नांदेड जिल्ह्यातील सीएससी केंद्रे सुरू ठेवण्यास परवानगी

नांदेड : या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धतीने नवीन आधार नोंदणी, दुरुस्तीचे कामे बंद होते. आता जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हे केंद्र अटी व शर्तीच्या आधारे चालू करण्यास परवानगी दिली आहे.
CSC centers Allow to continue in Nanded district
CSC centers Allow to continue in Nanded district

नांदेड : जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र, (कॉमन सर्विस सेंटर- सीएससी) महा ई-सेवा केंद्र चालू आहे. तथापि, या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धतीने नवीन आधार नोंदणी, दुरुस्तीचे कामे बंद होते. आता जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हे केंद्र अटी व शर्तीच्या आधारे चालू करण्यास परवानगी दिली आहे. 

जिल्ह्यातील सध्याच्या तसेच भविष्यात नव्याने निर्माण होणा-या प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) मध्ये आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र चालू ठेवण्यास परवानगी असणार नाही. या जनसुविधा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनी मास्क, ग्लोव्हज, फेस शिल्ड, सॅनिटायझर, कापूस, टिशु पेपर, टिशु पेपरबॅग आदींचा नियमित वापर करावा. बायोमेट्रिक डिव्हाईस, दरवाज्याचे हॅण्डल्स, नोब्स, टेबल, खुर्ची आदींचे सातत्याने निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करत रहावे. तेथील कर्मचाऱ्यांनी नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच साबणाने हात स्वच्छ धुवावेत.

या केंद्रांवर येणाऱ्या ग्राहकांना बायोमेट्रीक उपकरणाचा वापर करण्यापूर्वी, वापर केल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुण्यासाठी प्रेरित करावे. ग्राहकांना मास्क, स्वच्छ रुमाल बांधणेबाबत सक्ती करावी. रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांमध्ये पुरेसे सामाजिक अंतर राहील, यादृष्टीने मार्कींग करण्यात यावे. केंद्रांवर उपलब्ध सेवा व त्या सेवांचे दरपत्रक असलेला फलक प्रदर्शित करावा. 

युआयडीएआयकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आधार कॅम्प तसेच कोणत्याही प्रकारच्या शिबीरांचे आयोजन करण्यात येऊ नये. या केंद्रावर गर्दी होणार नाही, यादृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करावी. ६५ वर्षांवरील नागरिक, १० वर्षांखालील मुले, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर महिलांना केंद्रांवर याठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्यास मनाई असेल.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समुह साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम आणि भारतीय दंडसंहितेनुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानण्‍यात येईल. कारवाई करण्‍यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. इटनकर यांनी आदेशात स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com