Agriculture news in Marathi Cucumber, flower prices improve in Pune | Agrowon

पुण्यात काकडी, फ्लॉवरच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 मार्च 2021

गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २८) भाजीपाल्याची सुमारे ८० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत घट झाल्याने काकडी, फ्लॉवर, मटार, पावटा यांच्या दरात वाढ झाली होती. इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते.

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २८) भाजीपाल्याची सुमारे ८० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत घट झाल्याने काकडी, फ्लॉवर, मटार, पावटा यांच्या दरात वाढ झाली होती. इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते.

पंजाब, राजस्थानसह मध्य प्रदेशातून सुमारे १२ ट्रक मटार, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ४ ट्रक, तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून तोतापुरी कैरी २ टेम्पो, राजस्थानहून १० ट्रक गाजर व मध्य प्रदेशातून लसणाची १५ ट्रक आवक झाली होती. तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ३०० पोती, कोबी ५ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ टेम्पो, तांबडा भोपळा ८ टेम्पो, टॉमेटो ७ हजार क्रेट, भुईमुगाच्या शेंगा ४० गोणी, मटार ४० गोणी, पावटा ३ टेम्पो, तर गावरान कैरी २ टेम्पो आणि स्थानिक कांदा ६० ट्रक, तर गुजरात येथून पांढरा कांदा ५ ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागांतून ३५ ट्रक बटाटा आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : २२०-२७०, पांढरा कांदा - १२०-१५०, बटाटा : ८०-१२०, लसूण : ४००-७००, आले : सातारी १००-२००, भेंडी : ३००-३५०, गवार : ४००-५००, टोमॅटो : ६०-१००, दोडका : २५०-३५०, हिरवी मिरची : २५०-४००, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : २००-२५०, काकडी : १००-२००, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी २००-२२०, पापडी : २००-२५०, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : ४०-६०, वांगी : १००-२००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : २००-३००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : ४००-५००, गाजर : १००-१४०, वालवर : २५०-३००, बीट : ६०-८०, घेवडा : ३५०-४५०, कोहळा : १००-१२०, आर्वी : २००-२२०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २००-२२०, पावटा : ४००-४५०, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार : २००-३००, स्थानिक -३००-४००, तांबडा भोपळा : ६०-८०, सुरण : १८०-२००, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : १२०-२००, ॲस्टर : (५ जुड्या) ८-१२, सुटा ५०-८०, कापरी : २०-४०, शेवंती : ६०-१००, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : १५-४०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००,  जरबेरा : १०-३०, कार्नेशियन : १००- १५०, शेवंती काडी ६०-१२०, लिलियम (१० काड्या) ६००-१०००, ऑर्चिड २००-४००, ग्लडिओ
(१० काड्या) : ४०-६०.

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे १ लाख ७५ हजार, तर मेथीची ७० आणि हरभऱ्याच्या १० हजार जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १००-६००, मेथी : २००-५००, शेपू : ६००-१०००, कांदापात : ६००-८००, चाकवत : ६००-८००, करडई : ३००-५००, पुदिना : १००-२००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ३००-४००, चुका : ४००-६००, चवळई : ३००-४००, पालक : ५००-६००, हरभरा गड्डी ः
 ३००-६००.

फळबाजार
लिंबांची सुमारे २ हजार गोणी, संत्री सुमारे ४०, तर मोसंबी सुमारे ३० टन, डाळिंब ३० टन, पपई १० टेम्पो, चिकू सुमारे २ हजार गोणी, कलिंगड आणि खरबूज प्रत्येकी सुमारे २० टेम्पो, पेरू १०० क्रेट, स्ट्रॉबेरी १० टन आवक झाली होती. तर द्राक्षांची बारामती, फलटण, सांगली, इंदापूर, पंढरपूर भागांतून ३० टन आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-६००, मोसंबी : (३ डझन) : ३८०-४८० (४ डझन) : १६०-१८०, संत्रा : (१० किलो) : २५०-६००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-२५०, गणेश : १०-५०, आरक्ता ४०-१००. कलिंगड : ८-२०, खरबूज : १५-२२, पपई : ५-१०, चिकू (१० किलो): १००-५००, स्ट्रॉबेरी (२ किलो) ६०-१८०. पेरू (२० किलो) - ६००-७५०. द्राक्षे - जम्बो (१० किलो) ५००-९००, सुपर सोनाका (१५ किलो) ७००-११००, माणिक चमण (१५) ५००-७००. कृष्णा (१०) ६००-९००.

