Agriculture news in marathi Crops in Marathwada were damaged due to heavy rains | Agrowon

मराठवाड्यात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पिके खरडली

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 जुलै 2020

औरंगाबाद : मराठवाड्यात जोरदार झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी जमीन पाण्याखाली गेली, तर काही ठिकाणी पिके खरडून गेली.

औरंगाबाद : मराठवाड्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. मंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दमदार पाऊस झाला; तर, जालना, बीड, उस्मानाबाद, हिंगोली या चार जिल्ह्यांतील आठ मंडळात अतिवृष्टी झाली. जोरदार झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी जमीन पाण्याखाली गेली, तर काही ठिकाणी पिके खरडून गेली. 

जालना जिल्ह्यातील ४६ मंडळांत पावसाची हजेरी लागली. बहुतांश मंडळात दमदार पाऊस झाला, तर जालना शहर, अंबड, धनगर पिंपरी, जामखेड, रोहिलागड या पाच मंडळांत अतिवृष्टी झाली. लातूर जिल्ह्यातील २७ मंडळांत हलका पाऊस झाला. बहुतांश मंडळांकडे पावसाची पाठ राहिली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील २८ मंडळांत पाऊस झाला. पारगाव मंडळात अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यातील २९ मंडळांत, परभणी जिल्ह्यातील १९ मंडळांत, औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडळांत, तर बीड जिल्ह्यातील ४९ मंडळांत तुरळक हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदुर घाट मंडळांत अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यातील २७ मंडळांत पाऊस झाला. हिंगोली मंडळात अतिवृष्टी झाली. 

जालना जिल्हा ः तळणी २६.७५, मंठा ३०.२५, रांजणी ४८.७५, अंतरवली ५०, घनसावंगी २९, बावने २५, शेळगाव २२.७५, परतूर ४८.५०, सुखापुरी ५९.५०, वडीगोद्री३९.५०, गोंदी ३९.५०, पाचनवडगाव ४१, रामनगर २१.७५,वागृळ ६२.२५, टेंभुर्णी २९, माहोरा ३०.५०, जाफराबाद ४०.५०, राजुर २८.५०.

औरंगाबाद जिल्हा ः औरंगाबाद ३९.५०, उस्मानपुरा ३७.५०, भावसिंगपुरा ४२.२५, कांचनवाडी ३६.२५, चिकलठाणा ४३.५०, चित्ते पिंपळगाव ५२.७५, करमाड ३५, हरसुल २४, चौका २२ , आडूळ ६४.७५, पिंपळवाडी २९.२५, बालानगर ४३.५० , नांदर ३७, पैठण २८.२५, पाचोड ४५, विहामांडवा ३४.५०, वाळुज ४२.२५, सिद्धनाथ २४.५०, वैजापूर ४७.५०, खंडाळा ३५.७५, शिऊर २६.५०, बोरसर ५८.५०, लोणी २८.५० , लासुरगाव २९.२५,महालगाव२९.२५, लाडगाव ४०.५०, वेरूळ २८, सुलतानपूर २९.२५, बाजार ४६.५०, सोयगाव २५.५० सावळदबारा २७.२५. 

बीड जिल्हा ः अमळनेर २०, आष्टी २०, कडा २४.५०, दौलावडगाव २०.५०, पिंपळा ४९.५०, अंबाजोगाई २७.७५, लोखंडी ४१.२५, केज ३७.५०,युसुफ वडगाव ३८.७५, हनुमंत ४७, होळ ३९.५० 

अतिवृष्टीची मंडळे  (पाऊस मि.मी) 

जालना शहर १०२ 
अंबड ९२
धनगर पिंपरी १००.२५
जामखेड ८६.२५
रोहिलागड ९४.२५ 
नांदुर घाट ८४.५०
पारगाव ६५.७५

 


इतर बातम्या
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
नवापूर तालुक्यात भातासह कापूस, ज्वारीची...नवापूर, जि.नंदुरबार  ः नवापूर तालुक्यात...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख ...मुंबई: कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
सारंगखेडा प्रकल्पाग्रस्तांना मोबदल्याची...नंदुरबार  ः जिल्ह्यात तापी नदीवरील सारंगखेडा...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
रेल्वेस्थानकावर नागपुरी संत्रा विक्रीला...वर्धा ः नागपूर हे मध्य भारतातील महत्त्वाचे...