Agriculture news in marathi Cultivation practices of Niger | Agrowon

तंत्र कारळा लागवडीचे...

कैलास भोईटे, दत्तात्रय कुसळकर, हेमंत पाटील
शुक्रवार, 12 जून 2020

कारळ्याची पेरणी जूनच्या पहिल्या पंधरवड्यापासून ते जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्याअखेरपर्यंत करावी. चांगला पाऊस झाल्यानंतर मुख्य पीक किंवा आंतरपीक म्हणून लागवड करावी. आपत्कालीन परिस्थितीत उशिरा खरीप हंगामातदेखील याची लागवड करून चांगले उत्पादन मिळते.
 

कारळ्याची पेरणी जूनच्या पहिल्या पंधरवड्यापासून ते जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्याअखेरपर्यंत करावी. चांगला पाऊस झाल्यानंतर मुख्य पीक किंवा आंतरपीक म्हणून लागवड करावी. आपत्कालीन परिस्थितीत उशिरा खरीप हंगामातदेखील याची लागवड करून चांगले उत्पादन मिळते.

कारळा पिकामध्ये ३५ ते ४० टक्के तेल, २० ते २५ प्रथिनांचे प्रमाण असते. याची लागवड खरीप, उशिरा खरीप आणि रब्बी हंगामात करता येते. निकृष्ट, कमी कसदार, डोंगर उतारावर, भरड जमिनीत लागवड करता येते. या पिकाला कमी किंवा अधिक पाण्याचा परिणाम जाणवत नाही, यास रानटी जनावरे खात नाहीत तसेच मृदा संवर्धनही उपयुक्त आहे.

कारळा हे पीक हलकी ते भारी सर्व जमिनीत येते. जमिनीचा सामू ५.२ ते ७.३ असल्यास चांगले उगवते. पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. खारवट जमिनीतदेखील चांगले उत्पादन येते.

  • पेरणीपूर्वी जमीन चांगली नांगरून, कुळवाच्या दोन पाळ्या देऊन भुसभुशीत करावी. पेरणी जूनच्या पहिल्या पंधरवड्यापासून ते जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्याअखेरपर्यंत करावी. चांगला पाऊस झाल्यानंतर मुख्य पीक किंवा आंतरपीक म्हणून लागवड करावी. आपत्कालीन परिस्थितीत उशिरा खरीप हंगामातदेखील याची लागवड करून चांगले उत्पादन मिळते.
  • एक हेक्टरसाठी ४ ते ५ किलो बियाणे लागते. लागवडीसाठी फुले कारळा, फुले वैतरणा या जातींची निवड करावी. या जातींचे हेक्टरी ५०० किलो उत्पादन मिळते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास थायरम ३ ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी. यानंतर स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक १० ग्रॅम प्रति किलो बियाणास प्रक्रिया करावी. यामुळे चांगली उगवण होते.
  • बरेचशे शेतकरी पेरणी बी फोकून करतात. मात्र अधिक उत्पादनासाठी तिफणीने ३० x १० सें.मी. अंतरावर ओळीने पेरणी करावी. पेरणी करताना बियाणे वाळू, बारीक मऊ शेणखत किंवा राखेमध्ये मिसळून २ ते ३ सें. मी. खोलीवर पेरावे. पेरणी झाल्यानंतर मातीने झाकावे.
  • पेरणीच्या पुरेसे शेणखत मिसळावे. त्याचबरोबरीने हेक्टरी २० किलो नत्र, २० किलो स्फुरद द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी वीस किलो नत्र द्यावे. तसेच गंधक २० ते २५ किलो प्रति हेक्टरी द्यावे. त्यामुळे तेलाच्या मात्रेत वाढ होते.
  • पीक चांगले उगवून आल्यावर दाट पेरणी असल्यास पेरणी नंतर २० ते २५ दिवसांनी विरळणी करावी. दोन रोपांमधील अंतर १० सें. मी. ठेवावे. दोन ओळीतील अंतर ३० सें. मी. ठेवावे. तणाचा प्रादुर्भाव दिसताच पहिली खुरपणी पेरणी नंतर ३० दिवसांनी तर दुसरी खुरपणी ६० ते ६५ दिवसांनी करावी.
  • वाढीच्या संवेदनशील अवस्थेनुसार एक किंवा दोन पाण्याची आवश्यकता भासते. पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्यास त्वरित पाणी द्यावे. पिकाची वाढीची अवस्था सुरुवातीस २० ते ४० दिवसांची असते. या दरम्यान पावसाचा खंड पडल्यास त्वरित पाणी द्यावे. पिकाची दाणे भरण्याची अवस्था ६० ते ७० दिवसांत असते. या दरम्यान पावसाचा खंड पडल्यास त्वरित पाणी द्यावे.
  • कारळा पिकाच्या चिकट पराग कणांचे हवेमार्फत परागीभवन होण्यास अडचणी येतात. परिणामी या पिकास परागीभवन होऊन बी तयार होण्यासाठी किटकांवर विसंबून रहावे लागते. याची फुले पिवळ्या रंगाची असूयाचा कालावधी पेरणीनंतर ५० ते ८० दिवसांपर्यंत टिकतो. त्यामुळे कीटकांना आकर्षित करण्यासाठी आदर्श परिस्थिती असते. एकरी एक मधुमक्षिका पेटीचा वापर केल्यास उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ दिसून येते.

