Agriculture news in marathi, Crops for rabi season in Nanded district Insurance plan implemented | Agrowon

नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना लागू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 नोव्हेंबर 2021

नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजना रब्बी हंगाम सन २०२१-२२ मध्ये राबविण्यात येणार आहे. विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.

नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजना रब्बी हंगाम सन २०२१-२२ मध्ये राबविण्यात येणार आहे. विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी दीड टक्के असा मर्यादित आहे. जिल्ह्यातील गहू (बागायती), ज्वारी (जिरायती), हरभरा या पिकांसाठी ही योजना लागू आहे. 

या योजनेअंतर्गत गहू (बा.) या पिकासाठी पीकविमा संरक्षित रक्कम हेक्टरी ३८ हजार रुपये. शेतकऱ्यांनी भरावयाचा पीकविमा हप्ता हेक्टरी ५७० रुपये आहे. विमा लागू असलेले तालुके नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, नायगाव, धर्माबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर, हे हदगाव आहेत. पीकविमा ऑनलाइन करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर राहील. ज्वारी (जिरायती) या पिकांसाठी पीकविमा संरक्षित रक्कम हेक्टरी २८ हजार रुपये आहे. 

शेतकऱ्यांनी भरावयाचा पीकविमा हप्ता हेक्टरी ४२० रुपये आहे. विमा लागू असलेले तालुके नांदेड, देगलूर, नायगाव, बिलोली, मुखेड, धर्माबाद, किनवट, हदगाव हे आहेत. पीकविमा ऑनलाइन करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. हरभरा या पिकासाठी पीकविमा संरक्षित रक्कम हेक्टरी ३५ हजार रुपये आहे. हप्ता रुपये हेक्टरी ५२५ रुपये आहे. विमा लागू असलेले तालुके नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, देगलूर, नायगाव, धर्माबाद, मुखेड, किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, हदगाव, उमरी ही आहेत. अर्ज ऑनलाइन करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर राहील. 

ही योजना इफ्को टोकियो जनरल इंशुरन्स कंपनीतर्फे राबविण्यात येणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीकविमा उतरवण्याची अंतिम तारीख ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर आहे. गहू, हरभरा पिकासाठी १५ डिसेंबर ही तारीख आहे. अधिकच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले. 


इतर बातम्या
...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल...पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न...
आंदोलन सुरूच राहणार : संयुक्त किसान...नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात...
राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली...
परळी थर्मलमध्ये इंधनासाठी बांबूचा वापर...लातूर ः परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात...
पेप्सिकोच्या बटाटा वाणाचे  मालकी हक्क...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः केंद्र सरकारच्या...
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...