..ही आहेत दर्जेदार मोगरा उत्पादनाची सूत्रे

cultivation of Jasmine
cultivation of Jasmine

मोगऱ्याच्या झाडाची योग्य पद्धतीने छाटणी करावी. माती परीक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. पिकाच्या गरजेनुसार पाणी नियोजन करावे. मो गरा हे बहुवार्षिक फुलझाड आहे. या पिकापासून कमी नियोजनात जास्त उत्पादन मिळते. प्रामुख्याने सिंगल व डबल मोगरा, मोतीया, बेला, हजारी बेला, गुंडुमलाई या जातींची लागवड केली जाते. उन्हाळी हंगामातील फुलांच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी सध्याच्या काळात योग्य नियोजन आवश्यक आहे. व्यवस्थापन ताण देणे झाडांना ताण देताना आपण पाणी देणे थांबवतो. जमिनीच्या प्रकारानुसार ताण देण्याचा कालावधी कमी जास्त करावा. छाटणी   जानेवारीदरम्यान गरजेनुसार झाडाची छाटणी करावी. जमिनीपासून अंदाजे ४० ते ५० सेंमी उंचीवर छत्रीसारख्या गोल आकारामध्ये सर्व फांद्या छाटून टाकाव्यात. रोगट, वाळलेल्या दाटीवाटीत असणाऱ्या फांद्या छाटून घ्याव्यात. मातीची भर   झाडांना मातीची भर देण्याआधी प्रत्येक झाडास अर्धा किलो शेणखत टाकून मातीची भर द्यावी.  यावेळी सरीमधील झाडे वरंब्यावर येतील व झाडांच्या एका बाजूने पाणी देता येईल असे नियोजन करावे. खत व्यवस्थापन माती परीक्षणानुसार १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. संपूर्ण स्फुरद, पालाश आणि अर्धे नत्र छाटणीच्या आधी खंदणी करताना द्यावे. त्यानंतर कळी धरण्याच्या वेळी उरलेले नत्र व झिंक (०.२५ टक्के) आणि मॅग्नेशियम (०.५ टक्के) फवारावे, यामुळे उत्पादनात वाढ होते. रासायनिक खत दिल्यानंतर झाडांना लगेच पाणी द्यावे. पाणी व्यवस्थापन  जानेवारी महिन्यापासून पिकाला नियमित आठवड्यातून एकदा व उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसांच्या अंतराने बांगडी पद्धतीने पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास निचरा न झाल्यामुळे पाने पिवळी पडून विकृती येते. फुलांचा हंगाम संपल्यानंतर झाडांना पाणी देऊ नये. काढणी व उत्पादन सकाळच्या वेळी चांगली फुगलेली, लांब व घट्ट कळी अवस्थेतील फुले काढावीत. सूर्योदयानंतर कळी फुलते व त्यातील सुगंध कमी होतो. कळ्या खुडून लगेच पिशवीत जमा कराव्यात. कारण कळ्या अंगाच्या उष्णतेमुळे उमलतात व पिवळ्या पडतात. योग्य व्यवस्थापन केल्यास, दुसऱ्या वर्षापासून प्रति हेक्टरी सहा टन पर्यंत उत्पादन मिळते.

संपर्कः डॉ. एस. एस. यदलोड, ७५८८०८१९९०   (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com