Agriculture news in marathi Cucumber in Parbhani costs Rs. 600 to 1200 per quintal | Agrowon

परभणीत काकडी ६०० ते १२०० रुपये क्विंटल

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.११) काकडीची २५० क्विंटल आवक होती. काकडीला प्रतिक्विंटलला ६०० ते १२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.११) काकडीची २५० क्विंटल आवक होती. काकडीला प्रतिक्विंटलला ६०० ते १२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. कारल्याची १२ क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २० क्विंटलला आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्याची (देवडागंर) ३० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला १५००  त २५०० रुपये दर मिळाले. 

पालेभाज्यांमध्ये पालकाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. शेपुची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. चुक्याची ६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले. मेथीच्या १५ हजार जुड्यांची आवक झाली. त्यांना प्रतिशेकडा ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची २५० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला २००० ते ४००० रुपये दर मिळाले. 

शेंगवर्गीय भाज्यामध्ये गवारीची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. चवळीची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची १० क्विंटल आवक झाली.  प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. वांग्यांची ६५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची १८०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला ४०० ते ७०० रुपये रुपये दर मिळाले.

हिरव्या मिरचीची ६५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटलला १८०० ते २५०० रुपये मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ७० क्विंटल आवक, तर दर २००० ते ३००० रुपये, कोबीची ६० क्विंटल आवक, दर ६०० ते १००० रुपये, भेंडीची २५ क्विंटल आवक, दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल मिळाले. 

भुईमूग शेंगांना २५०० ते ४००० रुपये 

लिंबांची ३० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. बीटरुटची ६ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विटंलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. भुईमूग शेंगांची (ओल्या) ८० क्विंटल आवाक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. मक्याची २५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ६०० ते १२०० रुपये दर मिळाले.


इतर बाजारभाव बातम्या
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात...
सोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
नवरात्रोत्सवामुळे फूल बाजाराला `रंग`पुणे: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत आवळ्यांना सरासरी ११०० रुपये दरपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात वांगी सरासरी १५०० ते ८००० रूपयेनाशिकमध्ये ३००० ते ५५०० रुपये नाशिक : येथील...
नाशिकमध्ये वांग्यांना ५५०० सरासरी रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात मुगाला सरासरी ५९०० रुपये दरअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात टोमॅटो, ढोबळी मिरची...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्यांच्या दरात सुधारणा,...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाला दरात सुधारणा नगरः जिल्ह्यात सतत होत असलेल्या पावसामुळे मागील...
पुण्यात हिरवी मिरची, फ्लॉवरच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
नगरमध्ये मुगाला सरासरी ५५००, उडदाला...नगर : बाजारात मुगाची व उडदाची मोठ्या प्रमाणात आवक...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरचीला सरासरी ५५००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मुंबई बाजार समितीत कांद्याच्या दरात...मुंबई : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी...
परभणीत भुईमूग शेंगा सरासरी ४२५० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात डाळिंबांना ३०० ते १२००० रूपये दरनाशिकमध्ये ३०० ते १२००० रुपये नाशिक : येथील...