Agriculture news in marathi Crops worth Rs 5 crore damaged by mites and thrips | Agrowon

मावा, तुडतुड्यांनी नुकसान केले पाच कोटींचे पीक 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

लाखनी तालुक्यात तुडतुडा, खोडकिडी, गादमाशी मुळे ५ कोटी १९ लाख रुपयांचे नुकसान झाले. सर्वेक्षणाअंती समोर आलेल्या या माहितीच्या आधारे  भरपाई द्यावी, अशी मागमी ओबीसी काँग्रेस सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पटले यांनी केली आहे.

भंडारा  : लाखनी तालुक्यात तुडतुडा, खोडकिडी, गादमाशी मुळे ५ कोटी १९ लाख रुपयांचे नुकसान झाले. सर्वेक्षणाअंती समोर आलेल्या या माहितीच्या आधारे  शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागमी ओबीसी काँग्रेस सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पटले यांनी केली आहे.

तालुक्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत तुडतुड्यांमुळे जिरायती पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले. हे क्षेत्र ७६० हेक्टर आहे. २ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर  प्रमाणे ५१ लाख ६८ हजार रुपयांचा निधी भरपाईपोटी शासनाकडून अपेक्षित आहे.

आश्वासित सिंचनाखाली ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र ३ हजार ४६५ हेक्टर आहे. यामुळे १० हजार २४० शेतकरी प्रभावित झाले. या शेतकऱ्यांना १३ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर प्रमाणे ४ कोटी ६७ लाख ७८ हजार रुपयांच्या शासकीय निधीची गरज आहे. तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार मलीक विराणी, खंडविकास अधिकारी शेखर जाधव, तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांच्या नेतृत्वात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी सर्वेक्षण करून नुकसानीचा अहवाल शासनाला दिला आहे.

त्यानुसार १२ हजार ५०० शेतकऱ्यांना मदती साठी ५ कोटी १९ लाख रुपयांच्या निधीची मागणी प्रशासनाकडून शासनाकडे करण्यात आली आहे.
 

असे आहे नुकसान    

  • एकूण शेतकरी    १२ हजार ५००
  • जिरायती    ७६० हेक्टर.
  • सिंचनाखाली    ३ हजार ४६५ हेक्टर.
  • भरपाईची मागणी    ५5 कोटी १९ लाख.
     

इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...