परभणीत काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये

परभणीत काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये
परभणीत काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १०)  काकडीची ३५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेवग्याची ८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ५००० दर मिळाले. गवारीची १२ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये, चवळीची ४ क्विंटल आवक, तर दर २५०० ते ४००० रुपये मिळाले. पालेभाज्यांमध्ये पालकाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. शेपूची ७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. मेथीच्या ३ हजार जुड्यांची आवक झाली. तिला प्रतिशेकडा ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ८० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये दर मिळाले.

वांग्याची ४५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ६०० क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल १७०० ते २५०० रुपये, हिरव्या मिरचीची ४० क्विंटल आवक, तर दर ३००० ते ३५०० रुपये, ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक, तर दर ३५०० ते ४००० रुपये, भेंडीची १५ क्विंटल आवक, तर दर २००० ते ३५०० रुपये मिळाले. फ्लॅावरची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये दर मिळाले. कोबीची २५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची ६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५०० ते ४५०० रुपये दर मिळाले. दोडक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बिट रुटची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले.

पातीच्या कांद्याची ४ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटंल ७०० ते १५०० रुपये दर मिळाले. कैरीची २०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते २००० रुपये दर मिळाले. लिंबांची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ६००० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजारातील सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com