Agriculture news in marathi For crowd control in the market Strict enforcement of rules | Agrowon

बाजारात गर्दी नियंत्रणासाठी नियमांची कडक अंमलबजावणी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 एप्रिल 2021

कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या आवारात प्रवेश केल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक घटकाला नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

नाशिक : कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या आवारात प्रवेश केल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक घटकाला नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेऊन संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वच बाजार समित्या सावध झाल्या असून, योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमधील शेतमालाचे लिलाव सुरू राहावेत, यासाठी बाजार समित्यांमध्ये योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहे. जिल्ह्यातील एकूण १७ बाजार समित्यांपैकी १५ बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लेट खरीप व उन्हाळी कांद्याची आवक होत आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रण करण्यापासून ते प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह नियमावली कडक करण्यात आली आहे. बाजार समिती आवारावर कोरोना नियमांचे पालन करण्यासंदर्भात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. गर्दी नियंत्रण करण्यासाठी कर्मचाऱ्यांमार्फत कामकाज होत आहे. यासह ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे उद्घोषणा करून वेळोवेळी नियमित सूचना दिल्या जात असल्याचे बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले.

 
घेतली जाणारी खबरदारी: 

  •   बाजार समिती आवारात प्रत्येकाला तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे अनिवार्य 
  •   बाजार आवारात येणाऱ्या व्यक्तीचे तापमान तपासणी
  •   सर्दी, ताप, खोकला असलेल्या, आजारी व्यक्तीने बाजार समितीत कोणत्याही कारणास्तव प्रवेशास बंदी
  •   लिलावाच्या आदल्या दिवशी मुक्कामी येण्यास मनाई
  •  

तर दंड करण्यासह पोलिसांना कळविणार 
धूम्रपान केल्यास व्यक्तीस एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, अशी ताकीद देण्यात आली आहे. यासह आजारी व्यक्तीने प्रवेश केल्यास आरोग्य विभागास आणि अनधिकृतरीत्या आवारात किंवा कांदा लिलावाच्या ठिकाणी आल्यास अथवा वाहन पार्किंग केल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला कळविण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...