काकडीच्या दरात सुधारणा, फळभाज्यांचे दर स्थिर

मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक काहीशी कमी झाली आहे. मात्र तुलनेत मागणीही घटली आहे. त्यामुळे वांगी, टोमॅटो आणि कारल्याच्या भावात घट झाली आहे. तर काकडीच्या भावात वाढ झाली आहे.
Cucumber prices improve, fruit and vegetable prices stabilize
Cucumber prices improve, fruit and vegetable prices stabilize

पुणे : मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक काहीशी कमी झाली आहे. मात्र तुलनेत मागणीही घटली आहे. त्यामुळे वांगी, टोमॅटो आणि कारल्याच्या भावात घट झाली आहे. तर काकडीच्या भावात वाढ झाली असून, अन्य फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची व्यापाऱ्यांनी दिली.

गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २३) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ८० ते ९० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. परराज्यांतून मध्य प्रदेशमधून २५ ते २६ ट्रक मटार, गुजरात, कर्नाटक येथून ८ ते १० ट्रक हिरवी मिरची, राजस्थान येथून ८ ते १० ट्रक गाजर, उत्तर प्रदेशातून कोबी ३ ते ४ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसूण १२ ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून सातारी आले १२०० ते १४०० पोती, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ६ ते ७ टेम्पो, टोमॅटो १० ते ११ हजार क्रेट्स, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा १२० ते १२५ ट्रक, आग्रा, इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागांतून बटाटा २८ ते ३० ट्रक इतकी आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव  कांदा : २००-२६०, बटाटा : ८०-१४०, लसूण : १००-२५०, आले सातारी : १००-२००, भेंडी : ५००-७००, गवार : गावरान व सुरती ७००-९००, टोमॅटो : १००-२००, दोडका : २५०-३५०, हिरवी मिरची : ४००-५५०, दुधी भोपळा : १५०-२५०, चवळी : ४००-४५०, काकडी : २००-२५०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : १८०-२००, पापडी : २००-२५०, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : १००-१६०, कोबी : १६०-२२०, वांगी : २००-३५०, डिंगरी : ३००-३५०, नवलकोल : १५०-१६०, ढोबळी मिरची : ५००-६००, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : १५०-२००, शेवगा : १२००-१५००, गाजर : १५०-१८०, वालवर : १५०-२००, बीट : १८०-२००, घेवडा : २५०-३००, कोहळा :१००-१५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ३५०-४००, मटार : २४०-२८०, पावटा : २५०-३५०, तांबडा भोपळा :६०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पेरू, सीताफळ, लिंबाच्या भावांत वाढ मार्केट यार्डात रविवारी (ता. २३) पेरू, सीताफळ, बोरे, डाळिंब, मोसंबी, लिंबू आणि कलिंगडाच्या भावात वाढ झाली असून, चिकूच्या भावात घट झाली आहे. तर खरबूज, पपई, अननस, संत्रा आणि द्राक्षांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कलिंगड पाच ते सहा टेम्पो, खरबूज तीन ते चार टेम्पो, अननस ७ ट्रक, मोसंबी १५ ते २० टन, संत्री २० ते २५ टन, डाळिंब ३० ते ३५ टन, लिंबे एक ते दीड हजार गोणी, पेरू ३०० ते ४०० क्रेट, चिकू दोन हजार बॉक्स, बोरे १५० गोणी, द्राक्षे १५ ते १६ टन इतकी आवक झाली. लिंबाच्या गोणीमागे ५० ते ७० रुपयांनी वाढ झाली आहे. पेरूच्या वीस किलोच्या क्रेटमागे १०० रुपये, सीताफळाच्या भावात वीस टक्के, बोरे वीस टक्के, डाळिंबाच्या भावात १५ ते २० टक्के, कलिंगड दोन रुपये, तर मोसंबीच्या भावात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र चिकूच्या भावात गोणीमागे शंभर रुपयांनी घट झाली आहे.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे  लिंबे (प्रति गोणी) : ३५०-४५०, अननस (डझन) : ७०-२७०, डाळिंब (किलो) भगवा : ६०-२००, आरक्ता : २५-१००, गणेश १५-६०, मोसंबी : (३ डझन) : ४२०-७००, (४ डझन) : २०० ते ३५०, संत्रा : (१० किलो) : ३००-७००, कलिंगड : १२-१८, खरबूज : २२-३०, पपई : १०-१२, चिकू (१० किलो) १००-४००, पेरू (२० किलो): ४००-५००, बोरे चमेली (१० किलो) : २७०-३००, उमराण: ८०-१००, चेकनट : ६००-६५०, चण्यामण्या : ८००-९००़ द्राक्षे जम्बो (१० किलो) : ४००-८००, सोनाका : ३५०-७००, माणिकचमन : ३००-४००.

