Agriculture news in marathi The culmination of the discussion in Akola Zilla Parishad over urea issue | Agrowon

युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा परिषदेत घमासान

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र टंचाई निर्माण झाली असून हा मुद्दा मंगळवारी (ता. चार) झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत गाजला. सदस्यांनी या मुद्यावर आक्रमक होत, जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात युरियाचा पुरवठा झालेला असतानाही टंचाई कशी निर्माण झाली आहे, याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली. 

अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र टंचाई निर्माण झाली असून हा मुद्दा मंगळवारी (ता. चार) झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत गाजला. सदस्यांनी या मुद्यावर आक्रमक होत, जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात युरियाचा पुरवठा झालेला असतानाही टंचाई कशी निर्माण झाली आहे, याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली. 

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी (ता. ४) अध्यक्षा प्रतिभा भोजने होत्या. यावेळी उपाध्यक्षा सावित्री राठोड, सभापती पंजाबराव वडाळ, चंद्रशेखर पांडे, आकाश सिरसाट, मनिषा बोर्डे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, डाॅ. सुभाष पवार, कृषी विकास अधिकारी डाॅ. मुरली इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

बैठकीत सर्व पक्षीय सदस्यांनी युरीयाच्या मुद्यावर घमासान चर्चा केली. जिल्ह्यात वितरित झालेल्या युरियाची साठेबाजी झाल्याने टंचाई निर्माण झाल्याचे सांगितले. कृषी विभागाने एकाच ट्रेडर्सला 1600 बॅग युरियाचे वितरण कसे केले, असा प्रश्न उपस्थित केला. सदस्यांची मागणी व आक्रमकता पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी कटीयार यांनी या प्रकरणी साठ्याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. 

जिल्ह्यात युरिया खत शेतकऱ्यांना मिळत नसल्याने सर्वत्र ओरड होत आहे. अकोला जिल्ह्याला इतर जिल्हयांच्या तुलनेत युरियाचा अधिक पुरवठा झालेला असतानाही खत का मिळत नाही, असा प्रश्न सदस्यांनी विचारला. 
याअनुषंगाने अधिकाऱ्यांनी तक्रार आल्यास कारवाई करू, असे सांगताच गटनेते ज्ञानेश्वर सुलताने यांनी नाराजी व्यक्त केली. 

जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने यांनीही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव ठेवून काम केले पाहिजे, असा सल्ला दिला. या चर्चेत सदस्य गजानन पुंडकर, शिवसेना गटनेते गोपाल दातकर यांनीही सहभाग घेतला. 
 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...