Agriculture news in Marathi Crows infect bird flu in Nagar district | Agrowon

नगरमध्ये कावळे ‘बर्ड फ्लू’ बाधित

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 जानेवारी 2021

श्रीगोंदा तालक्यातील भानगाव शिवारात मृत कावळ्यांचा अहवाल ‘बर्ड फ्लू’ बाधित आला आहे. शनिवारी (ता. १६) निबंळक (ता. नगर) येथे ६६ कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला आहे. त्याचे सात नमुने पशुसंवर्धन विभागाने तपासणीसाठी पाठवले आहेत.

नगर ः श्रीगोंदा तालक्यातील भानगाव शिवारात मृत कावळ्यांचा अहवाल ‘बर्ड फ्लू’ बाधित आला आहे. शनिवारी (ता. १६) निबंळक (ता. नगर) येथे ६६ कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला आहे. त्याचे सात नमुने पशुसंवर्धन विभागाने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा धोका वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भानगाव शिवारातील नऊ गावांत दहा किलोमीटर परिसरात कुक्कुटपक्षी खरेदी -विक्रीवर बंदी आणण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. नगर जिल्ह्यात यामुळे कुक्कुटपालन करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. आतापर्यंत नगर जिल्ह्यातील नगर, पाथर्डी तालुक्यांत २५४ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत नऊ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

जिल्ह्यात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाला प्राधान्य दिले जात आहे. नगर जिल्ह्यात ३ हजार ३४१ शेतकरी ब्रॉयलर कोंबड्याचे उत्पादन घेतात. जिल्ह्यात सध्या एक कोटी १४ लाख कोंबड्या मांसासाठी, तर ७६ हजार कोंबड्या अंडी उत्पादनासाठी आहेत. याशिवाय दहा हजारांपेक्षा अधिक शेतकरी परसातील देशी कोंबड्याचे पालन करतात. राज्यात ‘बर्ड फ्लू’चा धोका वाढला असल्याने पशुसंवर्धन विभाग दक्ष झाला.

मिंडसांगवी (ता. पाथर्डी) येथे पाच शेतकऱ्यांकडे परसात पालन केल्या जात असलेल्या ५० देशी कोंबड्याचा अचानक मृत्यू झाला होता. मात्र या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ने झाला नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भानगाव (ता. श्रींगोंदा) येथे एका कावळ्याचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ने झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भानगाव, सुरोडी, टाकळी लोणार, ढोरजे, देऊळगाव गलांडे, पिसोरे खांड, वडाळी, कोथुळ या नऊ गावांच्या शिवारातील दहा किलोमीटर कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी विक्रीला बंदी करण्याबाबत आदेश दिले आहेत.

दरम्यान, निबंळक (ता. नगर) येथेही निंबळकमध्ये दोन दिवसांत निंबळक (ता. नगर) येथील ६६ कोंबड्या मृत्युमुखी पडल्या असून, त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आठवडमध्येही मृत कोंबड्या आढळून आल्याने, त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आठवड व निंबळक येथील नमुन्यांचे अहवाल काय येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने परसातील कुक्कुटपालनाचेही तातडीने सर्वेक्षण सुरू केले आहे. ‘बर्ड फ्लू’चा चिकन खाण्याला कोणताही धोका नाही त्यामुळे लोकांनी घाबरून जाता चिकन, अंडी खावे, असे आवाहन डॉ. तुंबारे यांनी केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील तीन हजार कामे...पुणे : जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या शंभर दिवस...
जालन्यात गहु सोंगणीला सुरुवातपिंपळगाव रेणुकाई, जि. जालना : पिंपळगाव रेणुकाईसह...
बांबू प्रक्रियेसाठी कौशल्याची आवश्यकता...दापोली, जि. रत्नागिरी ः ‘‘विस्तार शिक्षण...
शेळी, मेंढीपालन व्यवसाय म्हणजे ‘एटीएम’...दोंडाईचा, जि. धुळे : कष्टकरी शेळी-मेंढीपालन...
ड्रॅगन फ्रूटची कलमे आगीत भस्मलांजा, जि. रत्नागिरी ः तालुक्यातील धुंदरे येथे डॉ...
नगर जिल्ह्यासाठी ५४० कोटी रुपयांचा निधी...नगर : नगर जिल्हा वार्षिक योजनेत २०२२-२३ या आर्थिक...
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...
जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
मिनी विधानसभेच्या निवडणुका मार्चमध्ये...मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४...
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...