light soils in Khandesh in crisis
Crops in light soils in Khandesh in crisis

जळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून अपवाद वगळता पाऊस झालेला नाही. कडक ऊन सकाळपासून तापत आहे. यामुळे हलक्या, मुरमाड जमिनीतील पिकांची अवस्था बिकट आहे. पावसासाठी शेतकरीराजा आळवणी करू लागला आहे.

जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या सुमारे ५१ टक्के, धुळ्यात ५३, तर नंदुरबारात ४५ टक्के पाऊस झाला आहे. पाऊस आला, पण, लागलीच कडक ऊन पडत होते. वातावरणात आर्द्रता होती, परंतु, प्रचंड उकाडा व उष्णता, यामुळे जमिनीतील ओलावा लागलीच नाहिसा झाला. जळगाव जिल्ह्यात जळगाव, पारोळा, अमळनेर, बोदवड, यावल, चोपडा, नंदुरबारमधील नवापूर, नंदुरबार आदी भागात हलक्या जमिनीतील उडीद, मूग, कापूस, मका, ज्वारी, बाजरी या पिकांना पावसाची नितांत गरज आहे. 

पाऊस नसल्याने ज्यांच्याकडे कृत्रिम जलसाठे आहेत, त्या शेतकऱ्यांनी सिंचनाची कार्यवाही सुरू केली आहे. तुषार सिंचन व पाट पद्धतीने सिंचन केले जात आहे. यासाठी रात्रंदिवस शेतात ठाण माडून शेतकरी कामे उरकून घेत आहेत. दिवसा सकाळी नऊ वाजेपासून ऊन तापते. पावसाचा हा ताण उडीद, मूग या पिकांचे उत्पादन घटण्यास कारणीभूत ठरू शकतो, असा अंदाज आहे.

पिकांमध्ये फुलगळ होत आहे. शेंगा लागल्या आहेत. परंतु, त्यात दाणे भरण्याची क्रिया मंदावली आहे. तसेच केळी, पूर्वहंगामी कापूस पिकातही सिंचन सुरू करावे लागले आहे. खते कोरडवाहू पिकांमध्ये ज्यांनी पावसाच्या अपेक्षेने टाकली, त्यांचे नुकसान झाले आहे. 

पावसाची प्रतीक्षा आहे. पिके जगविण्यापुरता पाऊस झाला आहे. चांगला पाऊस यंदा झालाच नाही. पावसाची टक्केवारी अधिक दिसत असली तरी हलक्या, मुरमाड जमिनीत पिके वाया गेल्यात जमा आहेत. याबाबत प्राथमिक सर्वेक्षण झाले पाहिजे. - अनिल पाटील, शेतकरी, जळगाव   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com