Agriculture news in marathi Cucumber rate Rs 500 to 2000 per quintal in the state | Agrowon

राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

अकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दराने विक्री झाली. १० क्विंटलपर्यंत आवक झाली होती. किरकोळ बाजारात काकडी २५ ते ३० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात होती. 

अकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दराने विक्री झाली. १० क्विंटलपर्यंत आवक झाली होती. किरकोळ बाजारात काकडी २५ ते ३० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात होती. 

सध्या थंडीचा जोर वाढू लागल्याने काकडीची मागणी कमी आहे. अशा परिस्थितीत बाजारात नाशिक भागातून काकडीची दररोज पाच ते दहा क्विंटलदरम्यान आवक सुरू आहे.  गुरुवारी कमीतकमी ८०० व जास्तीत जास्त १२०० पर्यंत दर मिळाला. गेल्या काही दिवसांत काकडीचा दर स्थिरावलेला असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. थंडीचा जोर वाढल्यानंतर मागणीमध्ये आणखी उतार होण्याची शक्यताही सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.

परभणीत प्रतिक्विंटला ५०० ते १००० रुपये

परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ५) काकडीची ७० क्विंटल आवक होती. काकडीला प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील सिंगणापूर, बोरवंड, कोक, हिंगोली जिल्ह्यांतील गुंडा परिसरातून काकडीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी काकडीची २५ ते ७० क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटलला सरासरी ५०० ते २५०० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. ५) काकडीची ७० क्विंटल आवक झाली. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये होते. किरकोळ विक्री प्रतिकिलो २० ते ४० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

जळगावात ८०० ते १५०० रुपये

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ५) काकडीची सात क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये असा मिळाला. आवक पाचोरा, एरंडोल, जामनेर, जळगाव, यावल या भागांतून होत आहे. दर स्थिर असून, महिनाभरात किमान दर ६०० रुपायांखाली गेलेले नाहीत. जिल्ह्यात लहान आकाराच्या काकडीची अधिक आवक होत आहे, अशी माहिती मिळाली.

औरंगाबादमध्ये ६०० ते ७०० रुपये

औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काकडीच्या आवक व दरात चढउतार पाहायला मिळाला. गुरुवारी (ता. ५) काकडीची आवक ५८ क्‍विंटल, तर दर ६०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये १९ नोव्हेंबरला  २० क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला १६०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २६ नोव्हेंबरला ३४ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी दर १००० ते ३४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २७ नोव्हेंबरला ३७ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३० नोव्हेंबर रोजी १९ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी काकडीचे दर ८०० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल होते. 

एक डिसेंबर रोजी ३७ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला ६०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २ डिसेंबर रोजी ३१ क्‍विंटल आवक झाली. दर ४०० ते ८०० रूपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३ डिसेंबर रोजी ५२ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी १००० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४ डिसेंबर रोजी ६३ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ५०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

पुण्यात प्रतिक्विंटल १००० ते १४०० रुपये

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ५) काकडीची सुमारे १० टेम्पो आवक झाली. या वेळी दहा किलोला सुमारे १०० ते १४० रुपये दर मिळाला.

पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, नगर, कोल्हापूर भागातून काकडीची आवक सुरू आहे. सध्या होणारी आवक ही सरासरीपेक्षा अधिक असल्याचे ज्येष्ठ अडतदार विलास 
भुजबळ यांनी सांगितले.

गेल्या चार दिवसांतील आवक (क्विंटल) 

दिनांक आवक दर 
३७० ३००-१००० 
२९५  ५००-१४०० 
२  ६१० ७००-१४००
४१५ ७००- १६००

साताऱ्यात काकडीला प्रतिक्विंटला

१५०० ते २००० रुपयांचा दर

सातारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी (ता.५) काकडीची ३५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते २००० असा दर मिळाला. गेल्या तीन सप्ताहापासून काकडीचा १००० ते २००० या दरम्यान दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

काकडीची कोरेगाव, जावळी, सातारा तालुक्यातून आवक होत आहे. बाजार समितीत मंगळवारी (ता. ३) काकडीची २१ क्विंटल आवक होऊन २००० ते २५०० असा दर मिळाला. हा अपवाद वगळता काकडीस प्रतिक्विटंल १००० ते २००० या दर दरम्यान मिळाला आहे. २८ नोव्हेंबरला काकडीची २८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० असा दर मिळाला आहे. काकडीची २० ते २५ रुपये किलोप्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे.

