agriculture news in marathi cucumber mosaic virus in banana | Agrowon

केळी पिकावरील कुकुंबर मोझॅक व्हायरसचे नियंत्रण

डॉ. विपुल वाघ, डॉ. नंदकिशोर हिरवे
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

यवतमाळ जिल्ह्यामध्ये महागाव तालुका केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, तालुक्यातील काही भागांमध्ये केळी पिकांमध्ये कुकुंबर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

यवतमाळ जिल्ह्यामध्ये महागाव तालुका केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, तालुक्यातील काही भागांमध्ये केळी पिकांमध्ये कुकुंबर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नव्या लागवड केलेल्या शेतकऱ्यांमध्ये या विषाणूजन्य रोगामुळे चिंतेचे वातावरण आहे. या रोगाला रोखण्याविषयीची माहिती घेऊ.

लक्षणे  

 • झाडाच्या वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर रोगाचे संक्रमण होऊ शकते. रोगाचे संक्रमण मुख्यत: पानांवर दिसते. 
 • सुरवातीच्या लक्षणात सलग किंवा तुटक पट्ट्यांची ठिगळासारखी संरचना शिरांना समांतर येते. पाने पट्टेदार दिसू लागतात. 
 • कालांतराने झाडे पूर्णत: विकसित होत नाही. पानांच्या कडा अनियमितपणे गोळा होऊन करपट ठिपके दिसू शकतात. 
 • कोवळी पाने देखील आकाराने लहान असतात. पर्णकोषांवर कुजलेले भाग दिसतात. फांद्या व कंदांवरही रोगाचा प्रसार होऊ शकतो.
 • जुन्या पानांवर करपटपणाची लक्षणे काळ्या किंवा जांभळ्या रेषातून दिसतात. अशी गळून पडतात. 
 • संक्रमित झाड परिपक्व होत नाहीत. घड तयार करू शकत नाहीत. 
 • फळे नेहमी लक्षणे दाखवत नसली तरी आकाराने लहान दिसतात. त्यावर पिवळ्या रेषा किंवा करपटपणा दिसतो.

प्रसार

 • या रोगाचा प्राथमिक प्रसार कंदामार्फत तर दुय्यम प्रसार मावा किडीमार्फत होतो. 
 • मावा किडीच्या काही प्रजाती वाहक म्हणून काम करतात. त्यांच्यामुळे विषाणू बागेतील एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पोचतात. 
 • काकडी वर्गातील पिके, केणा, चंदनवेल अशी तणे, टोमॅटो, वांगी, मिरची अशा पिकांसह सुमारे ८०० पिकांच्या जाती या विषाणू रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. 
 • पावसाळ्याच्या सुरवातीला आणि शेवटी वारंवार पाऊस यासारखी ठराविक हवामान परिस्थिती संक्रमणास अनुकूल असते. 

प्रतिबंधक उपाय

 • विषाणू रोगांचा प्राथमिक प्रसार प्रामुख्याने कंदामार्फत होतो. ते टाळण्यासाठी निरोगी बागेतील कंद निवडावेत. 
 • उतिसंवर्धित रोपांपासून लागवड करताना नोंदणीकृत उतीसंवर्धन प्रयोगशाळेतून विषाणू निर्देशांक तपासलेली, निरोगी व जोमदार रोपे खरेदी करावीत. 
 • रोपनिर्मितीसाठी स्वतंत्र मातृ बाग असणे आवश्‍यक आहे. 
 • रोगाची लक्षणे दिसताच रोगट झाडे कंदासकट उपटून नष्ट करावीत.
 • या रोगाचा दुय्यम प्रसार मावा किडीच्या प्रजातीमार्फत होतो. 

मावा नियंत्रण (फवारणी  प्रति लिटर पाणी)

 • डायमिथोएट (३० ईसी) २ मिली किंवा
 • थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.२ ग्रॅम किंवा
 • इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मिली
 • (लेबल क्लेम शिफारस)

संपर्क-  डॉ. विपुल वाघ, ८९६१४१५०८८
(विषय विशेषज्ज्ञ, पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे),  ता. दारव्हा, जि. यवतमाळ.) 


इतर फळबाग
मणी तडकण्याच्या समस्येसाठी राहा सतर्कनुकत्याच झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागेमध्ये...
केळी सल्लामृग बागेतील केळी गर्भावस्थेत आहेत. कांदेबाग लागवड...
मणी तडकण्यासह भुरी रोगाचा प्रादुर्भाव...सध्याच्या वातावरण परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी ढगाळ...
द्राक्ष बागेत घडांना पेपर लावताना...अलीकडे वातावरणातील बदलांमुळे द्राक्ष बागेमध्ये सन...
डाळिंब पिकातील रोगांचे व्यवस्थापनतेलकट डाग रोग तेलकट डागासाठी फळ पिकाच्या...
डाळिंब पिकातील बहारनिहाय अन्नद्रव्ये,...मृग बहार (मे-जून पीक नियमन) बागेची अवस्था ः फळ...
वाढत्या थंडीमध्ये फळबागांचे व्यवस्थापनसध्या वाढलेल्या थंडीचा परिणाम  कृषी...
भुरी, डाऊनी मिल्‍ड्यू रोगाच्या...बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बागायतदारांसमोर नवे...
फळबागकेंद्रित शेतीतून अर्थकारण केले...केळवद (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील गणेश...
द्राक्ष बागांमध्ये भुरी,डाऊनी वाढण्याची...सध्याच्या काळात हवामानामध्ये बदल होत आहेत. या...
पेरू फळबागेतील अन्नद्रव्य व्यवस्थापनपेरू हे बहुवार्षिक फळपीक असून, त्याला वर्षभर फुले...
केळी पिकातील करपा, कंद कुजव्या रोगाचे...उशिरापर्यंत लांबलेला पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे...
मणीगळ, मणी विरळणी यांकडे लक्ष द्यावेसध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेतील वातावरणाचा...
कृषी सल्ला ( कोकण विभाग)नारळ   फळधारणा वाढत्या तापमानासोबतच...
आंब्यावरील कीड, रोग नियंत्रण व्यवस्थापनकोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही...
तापमानात घट होण्याच्या स्थितीत...सध्याच्या परिस्थितीत निवार चक्रीवादळ तमिळनाडू व...
ढगाळ, पावसाळी वातावरणात करावयाच्या...सध्याच्या परिस्थितीत ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असून...
हिवरेबाजार शिवारात सीताफळांचा गोडवाआदर्श गाव हिवरेबाजार (ता.जि. नगर) गावासह...
थंडीमध्ये केळी बागेची घ्यावयाची काळजीसद्यःस्थितीत खानदेश व महाराष्ट्रातील अन्य भागात...
कीड रोगांच्या नियंत्रणासाठी आतापासूनच...कोकण विभागातील उष्ण व दमट हवामान आंबा पिकावर...