Agriculture news in marathi Crowds thronged to sell onions at Andarsul sub-market | Agrowon

अंदरसुल उपबाजारात कांदा विक्रीसाठी उसळली गर्दी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 जुलै 2020

नाशिक : दैनंदिन आवकेपेक्षा दुप्पट वाढ झाली. परिणामी, अंदरसुल उपबाजारात कांदा विक्रीसाठी दुपारपर्यंत मोठी गर्दी उसळल्याचे दिसून आले.

नाशिक : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य बाजार आवारातील कांदा लिलाव सोमवारी (ता.२७) व्यापाऱ्यांच्या अर्जावरून बंद ठेवण्यात आले होते. मात्र, याच बाजार समितीचा उपबाजार असलेल्या अंदरसुल येथे कामकाज सुरू असल्याने येवला येथील आवक येथे आली. त्यामुळे दैनंदिन आवकेपेक्षा दुप्पट वाढ झाली. परिणामी, अंदरसुल उपबाजारात कांदा विक्रीसाठी दुपारपर्यंत मोठी गर्दी उसळल्याचे दिसून आले.

येवला मुख्य बाजार आवार बंद असला तरी, अंदरसुल उपबाजाराचे सभापती सोनवणे यांनी व्यापाऱ्यांना कामकाज सुरू ठेवण्यासाठी विनंती केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय टळली. त्यामुळे अंदरसुल येथे क्षमता कमी असून व्यवहार सुरू होते. मात्र, येवल्याला कामकाज का बंद राहते? असा सवाल उपस्थित होत 
आहे. 

कांदा व्यापाऱ्यांची मनमानी?

एकतर कोरोनामुळे कामकाजात असलेली अस्थिरता, त्यात व्यापारी जोडून सुट्ट्या आल्या म्हणून अर्ज करुन कारणे देत सुट्टी घेतात. अर्ज देऊन सोयीप्रमाणे व्यापाऱ्यांकडून बाजार समितीचे कामकाज बंद ठेवले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बाजार समितीत आवक वाढवून दर पडण्याचा प्रकार सर्रास होत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

एकीकडे कांदा सडतोय, दुसरीकडे शेती नियोजनासाठी भांडवल गरजेचे आहे. बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे ऐकूण न घेता व्यापाऱ्यांचे ऐकले जाते. हे वाईट आहे.
- हरी महाजन, तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना, येवला. 

गेल्या दोन दिवसांपूर्वी बँका बंद असल्याने व्यापाऱ्यांकडे देण्यासाठी रोख पैसे नव्हते. तसेच खळ्यांवर जागा नसल्याने व्यापारी अर्जावरून ते बंद होते. मर्यादित व्यापारी जास्त माल खरेदी करतात. त्यामुळे अडचण होते.
- उषा शिंदे, सभापती, येवला बाजार समिती.

खरिपाच्या हंगामात शेतीकामांसाठी भांडवलाची गरज असते. एकीकडे उन्हाळ कांदा खराब होत आहे. त्यात शेतकऱ्यांना कांदा विक्री करता यावी, यासाठी व्यापाऱ्यांना विनंती करून कामकाज सुरू ठेवले.
- मकरंद सोनवणे,  सभापती, अंदरसुल उपबाजार आवार 

आवक स्थिती

अंदाजे १०,००० क्विंटल
वाहने ४८० ट्रॅक्टर

प्रति क्विंटल द

किमान   १००
कमाल   ७११
सरासरी ५५०

 


इतर बाजारभाव बातम्या
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
जळगावात मेथी २००० ते ३५०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये वांगी २००० ते ५००० रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २५०० ते ४००० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात ढोबळी मिरची, टोमॅटो दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरवी मिरचीला मागणी...नाशिक : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कांदा, बटाट्याच्या दरात सुधारणा,...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत काकडी ६०० ते १२०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात उडीद २५०० ते ८००० रूपयेनगरमध्ये ४५०० ते ५५०० रूपये नगर  : नगर...
नाशिकमध्ये कारले १००० ते २६६७ रूपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.८...
जळगावात आले ३५०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर बाजार समितीत कांद्याचे दर टिकूननगर ः नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर गेल्या पंधरा...