Agriculture news in Marathi Cucumber and lemon prices improve in Pune | Agrowon

पुण्यात काकडी, लिंबाच्या दरांत सुधारणा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 मार्च 2021

काकडीच्या मागणीत आणि मटारच्या आवकेत घट झाल्याने त्यांच्या दरात वाढ झाली होती. इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. तर फळबाजारात उन्हाळ्यामुळे लिंबाची मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे.

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ७) भाजीपाल्यांची सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत विविध भाजीपाल्यांच्या आवकेत वाढ झाली होती. मात्र काकडीच्या मागणीत आणि मटारच्या आवकेत घट झाल्याने त्यांच्या दरात वाढ झाली होती. इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. तर फळबाजारात उन्हाळ्यामुळे लिंबाची मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे.

परराज्यांतून आलेल्या आवकेमध्ये पंजाब, राजस्थानसह मध्य प्रदेशातून सुमारे ७ ट्रक मटार, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ५ ट्रक, तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ४ टेम्पो, राजस्थानहून ७ ट्रक गाजर, कर्नाटकातून रताळी ४ टेम्पो आणि मध्य प्रदेशातून लसणाची १५ ट्रक आवक झाली होती.

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० पोती, कोबी १० टेम्पो, फ्लॉवर ५ टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, टॉमेटो ८ हजार क्रेट, भुईमुगाच्या शेंगा ४० गोणी, मटार ४० गोणी, पावटा ५ टेम्पो, तर स्थानिक कांदा १०० ट्रक, तर गुजरात येथून पांढरा कांदा ५ ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागांतून ३५ ट्रक बटाटा आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : १७०-२३०, पांढरा कांदा - १००-१३०, बटाटा : ८०-१३०, लसूण : ३००-६००, आले : सातारी १००-२००, भेंडी : २५०-३००, गवार : ४००-५००, टोमॅटो : ६०-१००, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : २५०-४००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-२५०, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी २००-२२०, पापडी : २००-२५०, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : ८०-१२०, कोबी : ४०-६०, वांगी : १००-२००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : १५०-२५०, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १२०-१४०, शेवगा : ३००-३५०, गाजर : १००-१४०, वालवर : २००-३००, बीट : ५०-६०, घेवडा : ३००-४००, कोहळा : १००-१२०, आर्वी : २००-२२०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २००-२५०, पावटा : ३००-४००, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार : २००-३००, स्थानिक -३५०-४००, तांबडा भोपळा : ६०-१००, सूरण : १८०-२००, तोतापुरी कैरी - ४५०-५५०, रताळी कर्नाटक - १२०-१३०, कराड - १८०-२००  मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे १ लाख ५० हजार, तर मेथीची ५० हजार जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ३००-६००, मेथी : ३००-६००, शेपू : ६००-८००, कांदापात : ६००-८००, चाकवत : ५००, करडई : ५००-६००, पुदिना : १००-२००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ४००-७००, चुका : ४००-५००, चवळई : २००-४००, पालक : ३००-४००, हरभरा गड्डी ः ५००-६००.

फळबाजार
फळबाजारात लिंबांची सुमारे २ हजार गोणी, संत्री सुमारे ४०, तर मोसंबी सुमारे ३० टन, डाळिंब ३० टन, पपई २० टेम्पो, चिकू सुमारे २ हजार गोणी, कलिंगड ३०, तर खरबूज सुमारे २० टेम्पो, पेरू २०० क्रेट, स्ट्रॉबेरी ५ टन आवक झाली होती. तर द्राक्षांची बारामती, फलटण, सांगली, इंदापूर आणि पंढरपूर भागांतून ३० टन आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ७००-८००, मोसंबी : (३ डझन) : ३२०-५०० (४ डझन) : १६०-१८०, संत्रा : (१० किलो) : २५०-७८०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०-१८०, गणेश : १०-५०, आरक्ता २०-८०. कलिंगड : ७-१०, खरबूज : १०-२२, पपई : ५-१२, चिकू (१० किलो) : १००-३००, स्ट्रॉबेरी (२ किलो) ८०-१५०. पेरू (२० किलो) - ४००-६००. द्राक्षे - जम्बो (१०किलो) ५००-९००, सुपर सोनाका (१५ किलो) ७००-११००, माणिक चमण (१५) ५००-७००. कृष्णा (१०) ६००-९००.

