agriculture news in marathi cultivation practices for Jasmine flower | Agrowon

..ही आहेत दर्जेदार मोगरा उत्पादनाची सूत्रे

डॉ. एस. एस. यदलोड, ए. आर. पाळेकर,  आर. व्ही. भालेराव
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

मोगऱ्याच्या झाडाची योग्य पद्धतीने छाटणी करावी. माती परीक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. पिकाच्या गरजेनुसार पाणी नियोजन करावे.

मो गरा हे बहुवार्षिक फुलझाड आहे. या पिकापासून कमी नियोजनात जास्त उत्पादन मिळते. प्रामुख्याने सिंगल व डबल मोगरा, मोतीया, बेला, हजारी बेला, गुंडुमलाई या जातींची लागवड केली जाते. उन्हाळी हंगामातील फुलांच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी सध्याच्या काळात योग्य नियोजन आवश्यक आहे.

व्यवस्थापन

मोगऱ्याच्या झाडाची योग्य पद्धतीने छाटणी करावी. माती परीक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. पिकाच्या गरजेनुसार पाणी नियोजन करावे.

मो गरा हे बहुवार्षिक फुलझाड आहे. या पिकापासून कमी नियोजनात जास्त उत्पादन मिळते. प्रामुख्याने सिंगल व डबल मोगरा, मोतीया, बेला, हजारी बेला, गुंडुमलाई या जातींची लागवड केली जाते. उन्हाळी हंगामातील फुलांच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी सध्याच्या काळात योग्य नियोजन आवश्यक आहे.

व्यवस्थापन

ताण देणे
झाडांना ताण देताना आपण पाणी देणे थांबवतो. जमिनीच्या प्रकारानुसार ताण देण्याचा कालावधी कमी जास्त करावा.

छाटणी  
जानेवारीदरम्यान गरजेनुसार झाडाची छाटणी करावी. जमिनीपासून अंदाजे ४० ते ५० सेंमी उंचीवर छत्रीसारख्या गोल आकारामध्ये सर्व फांद्या छाटून टाकाव्यात. रोगट, वाळलेल्या दाटीवाटीत असणाऱ्या फांद्या छाटून घ्याव्यात.

मातीची भर  
झाडांना मातीची भर देण्याआधी प्रत्येक झाडास अर्धा किलो शेणखत टाकून मातीची भर द्यावी.  यावेळी सरीमधील झाडे वरंब्यावर येतील व झाडांच्या एका बाजूने पाणी देता येईल असे नियोजन करावे.

खत व्यवस्थापन
माती परीक्षणानुसार १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. संपूर्ण स्फुरद, पालाश आणि अर्धे नत्र छाटणीच्या आधी खंदणी करताना द्यावे. त्यानंतर कळी धरण्याच्या वेळी उरलेले नत्र व झिंक (०.२५ टक्के) आणि मॅग्नेशियम (०.५ टक्के) फवारावे, यामुळे उत्पादनात वाढ होते. रासायनिक खत दिल्यानंतर झाडांना लगेच पाणी द्यावे.

पाणी व्यवस्थापन 
जानेवारी महिन्यापासून पिकाला नियमित आठवड्यातून एकदा व उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसांच्या अंतराने बांगडी पद्धतीने पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास निचरा न झाल्यामुळे पाने पिवळी पडून विकृती येते. फुलांचा हंगाम संपल्यानंतर झाडांना पाणी देऊ नये.

काढणी व उत्पादन
सकाळच्या वेळी चांगली फुगलेली, लांब व घट्ट कळी अवस्थेतील फुले काढावीत. सूर्योदयानंतर कळी फुलते व त्यातील सुगंध कमी होतो. कळ्या खुडून लगेच पिशवीत जमा कराव्यात. कारण कळ्या अंगाच्या उष्णतेमुळे उमलतात व पिवळ्या पडतात. योग्य व्यवस्थापन केल्यास, दुसऱ्या वर्षापासून प्रति हेक्टरी सहा टन पर्यंत उत्पादन मिळते.

संपर्कः डॉ. एस. एस. यदलोड, ७५८८०८१९९०  
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर फूल शेती
गुलाब फुलांचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञानफूल काढणीसाठी स्वच्छ आणि धारदार सिकेटर वापरावे....
हरितगृहात गुलाब लागवडीनंतर घ्यावयाची...हरितगृहामध्ये गुलाब लागवड केल्यानंतर त्यांची...
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात...गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा...
गुलाबावरील लाल कोळीचे नियंत्रणसध्या दुपारचे तापमान वाढत आहे. मात्र रात्री...
पॉलिहाउसमधील गुलाबशेतीत तयार केली ओळखऊसशेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या इस्लामपूर (जि....
ॲस्टर लागवडीसाठी वापरा सुधारित वाणॲस्टर हंगामी फुलपीक असून, त्याची लागवड...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
निशिगंध लागवडीचे नियोजनलागवड केल्यापासून निशिगंध पीक २ ते ३ वर्षे त्याच...
ग्लॅडिओलस कंदांची काढणी, साठवणूकयोग्य टप्प्यावर ग्लॅडिओलस कंदांची काढणी करणे...
नियोजन मोगरावर्गीय फुलशेतीचेमोगरावर्गीय फुलझाडामध्ये मोगरा, जाई, जुई, चमेली,...
निशिगंध लागवड तंत्रज्ञाननिशिगंध हे एक कंदवर्गीय फूलझाड असून महाराष्ट्रात...
ग्लॅडिओलस पिकातील खत व्यवस्थापनग्लॅडिओलसची चांगल्या प्रतीची फुले आणि कंदांचे...
ग्लॅडिओलस लागवडीसाठी निवडा योग्य जातग्लॅडिओलस फुलांना जागतिक आणि देशांतर्गत...
लागवड हेलिकोनियाची...हेलिकोनियाची लागवड वर्षभर केव्हाही करता येते....
..ही आहेत दर्जेदार मोगरा उत्पादनाची...मोगऱ्याच्या झाडाची योग्य पद्धतीने छाटणी करावी....
अशी करा गॅलार्डिया लागवड गॅलार्डियाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते....
ग्लॅडिओलस लागवडग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा...
क्षारपड जमिनीत फुलवली कार्नेशनची शेती सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी येथील तरुण शेतकरी...
फुलशेती सल्लागुलाब : गुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची...
हरितगृहातील जरबेरा लागवड...हरितगृहातील जरबेरा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम...