agriculture news in Marathi cucumber rate down Maharashtra | Agrowon

काकडी तोडणीलाही महाग

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

जिल्ह्यात भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र दरात घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

सिन्नर, जि. नाशिक : जिल्ह्यात भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र दरात घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तालुक्यातील शिवडा येथील भाजीपाला उत्पादक उत्तम हारक यांच्या काकडीला प्रति २० किलोसाठी अवघा ३५ रुपये भाव मिळाला आहे. बाजारात २० ते २५ रुपये किलो विकल्या जाणाऱ्या काकडीला घाऊक खरेदीदारांकडून नीचांकी दर दिला जात आहे. त्यामुळे काढणी अन् वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने काकडी उत्पादक अडचणीत आले आहेत.

सध्या काकडीचा हंगाम जोरात सुरू असून, सिन्नरच्या पश्‍चिम पट्ट्यात शेते बहरली आहेत. एकरी उत्पादन खर्च लाखाच्या घरात आणि हातात पडणारे उत्पन्न मात्र काही हजारांतच, अशी अवस्था काकडी उत्पादक शेतकऱ्याची आहे. पांढुर्ली, शिवडेचा परिसर संपूर्ण जिल्ह्यात दर्जेदार काकडी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पूर्वीच्या पद्धतीत काकडी लागवडीचा खर्च काहीसा कमी होता. त्या वेळी केवळ घरगुती बियाणे वापरले जायचे. तर आता बियाणे बाहेरून विकत घ्यावे लागते. इतर खर्च पाहता एकरी लाखभर रुपये तरी शेतकऱ्याला गुंतवावे लागतात. बाजारभाव स्थिर राहिल्यास हा खर्च सहजपणे वसूल होतो. परंतु सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना काकडीने झटका दिल्याचे चित्र आहे.

४०० ते ४५० रुपयांच्या घरात असणारी २० किलोची जाळी थेट ३५ ते ४० रुपयांवर घसरली असून, निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन घेणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. मातीमोल दरात काकडीची खरेदी व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे. नाशवंत माल असल्याने व शेतात अधिक काळ पीक ठेवता येत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होते. आज मिळणारा कवडीमोल भाव बघता काढणी आणि वाहतूक खर्च देखील सुटत नाही. शेतात पिकवलेला माल कमी किमतीत विकताना शेतकरी अजूनच तोट्यात आहे. 

प्रतिक्रिया
खर्च करूनही हाती काहीच नाही, त्यामुळे सगळं गणित बिघडलं आहे. काकडीची तोडणी झाल्यानंतर प्रतवारी करून माल बाजारात आणूनही दर मिळत नाही. त्यामुळे लागवडी उपटून टाकण्याची वेळ आली आहे. 
- उत्तम हारक, भाजीपाला उत्पादक, शिवडा, ता. सिन्नर


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...