केळी पिकावरील कुकुंबर मोझॅक व्हायरसचे नियंत्रण

यवतमाळ जिल्ह्यामध्ये महागाव तालुका केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, तालुक्यातील काही भागांमध्ये केळी पिकांमध्ये कुकुंबर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
infestation of cucumber mosaic virus on banana leaves
infestation of cucumber mosaic virus on banana leaves

यवतमाळ जिल्ह्यामध्ये महागाव तालुका केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, तालुक्यातील काही भागांमध्ये केळी पिकांमध्ये कुकुंबर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नव्या लागवड केलेल्या शेतकऱ्यांमध्ये या विषाणूजन्य रोगामुळे चिंतेचे वातावरण आहे. या रोगाला रोखण्याविषयीची माहिती घेऊ. लक्षणे  

  • झाडाच्या वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर रोगाचे संक्रमण होऊ शकते. रोगाचे संक्रमण मुख्यत: पानांवर दिसते. 
  • सुरवातीच्या लक्षणात सलग किंवा तुटक पट्ट्यांची ठिगळासारखी संरचना शिरांना समांतर येते. पाने पट्टेदार दिसू लागतात. 
  • कालांतराने झाडे पूर्णत: विकसित होत नाही. पानांच्या कडा अनियमितपणे गोळा होऊन करपट ठिपके दिसू शकतात. 
  • कोवळी पाने देखील आकाराने लहान असतात. पर्णकोषांवर कुजलेले भाग दिसतात. फांद्या व कंदांवरही रोगाचा प्रसार होऊ शकतो.
  • जुन्या पानांवर करपटपणाची लक्षणे काळ्या किंवा जांभळ्या रेषातून दिसतात. अशी गळून पडतात. 
  • संक्रमित झाड परिपक्व होत नाहीत. घड तयार करू शकत नाहीत. 
  • फळे नेहमी लक्षणे दाखवत नसली तरी आकाराने लहान दिसतात. त्यावर पिवळ्या रेषा किंवा करपटपणा दिसतो.
  • प्रसार

  • या रोगाचा प्राथमिक प्रसार कंदामार्फत तर दुय्यम प्रसार मावा किडीमार्फत होतो. 
  • मावा किडीच्या काही प्रजाती वाहक म्हणून काम करतात. त्यांच्यामुळे विषाणू बागेतील एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पोचतात. 
  • काकडी वर्गातील पिके, केणा, चंदनवेल अशी तणे, टोमॅटो, वांगी, मिरची अशा पिकांसह सुमारे ८०० पिकांच्या जाती या विषाणू रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. 
  • पावसाळ्याच्या सुरवातीला आणि शेवटी वारंवार पाऊस यासारखी ठराविक हवामान परिस्थिती संक्रमणास अनुकूल असते. 
  • प्रतिबंधक उपाय

  • विषाणू रोगांचा प्राथमिक प्रसार प्रामुख्याने कंदामार्फत होतो. ते टाळण्यासाठी निरोगी बागेतील कंद निवडावेत. 
  • उतिसंवर्धित रोपांपासून लागवड करताना नोंदणीकृत उतीसंवर्धन प्रयोगशाळेतून विषाणू निर्देशांक तपासलेली, निरोगी व जोमदार रोपे खरेदी करावीत. 
  • रोपनिर्मितीसाठी स्वतंत्र मातृ बाग असणे आवश्‍यक आहे. 
  • रोगाची लक्षणे दिसताच रोगट झाडे कंदासकट उपटून नष्ट करावीत.
  • या रोगाचा दुय्यम प्रसार मावा किडीच्या प्रजातीमार्फत होतो. 
  • मावा नियंत्रण (फवारणी  प्रति लिटर पाणी)

  • डायमिथोएट (३० ईसी) २ मिली किंवा
  • थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.२ ग्रॅम किंवा
  • इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मिली
  • (लेबल क्लेम शिफारस)
  • संपर्क-  डॉ. विपुल वाघ, ८९६१४१५०८८ (विषय विशेषज्ज्ञ, पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे),  ता. दारव्हा, जि. यवतमाळ.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com