पुणे विभागातील पिके सुकू लागली

पुणे विभागातील पिके सुकू लागली
पुणे विभागातील पिके सुकू लागली

पुणे : कमी झालेल्या पावसामुळे पेरणीच्या क्षेत्रात घट झाली आहे. यंदा पुणे विभागातील नगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत सरासरी १७ लाख ८१ हजार ३५ हेक्टरपैकी अवघ्या सहा लाख ३९ हजार ७९३ हेक्टरवर पेरणी झाली. त्याची टक्केवारी ३६ आहे. सध्या पाण्याची सुविधा असलेल्या ठिकाणी पीकवाढीच्या अवस्थेत आहे. जिरायती भागात पिके सुकून गेली आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. 

रब्बी हंगामातील जिरायत ज्वारी पीक सुकून जात आहे. उत्पादनामध्ये ४० टक्क्यांपेक्षा जास्त घट येण्याची शक्यता आहे. पीक पोटऱ्याच्या अवस्थेत आहे. गहू पिकाची उगवण चांगली आहे. ते वाढीच्या व फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. हलक्या जमिनीतील हरभरा पीकही सुकू लागले आहे. भारी जमिनीतील हरभरा पिकाची अवस्था बरी आहे. मका, कांदा पीकवाढीच्या अवस्थेत आहे. लाभक्षेत्रातील व नदीकाठच्या क्षेत्रावर गहू व हरभरा ही पिके घेतली जातात. 

पुणे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील एकूण ६ लाख ६७  हजार २६९ हेक्टर क्षेत्रापैकी दोन लाख ४९ हजार ३२३ हेक्टर म्हणजेच अवघे ३६ टक्के पेरणी झाली. कापूस पिकाच्या वेचणीस सुरवात झाली आहे. तूर पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा व घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.  सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामातील तूर पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. त्या पूर्ण भरलेल्या नाहीत. तूर पिकांच्या काढणीस सुरवात झाली आहे.

रब्बी हंगामातील हलक्या जमिनीतील ज्वारी पीक सुकत आहे. ओल नसल्यामुळे पिकाची वाढ मंदावली आहे. हरभरा पीक वाढीच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी ते फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. पाण्याच्या ठिकाणी गहू पिकाची पेरणी सुरू आहे. लवकर पेरणी झालेले पीक ओंब्या लागण्याच्या अवस्थेत आहे. पाण्याअभावी ऊस लागवडीवर परिणाम झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com