मराठवाड्यातील पिके संकटात

सतरा दिवसांनंतर मंगळवारी (ता.३१) दुपारी पंधरा मिनीट पाऊस पडला, पण तो पुरेसा नाही. सतरा दिवसाआधी पडलेलाही जेमतेमच होता. आता पडलेल्या पावसानं पीक चार दोन दिवस टिकतील पणं पाउस यायलाच हवा नायं त पिकांवरचं संकट टळणार नाय. - चंद्रभान सोळंके, नागापूर, ता. परळी, जि. बीड.
बीड : नागापूर (ता. परळी) येथील चंद्रभान सोळंके यांच्या शेतातील सोयाबीनच्या पिकाने दुपारच्या वेळी ऊन धरून माना टाकायला सुरवात केली आहे.
बीड : नागापूर (ता. परळी) येथील चंद्रभान सोळंके यांच्या शेतातील सोयाबीनच्या पिकाने दुपारच्या वेळी ऊन धरून माना टाकायला सुरवात केली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात जून व जुलै या दोन महिन्यांत कमी पाऊस झाला. पडलेल्या अल्प पावसावर पिके तग धरून होती; परंतु सर्वदूर आठवडा ते पंधरवड्याच्या खंडामुळे कोरडवाहू खरीप पिकांची अवस्था बिकट झाली आहे. कोरडवाहू पिकं दुपारच्या वेळी माना टाकत असून सिंचनाची सोय असलेले शेतकरी उपलब्ध पाण्यावर पिके जगविण्याची धडपड करत आहेत. मराठवाड्यात यंदा ऊस वगळता खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४६ लाख ७२ हजार २१२ हेक्‍टर निर्धारित होते. त्या तुलनेत जुलै अखेरपर्यंत मराठवाड्यात ४१ लाख ७३ हजार ५३१ हेक्‍टरवर अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८९ टक्‍के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होत. सोयाबीनची १६ लाख ८८ हजार ९०० हेक्‍टरवर तर कपाशीची १३ लाख ५३ हजार १६८ हेक्‍टरवर लागवड झाली. तसेच सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ज्वारी २४ टक्‍के, बाजरी  ३७ टक्‍के, मका ८५ टक्‍के, तूर ७५ टक्‍के, मूग ९५ टक्‍के, उडीद ८० टक्‍के, भुईमूग ५६ टक्‍के, तीळ २७ टक्‍के, कारळ १८ टक्‍के, सूर्यफुलाची २७ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली.  आाता खरिप पिकांवर पावसाच्या खंडाचा परिणाम जाणवत आहे. फुलात असलेल्या मुग, उडिदासह सोयाबीनला दमदार पावसाची नितांत गरज आहे. नांदेड, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण बरे राहिल्याने त्या जिल्ह्यातील पावसाची स्थिती बरी आहे. दुसरीकडे जालना, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील पिकांची खासकरून कोरडवाहू क्षेत्रातील पिकं माना टाकत असल्याची स्थिती आहे. सिंचनाची सोय असलेल्यांनी पिकांना पाणी घालने सुरू केले. तर कोरडवाहू शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्याचे चित्र आहे. १ ऑगस्टच्या सकाळपर्यंत मराठवाड्यातील औरंगाबाद, सोयगाव, परळी, गंगाखेड, पालम, माजलगाव, सोनपेठ, मुदखेड, वसमत, अर्धापूर आदी ठिकाणी २ ते १४ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. सार्वत्रिक पावसाच्या अभाव मराठवाड्यातील आजपर्यंतच्या पाऊसकाळात प्रकर्षाने जाणवला आहे.  गुलाबी बोंड अळीने काढले डोके वरं यंदा शेतातून पाणी वाहले असा पाऊस एक दोन वेळचा अपवाद वगळता झालाच नाही. त्यामुळे जमिनीत पाण्याची पुरेशी ओल झाली नाही. पावसाच्या खंडासोबतच ढगाळ वातावरणामुळे पीक तगलेली दिसतात. दुसरीकडे पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भावर मोठ्या प्रमाणात झाला. गुलाबी बोंड अळीने बहुतांश भागात डोके वर काढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे.   

