agriculture news in marathi cultivation practices of gram | Agrowon

तंत्रज्ञान हरभरा लागवडीचे...

डॉ.दीपाली कांबळे, डॉ.सचिनकुमार सोमवंशी
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पीक पद्धतीमध्ये हरभऱ्या यासारख्या डाळ वर्गीय पिकाचा समावेश करणे फार आवश्यक आहे. लवकर पक्व होणाऱ्या (११०-११५ दिवस) जातींच्या उपलब्धतेमुळे बागायती तसेच कोरडवाहू पिकाचे उत्पादन वाढविण्यास वाव आहे.
 

जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पीक पद्धतीमध्ये हरभऱ्या यासारख्या डाळ वर्गीय पिकाचा समावेश करणे फार आवश्यक आहे. लवकर पक्व होणाऱ्या (११०-११५ दिवस) जातींच्या उपलब्धतेमुळे बागायती तसेच कोरडवाहू पिकाचे उत्पादन वाढविण्यास वाव आहे.

 • मध्यम ते भारी काळी कसदार व पाण्याचा चांगला निचरा असणारी (कठीण जमिनी) निवडावी. हलकी अथवा भरड, पाणथळ, चोपण किंवा क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी निवडू नये. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ या दरम्यान असावा.
 • कोरडे व थंड हवामान या पिकास मानवते. फुले येण्याच्या काळात ढगाळ वातावरणाने उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.
 • २) खरिपाचे पीक निघाल्यानंतर खोल नांगरट करावी. कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. खरिपात शेणखत दिले नसल्यास हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. सिंचनाच्या सोईसाठी जमिनीच्या उतारानुसार सारा यंत्राने वरंबे आणि रिजरने दांड तयार करून रान बांधणी करावी.
 • बागायती हरभरा पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान करावी. पेरणीची वेळ लांबल्यास तसेच उशिरा पेरणी केल्यास उत्पादन फार कमी मिळते. कबुली हरभऱ्याची पेरणी सिंचनाची सोय असेल तरच करावी.
 • देशी हरभऱ्याची पेरणी पाभरीने किंवा तिफणीने करावी. कोरडवाहूसाठी तिफणीने दोन ओळीत ३० सें.मी. व दोन रोपात १० सें.मी. तसेच बागायतीसाठी दोन ओळीत ४५ सें.मी. व दोन रोपात १० सें.मी. अंतर राहील; अशाप्रकारे पेरणी करावी. बियाणे ७ ते १० सें.मी. खोलीवर पडले तरी चालेल परंतु ओलीवर पेरावे.
 • सर्व साधारणपणे १०० ग्रॅम दाण्याचे वजन १४ ते १५ ग्रॅम असणाऱ्या जातीचे हेक्टरी ५० किलो बियाणे वापरावे. जड टपोरे दाणे असणाऱ्या जातीचे हेक्टरी ७५ किलो बियाणे पेरावे.
 • उगवणीनंतर सुमारे एक महिन्यापर्यंत मूळ कुजव्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडे मरतात. त्यानंतर फ्युजॅरियम बुरशीद्वारे होणाऱ्या मर रोगामुळे झाडे वाळतात. उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत पिकाचे बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा २ ग्रॅम कार्बेन्डाझीमची प्रक्रिया करावी. यामुळे पिकाचे रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होते. यानंतर प्रति १० किलो बियाणास २५० ग्रॅम रायझोबियम व पी.एस.बी. जिवाणू संवर्धक गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून प्रक्रिया करावी. बियाणे तासभर सावलीत सुकवावे. त्यानंतर पेरणी करावी. द्रवरूप जीवणुसंवर्धक उपलब्ध झाल्यास त्यांचा वापर करावा. यासाठी नत्र ‍‌स्थिर करणारे व पीएसबी जिवाणू संवर्धक प्रत्येकी १०० मिलि जिवाणू संवर्धन प्रति १० किलो बियाणास सारख्या प्रमाणात लावून लगेच पेरणी करावी. मुळावरील नत्राच्या ग्रंथी वाढतात आणि पिकाची वाढ चांगली होते.
 • मर रोगापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी मर रोग प्रतिबंधक जातीचा उदा. आय.सी.सी.व्ही. २ आणि १०, फुले जी – १२ तसेच बी.डी.एन.९-३ या जातींची निवड करावी.
 • जिरायत आणि बागायती हरभऱ्याला हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश खताची आवश्यकता असते. यासाठी हेक्टरी १२५ किलो डी.ए.पी. आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळी बियाण्यालगत पडेल या पद्धतीने दुचाडी पाभरीने पेरून द्यावे. खत विस्कटून टाकू नये.
 • पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासूनच तण विरहित ठेवावे. पीक २० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतोवर वापशावर करावी. कोळपणी मुळे जमिनीत हवा खेळती राहते आणि पिकाची वाढ चांगली चांगली होते. कोळपणी नंतर एक खुरपणी करावी. कोरडवाहू क्षेत्रामध्ये कोळपणी मुळे जमिनीत पडत असलेल्या भेगा बुजून जातात आणि ओल टिकून राहते.
 • हरभऱ्याचे करडई २:१ या प्रमाणात (हरभऱ्याच्या दोन ओळीनंतर करडई एक ओळ) आंतरपीक घेतल्यास मूळ पिकाच्या उत्पादनात फारसा फरक न पडता एकूण प्रति हेक्टरी जास्त उत्पादन मिळते. ओलीता खाली हरभरा + जवस (४: २) ही आंतरपीक पद्धत करावी.

