agriculture news in marathi cultivation of heliconia | Agrowon

लागवड हेलिकोनियाची...

 भूषण तायडे
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

हेलिकोनियाची लागवड वर्षभर केव्हाही करता येते. हेलिकोनियाच्या फुलांची वेस लाइफ चांगली असून, सजावटीसाठी किंवा मोठ्या फुलदानीत ठेवण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो, तर पानांचा वापर शोभेसाठी केला जातो.

हेलिकोनियाची लागवड वर्षभर केव्हाही करता येते. हेलिकोनियाच्या फुलांची वेस लाइफ चांगली असून, सजावटीसाठी किंवा मोठ्या फुलदानीत ठेवण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो, तर पानांचा वापर शोभेसाठी केला जातो.

हेलिकोनिया ही वनस्पती काटक आणि झपाट्याने वाढणारी असून, सुमारे दोन मीटर उंच वाढते. पानांच्या आतील भागांमध्ये तपकिरी रंगाची पाने असतात. फुले मोठी आणि पाने वरती सरळ येतात. फुले दांड्यावर लांब अंतरावर येतात. हेलिकोनिया हे अतिशय सुंदर आकर्षक लांब दांडीचे फूल (कट फ्लावर) असून, एकच सरळ फुलं फक्त एकदाच येतात. भारतात हेलिकोनियाच्या जवळपास १०० जाती सापडतात.

 • शास्त्रीय नावः  हेलिकॉइड ऑरेंज रेड येलो
   
 • मराठी नावः  हेलिकोनिया
   
 • वर्गः  झुडूपवर्गीय
   
 • कुटुंबः  मुसासी किंवा केळी कुटुंब
   
 • फुलांचा हंगाम:  वर्षभर
   
 • फुलांचा रंग:  लाल, पिवळा
   
 • पानेः  हिरवी
   
 • वनस्पती उंची किंवा लांबीः १ ते २ मीटर
   
 • रुंदीः १ ते २ मीटर
   
 • झाडाची वाढः सरळ किंवा पसरट

हवामान व माती

 • ही उष्णकटिबंधीय वनस्पती असून, वाढीसाठी उबदार आणि आर्द्र तापमान मानवते. सूर्यप्रकाशात उत्तम प्रकारे वाढते.
   
 • लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन लागते. जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ दरम्यान असावा.
   
 • या पिकाला सूर्यप्रकाश आवश्यक असला तरी कोरड्या भागात ते सावलीत पीक घेतले जाऊ शकते. उत्पादन व गुणवत्ता यासाठी तापमान फार महत्त्वाचे कार्य करते. वाढीसाठी २१ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते.

लागवड

 • लागवड वर्षभर केव्हाही करता येते. कंद लावून लागवड केली जाते. ४५ सेंमी रुंद, २५ सेंमी खोलीचे खड्डे घेऊन १.२ × १.२ मी वर लागवड करावी.

पाणी व खत व्यवस्थापन

 • पाणी व खतांची उपलब्धता आवश्यक असून, लागवडीच्या वेळी २ किलो चांगले कुजलेले शेंणखत द्यावे. फूल लागण्याच्या वेळी प्रति झाड ३० ग्रॅम युरिया खताची मात्रा द्यावी. 
   
 • जमीन ओलसर राहील याची काळजी घ्यावी. पुरेसे पाणी देऊन पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याचा निचरा करावा.

उत्पादन

 • फुले येण्यासाठी लागवडीपासून ७ ते ८ महिन्याचा कालावधी लागतो. वर्षभर फुले येतात. पावसाळ्यात फुलांचे प्रमाण जास्त असते.
   
 • प्रत्येक फांदीला एकच फूल येते. त्यानंतर ते वाळून जाते. फुलांचा आकार वनस्पतीच्या जोमावर अवलंबून असतो.
   
 • तोडणी करताना धारदार चाकूचा किंवा विळ्याचा वापर करावा. फुले पूर्ण पानासहित खालून कापावीत. साधारण ३० ते ४० फुले एका खोडापासून मिळतात.

संपर्कः भूषण तायडे, ९७६६८०८३२४
(के. के. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)


इतर फूल शेती
रंगीबेरंगी, आकर्षक ग्लॅडिओलसची लागवडकडक उन्हाळा आणि सतत व जोरदार पावसाचा कालावधी...
गुलाब फुलांचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञानफूल काढणीसाठी स्वच्छ आणि धारदार सिकेटर वापरावे....
हरितगृहात गुलाब लागवडीनंतर घ्यावयाची...हरितगृहामध्ये गुलाब लागवड केल्यानंतर त्यांची...
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात...गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा...
गुलाबावरील लाल कोळीचे नियंत्रणसध्या दुपारचे तापमान वाढत आहे. मात्र रात्री...
पॉलिहाउसमधील गुलाबशेतीत तयार केली ओळखऊसशेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या इस्लामपूर (जि....
ॲस्टर लागवडीसाठी वापरा सुधारित वाणॲस्टर हंगामी फुलपीक असून, त्याची लागवड...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
निशिगंध लागवडीचे नियोजनलागवड केल्यापासून निशिगंध पीक २ ते ३ वर्षे त्याच...
ग्लॅडिओलस कंदांची काढणी, साठवणूकयोग्य टप्प्यावर ग्लॅडिओलस कंदांची काढणी करणे...
नियोजन मोगरावर्गीय फुलशेतीचेमोगरावर्गीय फुलझाडामध्ये मोगरा, जाई, जुई, चमेली,...
निशिगंध लागवड तंत्रज्ञाननिशिगंध हे एक कंदवर्गीय फूलझाड असून महाराष्ट्रात...
ग्लॅडिओलस पिकातील खत व्यवस्थापनग्लॅडिओलसची चांगल्या प्रतीची फुले आणि कंदांचे...
ग्लॅडिओलस लागवडीसाठी निवडा योग्य जातग्लॅडिओलस फुलांना जागतिक आणि देशांतर्गत...
लागवड हेलिकोनियाची...हेलिकोनियाची लागवड वर्षभर केव्हाही करता येते....
..ही आहेत दर्जेदार मोगरा उत्पादनाची...मोगऱ्याच्या झाडाची योग्य पद्धतीने छाटणी करावी....
अशी करा गॅलार्डिया लागवड गॅलार्डियाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते....
ग्लॅडिओलस लागवडग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा...
क्षारपड जमिनीत फुलवली कार्नेशनची शेती सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी येथील तरुण शेतकरी...
फुलशेती सल्लागुलाब : गुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची...