agriculture news in marathi cultivation of aloe vera | Agrowon

तंत्र कोरफड लागवडीचे...

एस. एस. शिंदे, डॉ. जे. ई. जहागीरदार, डॉ. एम. पी. वानखडे
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

कोरफडीची लागवड वर्षभरात केव्हाही करता येते. पाण्याचा निचरा होणारी, रेताड व हलकी जमीन लागवडीस योग्य असते. उष्ण, दमट व कोरड्या हवामानात पिकाची वाढ चांगली होते.

कोरफड ही बहुवार्षिक औषधी वनस्पती असून साधारणतः १.५ ते २.५ फुटापर्यंत वाढते. पाने लांब, जाड असून त्यामध्ये गरांचे प्रमाण जास्त असते. पानांची लांबी २५ ते ३० सेंमी तर जाडी ३ ते ४ सेंमी असते. कोरफडीची लागवड कंदाद्वारे केली जाते.

जमीन, हवामान

कोरफडीची लागवड वर्षभरात केव्हाही करता येते. पाण्याचा निचरा होणारी, रेताड व हलकी जमीन लागवडीस योग्य असते. उष्ण, दमट व कोरड्या हवामानात पिकाची वाढ चांगली होते.

कोरफड ही बहुवार्षिक औषधी वनस्पती असून साधारणतः १.५ ते २.५ फुटापर्यंत वाढते. पाने लांब, जाड असून त्यामध्ये गरांचे प्रमाण जास्त असते. पानांची लांबी २५ ते ३० सेंमी तर जाडी ३ ते ४ सेंमी असते. कोरफडीची लागवड कंदाद्वारे केली जाते.

जमीन, हवामान

 • लागवड सर्वप्रकारच्या जमिनीमध्ये करता येते. पाण्याचा निचरा होणारी, रेताड व हलकी जमीन लागवडीस योग्य.
   
 • उष्ण, दमट व कोरड्या हवामानात पिकाची वाढ चांगली होते.

पूर्वमशागत

 • जमिनीची नांगरणी करून २ ते ३ पाळ्या द्याव्यात. जमीन चांगली भुसभुसीत झाल्यावर लागवड करावी.

लागवड 

 • वर्षभरात केव्हाही लागवड करता येते.
   
 • लागवड १.५ बाय १.५ फूट किंवा २ बाय २ फूट अंतरावर करावी. लागवडीसाठी हेक्टरी १० ते १८ हजार कंद आवश्‍यक आहेत.

व्यवस्थापन 

 • जमिनीची मशागत करण्यापूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत आणि हेक्‍टरी ३५० ते ४०० किलो निंबोळी पेंड खत लागवडीपूर्वी मिसळावी.
   
 • लागवडीपूर्वी हेक्टरी नत्र ३५ किलो, स्फुरद ७० किलो व पालाश ७० किलो द्यावे. लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी ३५ ते ४० किलो नत्राची दुसरी मात्रा द्यावी.
   
 • या पिकास जास्त पाण्याची आवश्‍यकता नसते. पाण्याची उपलब्धता व जमिनीच्या प्रतिनुसार पिकास हलके ते मध्यम पाणी द्यावे.
   
 • लागवडीनंतर ४० दिवसांनी पहिली खुरपणी करावी.

उत्पादन

 • प्रतिवर्षी हेक्टरी ११० ते ११५ क्विंटल हिरवी पाने मिळतात.

औषधी गुणधर्म

 • कोरफडीमध्ये ॲलोईन २० ते २२ टक्के, बार्बालाईन ४ ते ५ टक्के तसेच प्रत्येकी २० प्रकारची जीवनसत्वे, ॲमिनो आम्ल व खनिजे असतात.
   
 • कोरफडीपासून कुमारी आसव बनवितात. कोरफडीचा काढलेला रस आरोग्यदायी असतो.

संपर्कः एस. एस. शिंदे, ९४०४२०१९९५
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर ताज्या घडामोडी
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...