फुलांचे भाव स्थिर मार्केट यार्डात रविवारी फुलांना मागणी तुलनेने कमी होती; मात्र दर आणि आवक स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-६०, गुलछडी : १००-१५०, ॲस्टर (५ जुड्या) ः १०-१६, सुटा ८०-१००, कापरी : ४०-६०, शेवंती : ६०-१२०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : २०-३०, गुलछडी काडी : ३०-६०, डच गुलाब (२० नग) : १००-२००, जरबेरा : ३०-४०, कार्नेशियन : १००-१५०, शेवंती काडी १५०-२००, लिलीयम (१० काड्या) १०००-१२००, आॅर्चिड ५००-७००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०.

मासेमारी कमी होत असल्याने बाजारात मासळीची आवक कमी होत आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या मासळींच्या दरात वाढ झाली आहे. चिकन, मटण, अंड्यांचे दर स्थिर आहेत. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची १५ ते १६ टन, खाडीतील मासळी २०० ते ४०० किलो, नदीतील मासळी एक ते दीड टन तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची एकूण मिळून १२ ते १५ टन आवक झाली. बाजारात खोल समुद्रातील मासळीची आवक कमी झाली असून सर्व प्रकारच्या मासळीच्या दरात वाढ झाली असल्याची माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. चिकन तसेच अंड्यांचे दर स्थिर असल्याचे चिकन व्यापारी रूपेश परदेशी यांनी सांगितले. मटणाचे दर स्थिर असल्याचे मटण व्यापारी प्रभाकर कांबळे यांनी सांगितले. 

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर)  पापलेट : कापरी : १६००-१८००, मोठे- १४००-१६०० मध्यम : १०००-१२००, लहान ८००-९००, भिला : ६००-७००, हलवा : ५००-६००, सुरमई : ६००-७५०, रावस : लहान ६००-६५०, मोठा : ८००-९००, घोळ : ५५०-६००, करली : २८०-३६०, पाला : ८००-१४००, वाम : ९००, करंदी-४४०-४८०, ओले बोंबील : २००-२८०, भिंग-४०० 

कोळंबी  लहान १८०-२८०, मोठी-४८०-६००, जंबो प्रॉन्स : १२००-१५००, किंग प्रॉन्स : ७५०-८५०, लॉबस्टर : १४००-१६००, मोरी : २००-२८०, खेकडे : ३००-३६०. चिंबोऱ्या : ६००, मांदेली-१००-१४०, राणीमासा-१६०-२००. 

खाडीची मासळी  सौंदाळे-१८०-३००, खापी-२००-३२० नगली : ३२०-६५०, तांबोशी : ३६०, पालू-३००, बांगडा : लहान-१६०, बांगडा मोठा-२००-२४०, शेवटे २००-२८०, तिसऱ्या-२४०-२८०, खुबे : १००-१२०, लेपा-१२०-२००, पेडवी-१००-१२०, वेळुंजी-१६०-२००, तारली-१५०-१८०. नदीतील मासळी : रहू-१६०-१८०, कतला-१६०-१८०, मरळ-४००-५२०, शिवडा-२४०, खवली- २४०, आम्ळी- १००-१६०, खेकडे- २००-२४०, वाम-५००-५५०. 

मटण ः बोकडाचे ६८०, बोलाईचे- ६८०, खिमा-६८० , कलेजी-७००.  चिकन ः २००, लेगपीस-२५०, जिवंत कोंबडी-१५०, बोनलेस-३००.  अंडी : गावरान शेकडा ८८०, डझन १२०, प्रतिनगास १०. इंग्लिश शेकडा ४८०, डझन ६६, प्रतिनगास ५.५०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com