राज्यात ५५ साखर कारखान्यांचे गाळप सुरू

नगर विभागात सात साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. तर राज्यात सद्यःस्थितीत ५५ साखर कारखान्यांनी ऊस गाळपाला सुरुवात केली असून, आतापर्यंत १९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.
राज्यात ५५ साखर कारखान्यांचे गाळप सुरू
राज्यात ५५ साखर कारखान्यांचे गाळप सुरू

नगर : नगर विभागात सात साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. तर राज्यात सद्यःस्थितीत ५५ साखर कारखान्यांनी ऊस गाळपाला सुरुवात केली असून, आतापर्यंत १९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. आठ दिवसांत शंभराच्या पुढे कारखान्यांचे गाळप सुरू होण्याची शक्यता आहे.  प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातूनही माहिती देण्यात आली. राज्यात सुमारे दोनशेच्या जवळपास साखर कारखाने आहेत. यंदाचा ऊस गाळप हंगामात आतापर्यंत सहकारी ३२ आणि खासगी २३ असे ५५ साखर कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू केले आहे. आतापर्यंत कोल्हापूर विभागात सात लाख, पुणे विभागात साडेपाच लाख, सोलापूर विभागात पाच लाख, नगर विभागात पावणेदोन लाख उसाचे गाळप झाले आहे. राज्यात गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात १० कोटी २० लाख टनांच्या जवळपास गाळप झाले आहे. यंदा उसाचे क्षेत्र अधिक असल्याने हा आकडाही वाढण्याचा अंदाज आहे.  दिवाळीचा सण असल्याने अजून बहुतांश भागातील कारखान्यावर मजूर आलेले नाहीत. ऐन दिवाळीच मजूर कारखाना परिसरात येतात. सध्याही घर सोडण्याची मजुरांची लगबग सुरू आहे. त्यामुळे आठ दिवसांत बहुतांश कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. नगर विभागात आतापर्यंत सात कारखान्याचे गाळप सुरू झाले असून, आतापर्यंत पावणेदोन लाख टन उसाचे गाळप झाले आहे. नगर, नाशिक विभागांत १ लाख २३ हजार टन ऊस गाळप क्षमता आहे. गेल्या वर्षी १७ लाख २ हजार टन उसाचे गाळप झाले होते. यंदा ऊसक्षेत्र अधिक असल्याने गाळपही वाढणार असल्याचा अंदाज आहे. नगर जिल्ह्यात अजून चार साखर कारखान्यांना गाळप परवाना आयुक्तालयातून मिळाला नाही. 

नगर विभागात सुरू झालेले कारखाने  कर्मवीर शंकरराव काळे (कोळपेवाडी), सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (संगमनेर), ज्ञानेश्वश्‍वर सहकारी (भेंडा), अंबिका शुगर (राशीन), साईकृपा (देवदैठण), जयश्रीराम शुगर (जामखेड). मुळा सहकारी (सोनई). राज्यात विभागनिहाय सुरू झालेले साखर कारखाने  कोल्हापूर : १६,  पुणे : १४, सोलापुर : १२, नगर : ७, औरंगाबाद : २, नांदेड : ३, अमरावती : १, नागपूर : 0

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com