नांदेड जिल्ह्यात हरभरा पेरणीच्या सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार

 Cross the normal sowing area of gram in Nanded district
Cross the normal sowing area of gram in Nanded district

नांदेड : जिल्ह्यात बुधवार (ता. ४) पर्यंत एकूण १ लाख ३३ हजार ७६५ हेक्टरवर (९७.८४ टक्के) पेरणी झाली आहे. हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला आहे.

आजवर हरभऱ्याची १ लाख १३ हजार २२९ हेक्टरवर (१८१.६१ टक्के) पेरणी झाली. ज्वारीचे पेरणी क्षेत्र अद्याप निम्म्याहून कमीच आहे. गव्हाची पेरणी १५ टक्क्यांच्या आतच आहे. जिल्ह्यातील १६ पैकी ७ तालुक्यांमध्ये सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर, तर ९ तालुक्यांमध्ये सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३६ हजार ७१२ हेक्टर आहे. यामध्ये रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ९७५ हेक्टर, गव्हाचे ३८ हजार ५३८ हेक्टर, मक्याचे ३ हजार १७६ हेक्टर, हरभऱ्याचे ६२ हजार ३५९ हेक्टर, करडईचे ४ हजार ७६८ हेक्टर क्षेत्र आहे. हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा ओलांडला आहे. परंतु, ज्वारीचे पेरणी क्षेत्र अद्याप निम्याहून कमी आहे.

गव्हाची पेरणीदेखील १५ टक्क्यांच्या आतच आहे. करडईचे क्षेत्र २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. बुधवार (ता. ४) पर्यंत जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांत मिळून एकूण १ लाख ३३ हजार ७६५ हेक्टरवर (९७.८४ टक्के) पेरणी झाली आहे.

अर्धापूर, माहूर, किनवट, उमरी, धर्माबाद, बिलोली, देगलूर या ७ तालुक्यांमध्ये सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नांदेड, मुदखेड, हदगाव, हिमायतनगर, भोकर, नायगाव, मुखेड, कंधार, लोहा या ९ तालुक्यांत १५.२७ ते ९४.४६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

पीकनिहाय पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

पीक सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
ज्वारी  २६९७५ १२८१६ ४७.५१
गहू ३८५३८  ५१७९  १३.४४
मका ३१७८  ८३६ २६.३१
हरभरा ६२३५९ ११३२२९ १८१.६१ 
करडई ४७६८  ८९९ १८.८५
सूर्यफूल  ९४  ५९ ---

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com