तंत्र तूर लागवडीचे..

जमिनीत वाफसा येताच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवड्या दरम्यान पेरणी पूर्ण करावी. उशिरा लागवड केल्यास पिकास लवकर पेरलेल्या पिकाबरोबर फुले येतात आणि त्याच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फांद्या कमी येतात. तसेच फुले आणि शेंगांची संख्याही कमी राहते आणि उत्पादनात घट येते.
Pearl millet and pigeon pea intercropping
Pearl millet and pigeon pea intercropping

जमिनीत वाफसा येताच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवड्या दरम्यान पेरणी पूर्ण करावी. उशिरा लागवड केल्यास पिकास लवकर पेरलेल्या पिकाबरोबर फुले येतात आणि त्याच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फांद्या कमी येतात. तसेच फुले आणि शेंगांची संख्याही कमी राहते आणि उत्पादनात घट येते. तुरीची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे खोल नांगरट करून वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. वखराची शेवटची पाळी देण्याआधी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. आधीच्या पिकांची धसकटे, काडी, कचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. खोलवर नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी. मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागवडीस योग्य असते. चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ सामू असावा.

सुधारित जाती

जाती पीक कालावधी (दिवस) उत्पादन (क्विं./हेक्टर)
आय.सी.पी.एल-८७ १२० ते १३० १८ ते २०
विपुला १५० ते १७० २४ ते २६
फुले राजेश्‍वरी १४० ते १५० २८ ते ३०
बी.एस.एम.आर.-८५३ १६० ते १७० १८ ते २०
बी.एस.एम.आर-७३६ १७० ते १८० १६ ते १८
बी. डी. एन.७११ १५० ते १६० १८ ते २०
बी. डी.एन.७१६ १६५ ते १७० २० ते २२

लागवड तंत्र

  • आय.सी.पी.एल-८७ जातीच्या पेरणीसाठी हेक्टरी १८ ते २० किलो बियाणे लागते.
  • मध्यम कालावधीच्या राजेश्‍वरी, विपुला आणि बी.डी.एन-७११ या जातींचे हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे पुरसे आहे.
  • उशिरा येणाऱ्या आणि जास्त अंतरावरील जातींसाठी हेक्टरी ५ ते ६ किलो बियाणे टोकण पद्धतीने लावावे.
  • बीजप्रक्रिया

  • प्रति किलो बियाणांस ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम व पी.एस.बी. जिवाणू संवर्धन १० किलो बियाणांस गुळाच्या थंड द्रावणातून प्रक्रिया करावी.
  • जमिनीत वाफसा येताच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा यादरम्यान पेरणी पूर्ण करावी. उशिरा लागवड केल्यास पिकास लवकर पेरलेल्या पिकाबरोबर फुले येतात आणि त्याच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फांद्या कमी येतात. तसेच फुले आणि शेंगांची संख्याही कमी राहते आणि उत्पादनात घट येते.
  • लागवडीचे अंतर

  • आय.सी.पी.एल-८७ या लवकर तयार होणाऱ्या जातीची ४५ बाय १० सेंमी अंतरावर लागवड करावी.
  • मध्यम कालावधीतील जातीची ६० बाय २० सेंमी किंवा ९० बाय २० सेंमी अंतरावर लागवड करावी.
  • आंतरपीक पद्धती

  • कपाशीच्या ६ किंवा ८ ओळीनंतर एक ओळ तुरीची लागवड करावी. यासाठी ५ ते ६ महिने कालावधी असलेल्या बी.डी.एन-७१६, बी.एस.एम.आर-८५३, बी.एस.एम.आर-७३६ या जातींची लागवड करावी.
  • बाजरीमध्ये तुरीचे आंतरपीक घेता येते. यासाठी ४५ सेंमी अंतरावर बाजरीच्या दोन ओळी आणि एक ओळ तुरीची या पध्दतीने पेरणी करावी.
  • मूग, उडीद किंवा चवळी यांसारख्या लवकर येणाऱ्या पिकांमध्ये मुगाच्या दोन ओळी आणि एक ओळ तुरीची लागवड करावी. याप्रमाणे आंतरपीक घेतल्यास तुरीच्या जोमदार वाढीची सुरुवात होण्यापूर्वी मूग किंवा उडिदाचे पीक काढणीस येते.
  • खत व्यवस्थापन

  • पेरणीपूर्वी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे.
  • सलग तुरीसाठी पेरणीवेळी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद वेळी द्यावे.
  • आंतरपीक घेतल्यास ज्या पिकाच्या ओळी जास्त आहेत, त्या पिकाची शिफारशीत खत मात्रा द्यावी. उदा. सोयाबीन करिता ५० किलो नत्र आणि ७५ किलो स्फुरद अशी मात्रा द्यावी.
  • पाणी व्यवस्थापन

  • पीक वाढीच्या अवस्थेत (३०ते३५ दिवस), फुलोऱ्याच्या अवस्थेत (६० ते ७० दिवस) आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी द्यावे किंवा अथवा ठिबक सिंचनाने ५० टक्के बाष्पीभवनानंतर पाणी द्यावे.
  • पिकांस फुले येण्याच्या अवस्थेत किंवा शेंगा लागण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास, २० ग्रॅम युरिया किंवा पोटॅशिअम नायट्रेट किंवा डी.ए.पी. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • आंतरमशागत  पिकाच्या जोमदार वाढीसाठी पीक तणविरहित ठेवावे. पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली आणि त्यानंतर १५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वाफशावर करावी. गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या कराव्यात. संपर्क - डॉ. चांगदेव वायळ, ९९७५५४१९६७ (कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com