नागपुरात१००० ते १३०० रुपये

नागपूर येथील कळमणा बाजारात काकडीची जेमतेम १५० क्‍विंटलची आवक आहे. गुरुवारी (ता.५) बाजारात १४२ क्‍विंटल काकडी दाखल झाली. तिला १००० ते १३०० रुपये क्‍विंटलचा दर मिळाला. बाजारात गेल्या आठवड्यात काकडीचे दर १००० ते १४०० रुपये क्‍विंटल दरम्यान होते. या आठवड्यात हे दर काही वेळा मिळाल्याची माहिती व्यापारी सूत्रांकडून देण्यात आली. 

क्‍विंटलमागे सरासरी १०० रुपयांचा फरक असून काकडीचा दर्जा पाहून हे दर दिले जात आहेत. काकडीची आवकही जास्त प्रभावी होत नसून १२० ते १५० क्‍विंटल दरम्यान रोजची आवक आहे. किरकोळ बाजारात २५ ते ३० रुपये किलोने काकडीची विक्री होत आहे.

नाशिकमध्ये ५०० ते १२५० रुपये

 नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४) काकडीची आवक ७५३ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ५०० ते १२५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

मंगळवारी (ता. ३) काकडीची आवक ७५० क्विंटल होती. तिला प्रतिक्विंटल ८०० ते १७५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १३५० राहिला. सोमवारी (ता. २) आवक ७४२ क्विंटल, तर दर  ७५० ते १७५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १३२५ राहिला. शनिवारी (ता. ३०) आवक ७२० क्विंटल झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल ६५० ते २००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० राहिला. 
शुक्रवारी (ता. २९) काकडीची आवक १०७८ क्विंटल होती. तिला प्रतिक्विंटल ६०० ते १७५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० राहिला. बाजार समितीत सप्ताहाच्या सुरुवातीला आवक व दर चांगला राहिला. मात्र सप्ताहाच्या अखेरीस आवक व दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले.

कोल्हापुरात प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये

कोल्हापूर येथील बाजार समितीत काकडीस दहा किलोस ५० ते २०० रुपये दर मिळत आहे. बाजार समितीत दररोज ५०० ते ६०० करड्या आवक होत आहे. 

जिल्ह्यातील पश्चिम भागात काकडीचे उत्पादन होते. ऑक्टोबर मध्ये झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी काकडीचे नुकसान झाले. यामुळे मध्यंतरी काकडीची आवक कमी झाली होती. आता ती नियमित होत आहे. लग्नसराईमुळे येत्या काही दिवसांत काकडीची मागणी वाढण्याची शक्यता भाजीपाला विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर बाजारभाव बातम्या
सांगली बाजार समितीत नव्या हळदीचे सौदेसांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये सोयाबीन, ज्वारी स्थिर,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या दरात सुधारणा,...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये उडदाला क्विंटलला सात हजार...नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
बार्शीत तुरीची आवक वाढलीबार्शी, जि. सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात मेथी २५० ते ३००० रुपये शेकडासोलापुरात प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये सोलापूर...
नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकूननाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाला आवक घटली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात मका दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबीला सर्वसाधारण ३०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
राज्यात बटाटा १००० ते २६०० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १००० ते १२५० रुपये...
नाशिकमध्ये भेंडीला सर्वसाधारण २९१० रुपयेनाशिक : ‘‘येथील बाजार समितीमध्ये भेंडीची आवक ५२...
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणानाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये तूर ४००० ते ५५०० रुपये...नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात कांदा दरात सुधारणा सुरूच आहे. दर...
औरंगाबादमध्ये मक्यासह तुरीचे दर स्थिरजालना : येथील बाजार समितीमध्ये गत आठवड्यात ५ ते ९...
पुण्यात भोगीनिमित्त गाजर, मटारला मागणीपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...