फुलबाजार
उन्हाळ्यामुळे विविध फुलांची आवक घटली असून, शिवरात्रीनिमित्त फुलांची मागणी वाढल्याने बहुतांश फुलांच्या दरात वाढ झाली होती. प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे ः झेंडू - ४०-४५, गुलछडी १५० -२००, बिजली २०-३०, कापरी २०४०, सुटा कागडा - ५००-६००, शेवंती ८०-१००, मोगरा ५००-७००, ॲस्टर (चार गड्ड्यांचे दर) १४-१८, सुटा (किलो) १००-१२०, गुलाब गड्डी (बारा नगांचे दर) - २०-२०, ग्लॅडिएटर ४०-५०, गुलछडी काडी - ५०-८०, डच गुलाब (२० नग) ८०-१२०, लिली बडल (५० काडी) - ८-१०, अबोली लड - २००, जरबेरा - १०-२०, कार्नेशन - १२०- १४०.

मटण मासळी
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. ७) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन, खाडीची २०० किलो, तर नदीच्या मासळीची दीड टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे २० टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. दरम्यान, मासळीची आवक प्रामुख्याने आंध्र प्रदेश, हावडा, मद्रास, रत्नागिरी, गुजरात किनारपट्टीवरून होत आहे. मागणी जास्त असल्याने कापरी पापलेट वगळता सर्व प्रकारच्या मासळींच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली होती. चिकनला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चिकनचे भाव प्रतिकिलोमागे ३० ते ४० रुपयांनी वधारले आहेत. मटण, अंडीचे दर स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १२००-१३०० मोठे १२००-१३००, मध्यम : ९००-१०००,  लहान ७५०-८००, भिला : ६००, हलवा : ५२०-५५०, सुरमई : ६५०-७५०, रावस : लहान ६००-७००,  मोठा : ८००-१०००, घोळ : ७००, भिंग : ४००, करली : ३२०, करंदी : (सोललेली) ४८०, पाला :  लहान १००० मोठे : १२००-१४००, वाम : ४००-९००, ओले बोंबील : २००-२४०.

कोळंबी ः लहान ३६०-४००, मोठे ४४०-५५०, जंबो प्रॉन्स : १२००  किंग प्रॉन्स : ७००, लॉबस्टर : १२००, मोरी : २८०-३६०, मांदेली : १२०, राणीमासा : २००-२४०, खेकडे : २००-२८०, चिंबोऱ्या : ६००-७००.

खाडीची मासळी : सौंदाळे : २८०-३२०, खापी : २४०-२८०, नगली : ४८०-६००, तांबोशी : ४४०-४८०, पालू : २८०, लेपा : १२०-२८०, शेवटे : २४० बांगडा : लहान १८०-२०० , मोठे २४०-२८०, पेडवी : १००, बेळुंजी : १६०-२००, तिसऱ्या : ३००-३६०,  खुबे : १२०-१४०, तारली : १८०-२००.

नदीची मासळी : रहू : १४०-१६०, कतला : १६०, मरळ : ४८०, शिवडा : २८०, खवली : २४०-२८०, आम्ळी : १६०, खेकडे : २००, वाम : ६००-५००.

चिकन : चिकन : १९०-२००, लेगपीस : २४० जिवंत कोंबडी : १५०, बोनलेस : २८०.

अंडी : गावरान : शेकडा : ८९० डझन : १२० प्रति नग : १०, इंग्लिश : शेकडा : ४३७ डझन : ६० प्रतिनग : ५.

मटण : बोकडाचे : ६६० बोल्हाईचे : ६६० खिमा : ६६०, कलेजी : ७००.


इतर बाजारभाव बातम्या
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकूनजळगाव :  खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा...
लातूर, अकोल्यात तुरीने ओलांडला सात...लातूर/अकोला ः राज्यात काही दिवसांपासून तूर, हरभरा...
खानदेशातील बाजारांमध्ये मक्याची आवक घटलीजळगाव : खानदेशात बाजारात मक्याची आवक मध्यंतरी...
औरंगाबादेत आंबा खातोय भाव, ज्वारीचे दर...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये कारले, हिरव्या मिरचीच्या दरात...नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, भेंडी...सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नाशिकमध्ये लेट खरीप कांद्याची आवक वाढलीनाशिक : जिल्ह्यात मार्चअखेर, बँक बंदमुळे रोकड...
सोयाबीनला उच्चांकी सहा हजारांचा भावलातूर/अकोला ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात...