नगर : कांदा, तुरीच्या विम्यापोटी सव्वासात कोटी बॅंकेत

कांदा, तुरीच्या विम्यापोटी  सव्वासात कोटी बॅंकेत
कांदा, तुरीच्या विम्यापोटी सव्वासात कोटी बॅंकेत

नगर : पारनेर, नगर तालुक्‍यांतील सात हजार ८० कांदा व तूर उत्पादक शेतकऱ्यांची मागील खरीप हंगामातील सुमारे सात कोटी १३ लाख ३९ हजार १६७ रुपये विमा रक्कम बॅंक खात्यांवर वर्ग केल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली. 

पारनेर व नगर तालुक्‍यातील कांदा व तूर उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबईच्या ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे कांदा व तूर पिकांचा विमा हप्ता भरला होता. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे तो मंजूर झाला नव्हता. त्यासाठी गायकवाड यांनी शुक्रवारी (ता.१७) मुंबईत संबंधित कंपनीकडे जाऊन विमा मंजुरीसाठी प्रयत्न केले. त्याला यश आले आहे. त्यामुळे एक हजार ८१७ शेतकऱ्यांना एक कोटी ३९ लाख ९३ हजार ३१ रुपये वर्ग केले. तूर उत्पादकांना तीन हजार ८८१ शेतकऱ्यांना सुमारे चार कोटी ९२ हजार ८८३ वर्ग केले.

तालुक्‍यातील पाच हजार ६९८ शेतकऱ्यांच्या खात्यांवर पाच कोटी ४० लाख ८५ हजार ९१५ रुपये वर्ग करण्यात आले. 

नगर तालुक्‍यातील ६८७ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ७६ लाख १९ हजार ३९८ रुपये; तर तूर उत्पादक ६९५ शेतकऱ्यांना ९६ लाख ३३ हजार ८५४ रुपये, असे एकूण एक हजार ३८२ शेतकऱ्यांना सुमारे एक कोटी ७२ लाख ५३ हजार २५२ रुपये मंजूर झाले. ती रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात आली. ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाल्याने मोठा आर्थिक हातभार लागणार आहे. 

हा विमा मंजूर होण्यासाठी गायकवाड यांनी प्रयत्न केल्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याव्यतिरिक्त जे शेतकरी विमा रक्कम मिळण्यापासून वंचित आहेत, त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत विमा भरल्याची पावती जमा करावी, असे आवाहनही गायकवाड यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com