संपर्क- डॉ. कैलास भोईटे ः ९४०४६९५९१९, ०२५५३-२४४०१३
(विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि. नाशिक )


इतर मसाला पिके
व्यवस्थापन हळद पिकाचेसध्या हळद लागवड होऊन सात महिन्यांचा कालावधी (२१०...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
आले पिकावरील कंदमाशीचे व्यवस्थापनआले पिकामध्ये कंदमाशी, खवले कीड, खोडकिडा, फुलकिडे...
ओळखा हळदीवरील किडींचा प्रादुर्भाव...सध्या हळद पीक फुटवे आणि गड्डे तयार होण्याच्या...
व्यवस्थापन मसाला पिकांचेनारळ, सुपारी बागेत अतिशय चांगल्या प्रकारे मसाला...
हळदीची पाने पिवळी पडण्याची समस्या अन्...सध्या काही भागात हळदीची पाने पिवळे पडण्याची...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
हळदीला द्या शिफारशीत खतमात्रापावसाच्या कालावधीत जमिनीतील ओलावा अभ्यासून पाणी...
तंत्र कारळा लागवडीचे...कारळ्याची पेरणी जूनच्या पहिल्या पंधरवड्यापासून ते...
काळीमिरीची लागवड मिरी लागवडीसाठी आधाराच्या झाडांपासून किमान ४५ सें...
साठवणूक हळद बेण्याची...निवडलेले बेणे जातिवंत आणि चांगले असेल तर उत्पादन...
कढीपत्त्याची व्यावसायिक लागवड फायदेशीरकढीपत्याचे शास्त्रीय नाव ‘मुर्रया कोइनिगी’ आहे....
काळी मिरी काढणी तंत्रज्ञानविविध पदार्थांच्या निर्मितीमध्ये मिरीचा वापर केला...
योग्य परिपक्वतेला करा पिकांची काढणीपिकांची योग्य परिपक्वतेला काढणी करण्यासाठी...
हळदीची पॉलिशिंग, प्रतवारी करणे...हळदीची विक्री उघड लिलाव पद्धतीने होत असल्याने...
व्यवस्थापन दालचिनीचे...वाढीच्या टप्यात असलेल्या दालचिनी कलमांना आधार...
व्यवस्थापन मसाला पिकांचे...मिरी वेल आणि जायफळास पुरेसे पाणी आणि खत...
सुधारित पद्धतीने करा हळद काढणीहळद लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीची पद्धत...
दालचिनीची वेळेवर काढणी महत्त्वाचीदालचिनी झाडाची साल ही मसाल्यात दालचिनी म्हणून...