अशी करा पपईची लागवड

 cultivation of papaya
cultivation of papaya

पपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या तीन हंगामात करतात. द्विलिंगी जातीची लागवड केल्यास पपई बागेमध्ये १० टक्के नर झाडांची आवश्यकता असते. उभयलिंगी जातीची लागवड करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एकच रोप लावावे. जमीन

  • पपई लागवडीसाठी सुपीक, मध्यम काळी रेतीमिश्रित पोयटा जमीन योग्य ठरते. जमीन काळी असल्यास पाण्याचा निचरा होणारी असावी. मुख्य खोडाभोवती कायमस्वरूपी पाणी साठले नाही पाहिजे.  
  • जमीन मध्यम ते रेतीमिश्रित पोयटायुक्त असल्यास पाणी साठण्याची पात्रता वाढवण्यासाठी योग्य कुजलेल्या सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे असते.  
  • पपई पिकाची मुळे नाजूक व उथळ असतात. यामुळे या पिकास उत्कृष्ट निचरा, तसेच भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी जमीन आवश्‍यक असते. अशी जमीन नसेल तर उंच गादीवाफा व ठिबक सिंचनाचा अवलंब करावा.
  • हवामान

  • पपईसाठी सरासरी १५-३० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. पपई पीक उष्ण कटिबंधात वाढणारे आहे. पपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या तीन हंगामात करतात. कडाक्याची थंडी, जोरात येणारे वारे आणि धुके पपई पिकाला हानिकारक ठरते.  
  • उष्ण कटिबंधात हे पीक जोमाने वाढते. समशीतोष्ण हवामानातही उत्पादन चांगले होते. पपई पिकास सरासरी तापमान २५ ते ३८ अंश सेल्सिअस आणि वार्षिक पर्जन्यमान १५०० मि. मी. मानवते. पपईची झाडे जास्तीत जास्त ४४ अंश सेल्सिअस तर कमीत कमी १० अंश सेल्सिअस तापमान सहन करू शकतात.  
  • फळे पिकण्याच्या वेळी कोरडे हवामान लाभदायक असते. दमट हवामानात फळाची प्रत व दर्जा ढासळतो. जास्त पावसाच्या प्रदेशात झाडांची वाढ होते. मात्र पपईचे खोड ठिसूळ असल्याने ते सडते. त्यामुळे झाडांची मर मोठ्या प्रमाणात जाणवते.
  • जाती

  • साधारणत: १ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी २५०-३०० ग्रॅम बियांपासून रोपवाटिका तयार करावी. द्विलिंगी जातींची लागवड केल्यास पपई बागेमध्ये १० टक्के नर झाडांची आवश्यकता असते. उदा. वॉशिंग्टन, कोईमतूर-५ कोईमतूर-६ , पुसा डॉर्फ, पुसा नन्हा, पुसा जॉईंट इ. १० टक्के नर झाडे क्षेत्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपात लावावीत. इतर झाडे उपटून टाकावीत.  
  • उभयलिंगी जातीची लागवड करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एकच रोप लावावे. उदा. कुर्ग, हनी ड्यू, अर्का प्रभात, सनराईज सोलो, पुसा डेलीसियस इ.
  • रोपवाटिका

  • रोपांसाठी माध्यम तयार करण्यासाठी ५ किलो कोकोपीट, २.५ किलो पोयटा माती व अधिक कुजलेले शेणखत तसेच १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा, १०० ग्रॅम. १९:१९:१९ खत या प्रमाणात मिश्रण एकजीव करून ते ट्रे किंवा पॉलिथीन बॅगमध्ये भरावे.  
  • बिया १.५ सें.मी खोलीवर टोकाव्यात. बियाणे टाकल्यानंतर अलगद झाकून टाकावे व झारीच्या साहाय्याने पाणी द्यावे. बिया टोकलेल्या पिशव्या, ट्रे सावलीत ठेवावेत.
  • लागवड पद्धत ४५ बाय ४५ बाय ४५ सेंमी आकाराचे खड्डे खोदून घ्यावेत व लागवडीसाठी दीड दोन महिन्यांची रोपे वापरावीत. खत व्यवस्थापन शक्यतो सेंद्रिय खतांचा वापर करावा. सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे पपई उच्च दर्जाची व मधुर स्वादाची तयार होते. आवश्यकतेनुसार रासायनिक खते मिश्रखताच्या स्वरूपात द्यावीत. खत देताना झाडाच्या मुळ्या तुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पाणी व्यवस्थापन पपईत ठिबक सिंचनाची सोय सुरुवातीपासून करणे आवश्यक आहे. ठिबक असल्यास उत्पादनात वाढ होते. आंतरपिके पपई बागेत मूग, उडीद, चवळी, वाटाणा, श्रावण घेवडा, सोयाबीन, भुईमूग अशी पिके घेता येतात. संपर्कः प्रा. राजेंद्र लिपने, ९७६७०८५६६३ (कृषी महाविद्यालय सोनई, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com