कोल्हापुरातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : जिल्ह्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील ९० टक्के साखर कारखाने बंद होण्याची शक्यता आहे.
The crushing season in Kolhapur is in its final stages
The crushing season in Kolhapur is in its final stages

कोल्हापूर : जिल्ह्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील ९० टक्के साखर कारखाने बंद होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ४२ हजार हेक्टरवर ऊस शिल्लक आहे. मार्च अखेरपर्यंत या उसाचे गळीत होईल, कारखाना सूत्रांनी सांगितले. 

यंदाच्या हंगामात डिसेंबरमध्ये पावसाचा मोठा अडथळा आला. यामुळे तोडणी कार्यक्रम विस्कळीत झाला. मिळेल तो ऊस कारखान्यांना आणायची वेळ कारखान्यांवर आली यामुळे जानेवारी महिन्यात अपेक्षित रिकव्हरी साखर कारखान्यांना मिळाली नाही. फेब्रुवारी महिन्यात मात्र हवामानाचा अडथळा न आल्याने हंगाम सुरळीत चालला. सुरुवातीच्या टप्प्यात चांगला ऊस गाळपास गेल्याने अंतिम टप्प्यात विशेष करून पूरग्रस्त उसाची तोड शिल्लक राहिली याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. ऊस शिल्लक असल्यास शेतकऱ्यांनी कारखान्यांच्या शेती विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. 

अगदी हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना अजूनही शेतकऱ्यांना ऊसतोडणीसाठी कारखान्यांकडे गयावया करावी लागत आहे. ज्या शेतकऱ्यांना तोड शक्य आहे ते स्वतः तोडणी करून ऊस कारखान्याला पाठवत आहेत. कारखान्यांना शेवटच्या टप्प्यातील मजुरांसाठी झगडावे लागले. यामुळे बहुतांशी कारखान्यांनी ऊसतोडणी यंत्राचा आधार घेतला आहे.

जिल्ह्याच्या पूर्वेकडील काही कारखान्यांना कर्नाटकचे मजूर मिळण्याची शक्यता असल्याने शेवटच्या टप्प्यात गतीने ऊसतोडणी करण्यासाठी कारखाने धडपडत आहेत. अजूनही काही भागांत पूरग्रस्त उसाची तोड शिल्लक आहे. मात्र अद्याप ती पूरग्रस्त क्षेत्र शिल्लक आहे याची नोंद प्रादेशिक ऊस कार्यालयाकडे नाही. 

यंदाचा हंगाम आमची परीक्षा पाहणारा ठरला आहे. आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. उशिरा तोड झाल्याने आमच्या उसाच्या वजनात घट झाली. - उमेश चव्हाण, ऊस उत्पादक

यंदा कामगार कमी असल्याने ऊसतोडणीला अडथळे आले असले तरी शिल्लक उसाची समस्या राहणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शेवटच्या टप्प्यात गतीने ऊसतोडणी करून वेळेत हंगाम संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे. - दिलीप जाधव, ऊस विकास अधिकारी, दत्त साखर कारखाना शिरोळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com