Agriculture news in marathi The cultivation of chanterelle on the dam is worth lakhs | Page 2 ||| Agrowon

बांधावरील फणसाची शेती ठरतेय ‘लाख’मोलाची...

टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 एप्रिल 2021

फणस म्हटले की प्रामुख्याने कोकणातील फळपीक म्हणून डोळ्यासमोर येते. मात्र, जिल्ह्यातील अकोट येथे देविदासराव मिसाळ या शेतकऱ्याने बांधावर लावलेली फणसाची झाडे आता बागेत रुपांतरीत झाली आहेत..

अकोला ः फणस म्हटले की प्रामुख्याने कोकणातील फळपीक म्हणून डोळ्यासमोर येते. मात्र, जिल्ह्यातील अकोट येथे देविदासराव मिसाळ या शेतकऱ्याने बांधावर लावलेली फणसाची झाडे आता बागेत रुपांतरीत झाली आहेत. बांधावरील ही झाडे वर्षाला दीड लाखांपर्यंत उत्पन्न देत असल्याचे मिसाळ यांचा मुलगा वामन यांनी सांगितले. 

अकोट येथील रहिवासी असलेले मिसाळ यांची गावशिवारात २० ते २२ एकर शेती आहे. यातील सर्वच शेती बागायती असून त्यात केळी, टरबूज व इतर बागायती पिके ते घेतात. बहुतांश क्षेत्र एकाच ठिकाणी आहे. देविदास मिसाळ यांनी साधारणतः ३० वर्षांपूर्वी शेताच्या बांधावर १०० पेक्षा अधिक फणसाची रोपे लावली होती. 

मागील काही वर्षांपासून त्यांची ही बांधावरची झाडे आता वर्षाला दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळवून देत आहे. कुठल्याही प्रकारचे फारसे व्यवस्थापन न करता नैसर्गिकरित्या या झाडांना फळधारणा होते. हंगामात ही फळे ते व्यापाऱ्यांना थेट विक्री करतात. झाडांना वर्षातून एकदा शेणखत टाकले जाते. याशिवाय इतर कुठलीही खते दिली जात नाहीत. सोबतच स्वतंत्रपणे काहीही पाणी व्यवस्थापन करण्याची गरज पडत नाही. तसेच कीड रोगांसाठीसुद्धा फवारणी घेण्याची गरज पडत नसल्याचे वामन यांनी सांगितले. 

नैसर्गिकरित्या तयार होणारी ही फणसाची फळे खाण्यास पोषक व चविष्ट आहेत. या शेतीबाबत माहिती देताना वामन म्हणाले, वडिलांनी तेव्हा दूरदृष्टी ठेवत ही झाडे लावली होती. सुरुवातीला किती उत्पादन येईल याची माहिती नव्हती. मात्र, आता दरवर्षी प्रत्येक झाडावर मोठ्या संख्येने फळे लागतात. यातील ९० टक्क्यांवर फळे विक्रीसाठी तयार होतात. व्यापारी थेट शेतातूनच हा माल घेऊन जातो. त्यामुळे मार्केटिंगची वेगळी व्यवस्था करण्याची गरज पडत नाही. इतर पिकांच्या बरोबरीने ही झाडे आता हमखास उत्पन्न मिळवून देत असल्याचे पाहत ते आणखी नव्याने लागवड करीत असल्याचे म्हणाले. यासाठी स्वतः रोपनिर्मिती केली असून येत्या हंगामात रोपांची पेरणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

संपर्क : वामन मिसाळ +919922234975


इतर अॅग्रो विशेष
‘महाडीबीटी’वरील बियाणे अनुदान अर्जासाठी...पुणे ः राज्यात खरीप हंगामासाठी ‘महाडीबीटी’वर...
साहेब, टरबूज विक्रीला परवानगी द्या अकोला ः दरवर्षी रमजान महिन्यात टरबुजाला चांगली...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
कांदाकोंडी टाळणेच योग्य पुणेः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात...
मंत्री साहेब, कोटींच नुकसान होईल हो ! नाशिक: जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
साखर निर्यातीचा यंदा विक्रम? कोल्हापूर: साखर निर्यातीची गती पाहता यंदा...
अन्न प्रक्रियेमध्ये अवरक्त किरणांचा वापरअन्न प्रक्रियेदरम्यान पारंपरिक उष्णतेच्या...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...