भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
ताज्या घडामोडी
वातावरणपूरक संत्रा जातींचे संवर्धन करा : डवले
नागपूर संत्र्याला अधिकाधिक लोकप्रिय करीत शुद्ध स्वरूपातील, वातावरण पूरक संत्र्याच्या निवडक जातींचे जतन व वृद्धीकरण करणे काळाची गरज, असे मत राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केले.
अकोला : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः विदर्भातील संत्रा उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्यासाठी तसेच नागपूर संत्र्याला अधिकाधिक लोकप्रिय करीत शुद्ध स्वरूपातील, वातावरण पूरक संत्र्याच्या निवडक जातींचे जतन व वृद्धीकरण करणे काळाची गरज, असे मत राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केले.
संत्रा प्रजाती प्रकल्प उभारण्यासंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
या प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, फळशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शशांक भराड, प्रभारी विभागीय सहसंचालक शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदयकुमार नलावडे, महाबीज महाव्यवस्थापक प्रफुल्ल लहाने, अजय कुचे, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांच्यासह इतर
प्रामुख्याने उपस्थित होते. एकनाथ डवले म्हणाले, ‘‘संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः विदर्भातील संत्रा उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्यासाठी तसेच नागपूर संत्र्याला अधिकाधिक लोकप्रिय करीत शुद्ध स्वरूपातील, वातावरण पूरक संत्र्याच्या निवडक जातींचे जतन व
वृद्धीकरण करणे काळाची गरज असल्याचे तसेच अकोला कृषी विद्यापीठाद्वारे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या नेतृत्वाखाली या संदर्भात उल्लेखनीय कार्य होत आहे.
विदर्भामध्ये संत्रा पिकाखाली नोंद घेण्याजोगे क्षेत्र असून, नागपुरी संत्र्याची अविट चव आणि किन्नो संत्र्याचा आकार तथा रंग असणाऱ्या संत्रा पिकाचे वाण विकसित करण्याबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाद्वारे करण्यात आलेल्या मातृवृक्ष निवड तथा अपेक्षित वाण निर्मितीसाठी करण्यात आलेल्या संशोधनात्मक बाबींचे कार्य समाधानकारक आहे.’’ }
अकोला येथे फळशास्त्र विभागाच्या प्रक्षेत्रावर, नागपूर येथे कृषी महाविद्यालय आणि काटोल फळ संशोधन केंद्रात संपूर्ण निवडक चाचणी झालेल्या वाणांची अभिवृद्धी करून लागवड करण्यात येईल, असेही डवले म्हणाले. बैठकीनंतर डवले यांनी प्रक्षेत्राला भेट दिली. डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे यांनी प्रक्षेत्रावरील कार्याची माहिती दिली.
फळशास्त्र विभागाच्या प्रक्षेत्रावर इंडो-इस्राईल तंत्रज्ञानाच्या आधारे लागवड केलेल्या संत्रा प्रकल्पाची पाहणी केली. त्यांना डॉ. उज्वल राऊत, डॉ. संतोष घोलप यांनी माहिती दिली. डॉ. खर्चे यांनी प्रकल्पाविषयी सविस्तर अहवाल सादर केला. डॉ. भराड यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी सूत्रसंचालन केले.