‘दुधना’च्या पुरामुळे हजारो हेक्टरवरील पिके पाण्यात

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडळांमध्ये मंगळवारी (ता.२१) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील तीन मंडळांत अतिवृष्टी झाली.
Crops on thousands of hectares flooded due to 'Dudhna' floods
Crops on thousands of hectares flooded due to 'Dudhna' floods

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडळांमध्ये मंगळवारी (ता.२१) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील तीन मंडळांत अतिवृष्टी झाली. सेलू (जि. परभणी) तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या १४ दरवाजांद्वारे ३० हजार ३२४ क्युसेक विसर्गामुळे पूर आला. पुराचे पाणी शिरल्यामुळे सेलू, मानवत, परभणी आदी तालुक्यांतील हजारो हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी,तूर आदी  पिके पाण्यात बुडाली. पावसामुळे काढणीस आलेले सोयाबीन हातचे जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत.

परभणी जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी (ता.२०) सायंकाळी विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरु झाला. ५२ मंडळांमध्ये  सरासरी २५.८ मिमी पाऊस  झाला. सेलू तालुक्यातील ३ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. दुधना नदीच्या पुरामुळे पूल पाण्याखाली गेल्यामुळे सेलू -मोरेगाव- देवगाव फाटा, सेलू -राजेवाडी- वालूर, मानवतरोड- इरळद-वालूर या  मार्गावरील वाहतूक ठप्प होती. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडळांमध्ये सरासरी १२.९ मिमी पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस ( १५ मिमीच्या पुढे)

परभणी जिल्हा ः परभणी ४९.३, परभणी ग्रामीण २०.८, पेडगाव ६३.८, जांब ३७.५, झरी २९.३, सिंगणापूर १९.३, पिंगळी १७.८, टाकळी कुंभकर्ण ३१.३, जिंतूर ४७, बोरी ३०.३, आडगाव २७.८, चारठाणा ६०.३, वाघी धानोरा २३.५, दूधगाव २९.३, देऊळगाव २९.५, वालूर ५६, कुपटा ४७.८,  मानवत ४६.८, केकरजवळा १५, कोल्हा ३९.५, रामपुरी २२.८, पाथरी ३१.३, बाभळगाव १५, हादगाव ४७.३, कासापुरी ३०, माखणी ३१, कात्नेश्वर १७.३.  हिंगोली जिल्हा ः सिरसम २८.८, माळहिवरा १६, कळमनुरी ३२.५, हट्टा २३, औंढा नागनाथ २४.८, साळणा ३१, गोरेगाव २०.३, साखरा ४३.८.

‘निम्न दुधना’तून विसर्ग

निम्न दुधना प्रकल्पाचे धरण शंभर टक्के भरले आहे. मंगळवारी (ता.२१) सकाळी आठ वाजता या धरणाच्या १४ दरवाजांद्वारे ३० हजार ३२४ क्युसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन निम्न दुधना प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षातर्फे करण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com