agriculture news in marathi, crops may damage due to lack of rain, buldhana, maharashtra | Agrowon

बुलडाण्यात पावसाअभावी पिकांना फटका बसण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
रविवार, 9 सप्टेंबर 2018

बुलडाणा   ः या खरिपात पुन्हा दुसऱ्यांदा पावसाचा मोठा खंड पडला असून याचा कालावधी वाढत चालल्याने सोयाबीन, कपाशी या प्रमुख पिकांना फटका बसण्याची शक्यता अाहे. जुलै-अाॅगस्टमध्ये पहिला अाणि अाता दुसरा खंड अाॅगस्ट-सप्टेंबर दरम्यान तयार झाला अाहे. सध्या सोयाबीन पीक शेंगा पकडणे, परिपक्व होण्याच्या स्थितीत असून सर्वत्र पावसाची नितांत गरज अाहे.

बुलडाणा   ः या खरिपात पुन्हा दुसऱ्यांदा पावसाचा मोठा खंड पडला असून याचा कालावधी वाढत चालल्याने सोयाबीन, कपाशी या प्रमुख पिकांना फटका बसण्याची शक्यता अाहे. जुलै-अाॅगस्टमध्ये पहिला अाणि अाता दुसरा खंड अाॅगस्ट-सप्टेंबर दरम्यान तयार झाला अाहे. सध्या सोयाबीन पीक शेंगा पकडणे, परिपक्व होण्याच्या स्थितीत असून सर्वत्र पावसाची नितांत गरज अाहे.

जिल्ह्यात १५ ते २२ अाॅगस्ट दरम्यान पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला अाहे. अाता हा खंड १५ दिवसांपेक्षा अधिक होत चालला अाहे. दररोज उगवणारा दिवस कोरडा जात असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली अाहे. या हंगामात वऱ्हाडातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला अाहे. जिल्ह्यात सरासरीच्या ४३१ मिमी पाऊस झाला असून त्याची टक्केवारी ६४.६६ एवढी अाहे.

पावसाळा सुरू होऊन अाता जवळपास तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला अाहे. मागील काही दिवसांत सोयाबीन, कपाशी या पिकांना दुसऱ्यांदा ताण सहन करावा लागतो अाहे. या पिकांची ही अवस्था नेमकी महत्त्वाची अाहे. सोयाबीन पीक हे शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत अाहे. या अवस्थेत पिकाला पाण्याचा ताण मारक ठरू शकतो. कोरडवाहू कपाशी वाढीच्या स्थितीत असून लवकरच फूल, पात्यांवर येणार अाहे. या काळात पावसाची गरज वाढते.

जिल्हाभर मुगाची काढणी सुरू झाली. उडदाचीही येत्या काळात काढणी सुरू होईल. पिकांची अवस्था चांगली दिसत असली तरी  पावसाच्या ताणामुळे उत्पादकता किती येईल हे कुणीही निश्चित सांगू शकत नाही.

रब्बीची अाशा शेवटच्या पावसावर
जिल्ह्यात कमी पावसामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. एकही प्रकल्प भरलेला नाही. नळगंगा प्रकल्पात १३.१० दलघमी म्हणजेच १८.९० टक्के पाणीसाठा अाहे. खडकपूर्णा या सर्वात मोठ्या प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा अाहे. रब्बी हंगाम हा सप्टेंबरमधील पावसावर अवलंबून असतो. यामहिन्यात पाऊस झाला तर रब्बी लागवडीला पोषक होऊ शकते. मुळात प्रकल्पातील पाणीसाठा अद्यापही ५० टक्क्यांच्या अात असल्याने रब्बीसाठी पाणी मिळणेही अागामी पावसावरच अवलंबून अाहे. येणाऱ्या पावसावरच रब्बीचे क्षेत्र निश्चित होईल.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात हिरवी मिरची, गाजराच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
रब्बी हंगामासाठी ‘काटेपूर्णा’चे पाणी...अकोला ः यंदा तुडुंब भरलेल्या काटेपूर्णा...
शेतीमाल वाहतूकदारांची वाहने अडवीत पोलिस...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पावसाच्या नुकसानीमुळे आधीच...
रब्बी हंगामासाठी कुळीथ, हरभरा बियाणे...रत्नागिरी ः अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे...
कर्जमाफीच्या याद्या करण्यासाठी...कोल्हापूर : पूरग्रस्त पंचनाम्यांची माहिती तातडीने...
आपत्तीचा सामना सकारात्मकतेने करा ः...नाशिक : ‘‘मुश्किलो से भाग जाना आसाँ होता है, हर...
पंचनाम्याच्या तुलनेत तीस टक्क्यांपेक्षा...रत्नागिरी ः अतिवृष्टीत रत्नागिरी जिल्ह्यातील भात...
सातारा : पावणेदोन लाख शेतकऱ्यांना...सातारा  : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे...
गडचिरोली : दुर्गंधीमुळे पोल्ट्री बंदचा...गडचिरोली ः मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरणाऱ्या...
लष्करी अळीच्या भीतीने मका लागवडी...जळगाव ः खानदेशात हरभऱ्यानंतर महत्त्वाचे मानल्या...
खानदेशात कांदा लागवडी वाढण्याचे संकेतजळगाव ः रब्बी हंगामातील कांद्याची खानदेशात यंदा...
पुणे बाजार समितीतील बेकायदा हमाली,...पुणे  ः पुणे बाजार समितीमधील डाळिंब...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’मधून सहा...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात...
तीन जिल्ह्यांत दीड हजार क्विंटल मूग...नांदेड  ः किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत...
किसान सभेच्या दणक्यानंतर; परळीतील...पुणे ः परळी (जि. बीड) तालुक्यातील खरीप २०१८ मध्ये...
परभणी जिल्ह्यात रब्बीत चार; तर उन्हाळी...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम आणि...
परभणी जिल्ह्यात रब्बीसाठी ४० हजार ९१७...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामातील...
नगर जिल्ह्यात पावसाने ९४ टक्के कापसाचे...नगर ः आक्टोबर महिन्यात पावसाने झालेल्या नुकसानीची...
कोल्हापुरात ऊस दराबाबतची बैठक फिस्कटलीकोल्हापूर  : यंदाच्या हंगामात कोणत्याही...
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त ...मुंबई  ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...