Cultivation of 3000 hectares of onion in the district
Cultivation of 3000 hectares of onion in the district

नगर जिल्ह्यात कांद्याची ८७ हजार हेक्‍टरवर लागवड

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत रब्बीत सुमारे ८७ हजार ८३५ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. यंदा पाण्याची उपलब्धतेचा तसेच सध्याच्या बाजारातील दराचा विचार करता गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत कांद्याचे क्षेत्र यावर्षी वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील कांदा लागवडीचे क्षेत्र गेल्या अनेक दिवसांपासून कृषी विभागाकडेच उपलब्ध नाही.

नगर जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कांद्याचे क्षेत्रात वाढ होत असून रब्बी हंगामात साधारण ८० ते ९० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. गेल्यावर्षी दुष्काळ होता. त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, जेथे काही प्रमाणात पाणी उपलब्ध झाले तेथे कांदा लागवडीला प्राधान्य दिले. 

२०१८ मध्ये पाणी उपलब्धता अधिक असल्याने कांद्याचे क्षेत्र वाढले होते. यंदा मात्र खरिपात फारशी कांद्याची लागवड झाली नाही. त्यात आक्टोबमध्ये झालेल्या पावसामुळे कांदा सडला. आता यंदा रब्बीसाठी बऱ्यापैकी पाणी उपलब्ध झाले आहे. शिवाय गेल्या महिनाभरापासून कांद्याची बाजारात टंचाई निर्माण झाली. यामुळे कांद्याचे दर वाढलेले आहेत. हे दर अजून काही महिने तेजीत राहणार असल्याने त्याचाही यंदा रब्बीमधील कांदा लागवडीवर परिणाम दिसणार आहे. 

अजून कांदा लागवडीचे काम सुरू आहे. यामुळे रब्बीत कांद्याचे क्षेत्र बऱ्यापैकी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत ८७ हजार ८३५ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली असून सर्वाधिक क्षेत्र पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांत आहे. राहाता, अकोल्यातील क्षेत्र अल्प आहे. श्रीरामपूर तालुक्यातील कांदा लागवडीचे मात्र क्षेत्र गेल्या अनेक दिवसांपासून कृषी विभागाकडेच उपलब्ध नाही.

यंदाचे तालुकानिहाय लागवड क्षेत्र (हेक्टर) : नगर ः १०,४१६, पारनेर ः २४,८२८, श्रीगोंदा ः १४,२१३, कर्जत ः ७,३८३, जामखेड ः २,८००, शेवगाव ः २,४३३, पाथर्डी ः ४,५८९, नेवासा ः २,९४९, राहुरी ः ३,०६१, संगमनेर ः ९,६७२, अकोले ः ५८०, कोपरगाव ः २,८१६, राहाता ः २,१०५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com