नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची का
ताज्या घडामोडी
मावा, तुडतुड्यांनी नुकसान केले पाच कोटींचे पीक
लाखनी तालुक्यात तुडतुडा, खोडकिडी, गादमाशी मुळे ५ कोटी १९ लाख रुपयांचे नुकसान झाले. सर्वेक्षणाअंती समोर आलेल्या या माहितीच्या आधारे भरपाई द्यावी, अशी मागमी ओबीसी काँग्रेस सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पटले यांनी केली आहे.
भंडारा : लाखनी तालुक्यात तुडतुडा, खोडकिडी, गादमाशी मुळे ५ कोटी १९ लाख रुपयांचे नुकसान झाले. सर्वेक्षणाअंती समोर आलेल्या या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागमी ओबीसी काँग्रेस सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पटले यांनी केली आहे.
तालुक्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत तुडतुड्यांमुळे जिरायती पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले. हे क्षेत्र ७६० हेक्टर आहे. २ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर प्रमाणे ५१ लाख ६८ हजार रुपयांचा निधी भरपाईपोटी शासनाकडून अपेक्षित आहे.
आश्वासित सिंचनाखाली ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र ३ हजार ४६५ हेक्टर आहे. यामुळे १० हजार २४० शेतकरी प्रभावित झाले. या शेतकऱ्यांना १३ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर प्रमाणे ४ कोटी ६७ लाख ७८ हजार रुपयांच्या शासकीय निधीची गरज आहे. तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार मलीक विराणी, खंडविकास अधिकारी शेखर जाधव, तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांच्या नेतृत्वात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी सर्वेक्षण करून नुकसानीचा अहवाल शासनाला दिला आहे.
त्यानुसार १२ हजार ५०० शेतकऱ्यांना मदती साठी ५ कोटी १९ लाख रुपयांच्या निधीची मागणी प्रशासनाकडून शासनाकडे करण्यात आली आहे.
असे आहे नुकसान
- एकूण शेतकरी १२ हजार ५००
- जिरायती ७६० हेक्टर.
- सिंचनाखाली ३ हजार ४६५ हेक्टर.
- भरपाईची मागणी ५5 कोटी १९ लाख.