मटण-मासळी
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. २८) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन, खाडीची ३०० किलो, तर नदीच्या मासळीची दोन टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १५ टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

दरम्यान, देशाच्या पश्‍चिम किनारपट्टीसह गुजरात व आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवरून शहरातील बाजारात मासळीची आवक होत आहे. तुलनेने आवक कमी असल्याने मासळीच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. बर्ड फ्लूचे संकट कमी झाल्याने आणि जनजागृती झाल्याने चिकनची मागणी पूर्वपदावर आली आहे. आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने चिकनसह, मटण, अंडीचे दर स्थिर होते.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव)
पापलेट : कापरी : १३००-१४०० मोठे १३००-१४००, मध्यम : ८००-१०००,  लहान ७००-७५०, भिला : ५५०, हलवा : ४८०-५५०, सुरमई : ६००-७००, रावस : लहान ६००-७००,  मोठा : ८००-१०००, घोळ : ७५०, भिंग : ४००, करली : ३२०, करंदी : (सोललेली) ४८०, पाला :  लहान ८००-१००० मोठे : १२००-१४००, वाम : ३६०-९००, ओले बोंबील :२००-२८०,
कोळंबी ः लहान २८०, मोठे ४४०-५२०, जंबो प्रॉन्स : १२००  किंग प्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १०००-१२००, मोरी : २८०-३६०, मांदेली : १२०, राणीमासा : २००, खेकडे : २००-२८०, चिंबोऱ्या : ६००-७००.
खाडीची मासळी : सौंदाळे : २८०-३६०, खापी : २४०-२८०, नगली : ४४०-६००, तांबोशी : ४४०, पालू : २८०, लेपा : १४०-२८०, शेवटे : २०० बांगडा : लहान १८०-२०० , मोठे २४०, पेडवी : १००, बेळुंजी : १६०, तिसऱ्या : ३००-३६०,  खुबे : १२०-१४०, तारली : १६०-२००,
नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १६०-१८०, मरळ : ४८०, शिवडा : २८०, खवली : २८०-३००, आम्ळी : १६०, खेकडे : २००, वाम : ५५०.
चिकन : चिकन : १६०, लेगपीस : २०० जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २६०.
अंडी : गावरान : शेकडा : ८७० डझन : १२० प्रति नग : १०, इंग्लिश : शेकडा : ४५५ डझन : ६० प्रतिनग : ५.
मटण : बोकडाचे : ६६० बोल्हाईचे : ६६० खिमा : ६६०, कलेजी : ७००.


इतर बाजारभाव बातम्या
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकूनजळगाव :  खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा...
लातूर, अकोल्यात तुरीने ओलांडला सात...लातूर/अकोला ः राज्यात काही दिवसांपासून तूर, हरभरा...
खानदेशातील बाजारांमध्ये मक्याची आवक घटलीजळगाव : खानदेशात बाजारात मक्याची आवक मध्यंतरी...
औरंगाबादेत आंबा खातोय भाव, ज्वारीचे दर...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये कारले, हिरव्या मिरचीच्या दरात...नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, भेंडी...सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नाशिकमध्ये लेट खरीप कांद्याची आवक वाढलीनाशिक : जिल्ह्यात मार्चअखेर, बँक बंदमुळे रोकड...
सोयाबीनला उच्चांकी सहा हजारांचा भावलातूर/अकोला ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात...