परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
अॅग्रो विशेष
गर्दी करून कायदे रद्द होत नाहीत : तोमर
कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चेसाठी सरकार तयार असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केला.
ग्वालियर, मध्य प्रदेश ः कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चेसाठी सरकार तयार असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केला. तसेच ‘‘फक्त गर्दी जमा करून कायदे रद्द करता येत नाही’’ असेही कृषिमंत्री तोमर म्हणाले.
‘‘आंदोलक शेतकऱ्यांना तीन्ही कृषी कायद्यांतील कोणत्या तरतुदी शेतकरी विरोधी वाटतात हे सरकारला सांगावे. आंदोलनाचा विषय संवेदनशीलतेने हाताळत सरकारने शेतकरी नेत्यांशी चर्चेच्या १२ फेऱ्या केल्या. परंतु, कृषी कायद्यांविषयी असलेले आक्षेप नोंदविल्यानंतर चर्चेतून तोडगा निघू शकतो.
शेतकरी नेते किंवा विरोधक नेमके त्यांचे कोणत्या तरतुदींवर आक्षेप आहेत हे सांगत नाहीत. त्यांना सरकारला हे स्पष्ट करावे. शेतकरी संघटनांनी नव्या कृषी कायद्यांत शेतकरी विरोधी काय आहे, हे सांगावे. तुम्ही स्पष्टपणे म्हणत आहात की कायदे रद्द करा, गर्दी एकत्र आली आणि कायदे रद्द झाले, असे कधीही होत नाही,’’ असेही कृषिमंत्री तोमर यांनी यावेळी सांगितले.
सरकार आजही सुधारणा करण्यास तयार
शेतकरी संघटनांनी शेतकरी विरोधी कोणत्या तरतुदी आहेत, हे सरकारला सांगावे. सरकार आजही ते ऐकायला तयार असून आजच सुधारणेला तयार आहे. स्वतः पंतप्रधानांनीही हेच सांगितले आहे. आंदोलक शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे भले इच्छित असतील तर त्यांनी कोणत्या तरतुदी अडचणीच्या वाटतात हे स्पष्ट करावे, असे आवाहन कृषिमंत्री तोमर यांनी दिले.
- 1 of 674
- ››