हरभऱ्याच्या जाती 

 • देशी जाती : बीडीएन- ९-३, बीडीएनजी-७९७ (आकाश), फुले जी, विश्वास (फुले जी-५), विजय, विशाल, दिग्विजय, जाकी, साकी.
 • काबुली वाण: श्वेता (आयसीसीव्ही- २), पीकेव्ही (काबुली-२), विराट (फुले जी-९४४१८)
 • हिरव्या दाण्यांच्या जाती (पुलाव व उसळीकरिता ) : हिरवा चाफा (एकेजीएस-१)
 • गुलाबी हरभरा (फुटण्याकरीता) : डी-८, गुलक-१

संपर्क ः डॉ.दीपाली कांबळे, ९३०७१६३९३९
(कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर,जि. जालना
 


इतर कडधान्ये
आरोग्यदायी कडधान्येमुगामध्ये कर्बोदके ६० टक्के, प्रथिने २१.५ टक्के,...
कडधान्ये ः प्रथिने, ऊर्जेचा उत्तम स्रोतकडधान्ये पोषणातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहेत....
तंत्रज्ञान हरभरा लागवडीचे...जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पीक...
हरभरा पिकाची सुधारित लागवडहरभऱ्यामध्ये देशी वाण व काबुली वाण असे दोन प्रकार...
तुरीवरील किडींचे एकात्मिक नियंत्रण...सध्याच्या परिस्थितीत तूर पीक कळ्या लागण्याच्या...
हरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवडकोरडवाहू तसेच ओलीताखाली हरभऱ्याच्या विजय,...
रुंद वरंबा सरी पद्धतीने हरभरा लागवडहरभरा लागवडीसाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा वापर...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
प्रकाश संश्लेषण, पाणी वापर...चवळी पिकांच्या पर्णसंभारामध्ये प्रकाश संश्लेषण...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणमागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान...
मुग, उडीद पिकाची सुधारित लागवडखरीप हंगामामध्ये मुग व उडीद पिकाची लागवड मुख्य व...
तंत्र तूर लागवडीचे..जमिनीत वाफसा येताच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा...
मूग आणि उडीदाची सुधारीत पध्दतीने लागवडजमिनीत वापसा येताच जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात (१५...
हवामान बदलानुसार कडधान्य वाणनिर्मितीची...पीक उत्पादनासाठी पाणी व माती या दोन गोष्टी फार...
गरजेनुसार कडधान्य वाण विकसित करण्याची...कडधान्य पिकांचे आहारातील महत्त्व व वाढत्या...
..अशी आहे डाळनिर्मितीची प्रक्रियामागील भागात मिनी डाळ मिल व त्या माध्यमातून डाळ...
कृषी सल्ला : तूर, हरभरा, ज्वारी, कांदा...तूर शेंगा पक्वतेची अवस्था शेंग माशी, घाटे अळी...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणकाही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण तुरीवरील...
बीबीएफ यंत्रानेच करा हरभरा पेरणीरुंद वरंबा सरी यंत्राद्वारे गरजेनुसार ६० ते १५०...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...