‘म्हैसाळ’चे पाणी बंदिस्त पाइपद्वारे पिकांना मिळणार

जलसंपदा विभागाद्वारे म्हैसाळ योजनेच्या कळंबी कालव्याचे ३४ ते ४२ किलोमीटर असे साडेसहा किलोमीटर अंतरात बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी दिले जाणार आहे.
Crops will get water from ‘Mhaisal’ through closed pipes
Crops will get water from ‘Mhaisal’ through closed pipes

सांगली ः जलसंपदा विभागाद्वारे म्हैसाळ योजनेच्या कळंबी कालव्याचे ३४ ते ४२ किलोमीटर असे साडेसहा किलोमीटर अंतरात बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी दिले जाणार आहे. शेवटच्या टप्प्यातील जलवाहिन्या जोडण्याचे काम सुरू झाले आहे. एप्रिलअखेर हे काम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.

दुष्काळी भागाचा कायापालट करणाऱ्या म्हैसाळ योजनेतून पूर्व भागातील जत, सांगोला, मंगळवेढा तालुक्‍यांतील शेती आता पाणीदार झाली. योजनेतील कळंबी कालव्यात समाविष्ट कांचनपूर, रसूलवाडी, सांबरवाडी, कवलापूरसह तासगाव तालुक्‍यातील कुमठे व धुळगाव हद्दीतील काही भाग आजवर पाण्यापासून वंचित राहिला होता. कळंबी कालव्याचे १ ते २७ किलोमीटर आणि ३४ किलोमीटरपर्यंतचे अस्तरीकरण पूर्ण केले आहे. त्यापुढे ४२ किलोमीटरपर्यंतच्या साडेसहा किलोमीटर अंतरात बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी मिळणार आहे. कृष्णा काठावरल्या मिरज तालुक्‍यातील कवलापूर, कांचनपूर, सांबरवाडी, काकडवाडी आणि तासगावातील धुळगाव, कुमठेतील शेतीला पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

वास्तविक हे योजनेचे शेपूट शेतकऱ्यांच्याही मागणीअभावी येथे गेल्या दहा वर्षांत केवळ तीन-चार वेळा पाणी कालव्यातून सोडले. सोडलेले पाणीही पावसाळ्यात आल्याने त्याचा फारसा उपयोग झाला नाही. १५ वर्षांपूर्वी जमिनींचे संपादन झाले. कालवा झाला, मात्र पाणी दुरापास्तच अशी स्थिती होती.

बंदिस्त पाइपलाइनद्वारेच पाणीपुरवठ्याचे शासनाचे धोरण राहणार आहे. कळंबी कालव्याचे काम एप्रिलपर्यंत नक्की पूर्ण होईल. तसा पाटबंधारे विभागाचे प्रयत्न आहे. - सूर्यकांत नलवडे, कार्यकारी अभियंता, म्हैसाळ योजना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com