सुधारीत बातमी.......पावसाचा खंड व पिक स्थिती...   (Word Count : 577   CC : 32.79  Page Baskets: Agro1  Locations: -)
मराठवाड्यातील पिके धोक्यात ----- - आठवडा ते पंधरवड्याचा सर्वदूर खंड - पिकांना जोरदार पावसाची आवश्यकता . . . . . औरंगाबाद (प्रतिनिधी) : मराठवाड्यात जून व जुलै या दोन महिन्यांत कमी पाऊस झाला. पडलेल्या अल्प पावसावर पिके तग धरून होती; परंतु सर्वदूर आठवडा ते पंधरवड्याच्या खंडामुळे कोरडवाहू खरीप पिकांची अवस्था बिकट झाली आहे. कोरडवाहू पिकं दुपारच्या वेळी माना टाकत असून सिंचनाची सोय असलेले शेतकरी उपलब्ध पाण्यावर पिके जगविण्याची धडपड करत आहेत. मराठवाड्यात यंदा ऊस वगळता खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४६ लाख ७२ हजार २१२ हेक्‍टर निर्धारित होते. त्या तुलनेत जुलै अखेरपर्यंत मराठवाड्यात ४१ लाख ७३ हजार ५३१ हेक्‍टरवर अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८९ टक्‍के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होत. सोयाबीनची १६ लाख ८८ हजार ९०० हेक्‍टरवर तर कपाशीची १३ लाख ५३ हजार १६८ हेक्‍टरवर लागवड झाली. तसेच सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ज्वारी २४ टक्‍के, बाजरी ३७ टक्‍के, मका ८५ टक्‍के, तूर ७५ टक्‍के, मूग ९५ टक्‍के, उडीद ८० टक्‍के, भुईमूग ५६ टक्‍के, तीळ २७ टक्‍के, कारळ १८ टक्‍के, सूर्यफुलाची २७ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली. आाता खरिप पिकांवर पावसाच्या खंडाचा परिणाम जाणवत आहे. फुलात असलेल्या मुग, उडिदासह सोयाबीनला दमदार पावसाची नितांत गरज आहे. नांदेड, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण बरे राहिल्याने त्या जिल्ह्यातील पावसाची स्थिती बरी आहे. दुसरीकडे जालना, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील पिकांची खासकरून कोरडवाहू क्षेत्रातील पिकं माना टाकत असल्याची स्थिती आहे. सिंचनाची सोय असलेल्यांनी पिकांना पाणी घालने सुरू केले. तर कोरडवाहू शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्याचे चित्र आहे. १ ऑगस्टच्या सकाळपर्यंत मराठवाड्यातील औरंगाबाद, सोयगाव, परळी, गंगाखेड, पालम, माजलगाव, सोनपेठ, मुदखेड, वसमत, अर्धापूर आदी ठिकाणी २ ते १४ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. सार्वत्रिक पावसाच्या अभाव मराठवाड्यातील आजपर्यंतच्या पाऊसकाळात प्रकर्षाने जाणवला आहे. ....... गुलाबी बोंड अळीने काढले डोके वरं यंदा शेतातून पाणी वाहले असा पाऊस एक दोन वेळचा अपवाद वगळता झालाच नाही. त्यामुळे जमिनीत पाण्याची पुरेशी ओल झाली नाही. पावसाच्या खंडासोबतच ढगाळ वातावरणामुळे पीक तगलेली दिसतात. दुसरीकडे पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भावर मोठ्या प्रमाणात झाला. गुलाबी बोंड अळीने बहुतांश भागात डोके वर काढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. ---- जिल्हानिहाय पडलेला पावसाचा खंड औरंगाबाद जिल्हा - ८ ते १९ जून - १ ते ५ जुलै - २४ ते ३१ जुलै जालना जिल्हा - १२ ते १८ जून - २५ ते ३० जून - १ ते ५ जुलै - २४ ते ३१ जुलै बीड जिल्हा - १२ ते १८ जून - २५ ते ३० जून - १ ते ५ जुलै - १० ते १४ जुलै - १८ ते ३१ लातूर जिल्हा - १४ ते २० जून - २५ ते ३० जून - १ ते ५ जुलै - १८ ते २२ जुलै - २४ ते ३१ जुलै उस्मानाबाद जिल्हा १२ ते २० जून २५ ते ३० जून - १ ते ५ जुलै - १८ ते ३१ जुलै नांदेड जिल्हा - १२ ते २० जून - १ ते ५ जुलै - २२ ते ३१ जुलै परभणी जिल्हा - १२ ते २० जून - १ ते ५ जुलै - २२ ते ३१ जुलै हिंगोली जिल्हा - १२ ते २० जून - १ ते ५ जुलै - २६ ते ३१ जुलै

प्रतिक्रिया

यंदा शेतातून पाणी वाव्हलं नाही. ईऱ्हीला पाणी आलं नाही. त्यामुळे पाणी देता येत नाही. दोन चार दिवसांत पाणी आलं नाही तं भुईमूग, मूग, उडीद सारं वाळून जायची येळ आली. ऊन अन्‌ वारं दहा दिवसांपासून सुचू देईना. - रमेशराव काळे, वखारी, ता. जि. जालना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com