agriculture news in marathi cultivation practices of safflower | Agrowon

करडईची सुधारित लागवड

डॉ. श्‍यामराव घुगे, प्रीतम भुतडा, व्ही. एम. पांचाळ
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

करडई हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. भारतामध्ये रंगनिर्मिती व खाद्य तेलासाठी करडईची लागवड केली जाते. या पिकात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असल्याने कोरडवाहू क्षेत्रासाठी उपयुक्त ठरते. 
 

करडई हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. भारतामध्ये रंगनिर्मिती व खाद्य तेलासाठी करडईची लागवड केली जाते. या पिकात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असल्याने कोरडवाहू क्षेत्रासाठी उपयुक्त ठरते. 

भारत हा जगातील प्रमुख करडई उत्पादक देश आहे. महाराष्ट्रातील करडईची उत्पादकता ५७० किलो प्रति हेक्टर अशी आहे.  करडई तेलामध्ये लिनोलिक आम्लाचे प्रमाण ७८ टक्के असून, ते मानवी शरीरातील अनिष्ट कोलेस्टेरॉल घटक नियंत्रणात ठेवते. मात्र हे पीक काटेरी असल्यामुळे  कामांसाठी मजुरांची उपलब्धता होण्यास अडचणी येतात. हेच करडईची लागवड क्षेत्र कमी होण्याचे महत्त्वाचे कारण ठरत आहे. अशा वेळी करडई पिकातील पेरणीपासून काढणीपर्यंतची सर्व कामे यंत्राद्वारे करणे शक्य आहे. या यंत्रामध्ये ट्रॅक्टर, पेरणीयंत्र, तुषार सिंचन, ट्रॅक्टर बुमस्प्रे व कंबाईन हार्वेस्टर इ. उपयुक्त ठरतात.

हवामान 

 • करडई पिकास महाराष्ट्रातील हिवाळ्यातील (रब्बी) थंड व कोरडे हवामान मानवते.
 • जास्त पाऊस किंवा आर्द्रता रोगास आमंत्रण देते.

जमीन 

 • मध्यम ते भारी, पाण्याचा योग्य निचरा असणारी जमीन लागवडीसाठी निवडावी.
 • पाण्याचा कमी निचरा असणारी जमीन लागवडीसाठी टाळावी.

जाती
परभणी-१२ (परभणी कुसुम), परभणी -४० (निमकाटेरी), परभणी-८६ (पूर्णा), शारदा, भीमा, अन्नेगिरी-१, फुले कुसुम व एकेएस-३२७.

पूर्वमशागत
खरीप पिकांची काढणी झाली की, रोटाव्हेटरच्या साहाय्याने दोन आडव्या उभ्या पाळ्या द्याव्यात. त्यानंतर काडी कचरा वेचून घ्यावा. जमिनीला किंचित उतार द्यावा. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल. सोयाबीन काढणीनंतर कोणतीही  पूर्व मशागत न करता तत्काळ पेरणी करता येते. यामुळे जमिनीतील ओलाव्याचा पिकास फायदा मिळतो. 

पेरणी 
मोठ्या व सलग क्षेत्रावर करडईची पेरणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने खत व बी पेरणी यंत्रात आवश्यक तो बदल करून ३० ऑक्टोबरपर्यत करण्याची शिफारस आहे. मात्र या वर्षी परतीचा पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने अनेक ठिकाणी वापसा आलेला नाही. तेव्हा शक्य तितक्या लवकर पेरणी करून घ्यावी. बियांची पेरणी ५ सेंमी खोलीपर्यंत करावी. 

खत व्यवस्थापन
कोरडवाहू करडई पिकास प्रति हेक्टरी ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद खताची मात्रा ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राद्वारे पेरणीसोबत द्यावे.

विरळणी 
उगवणीनंतर २० ते २५ दिवसांनी   अतिरिक्त   रोपे उपटून काढावीत. दोन रोपांत २० सेंमी अंतर ठेवावे.

आंतरमशागत 
पेरणीनंतर २५ ते ३० आणि ४५ ते ५० दिवसांनी कोळपण्या कराव्यात. यासाठी ट्रॅक्टरचलित यंत्रे उपयोगी ठरतात. 
 
पाणी व्यवस्थापन 

 • करडई पिकास संवेदनशील अवस्थेत पाणी दिल्यास उत्पादनात दीडपट वाढ होते. यासाठी तुषार सिंचनाचा वापर केल्यास पाण्यात ४० ते ४५ टक्के बचत होते. 
 • कमी पाण्यात अधिक क्षेत्र सिंचित करता येते. 
 • कमी मजुराच्या साहाय्याने अधिक क्षेत्रास पाणी देता येते. 
 • तुषार     सिंचन पद्धतीने पाणी देताना एका जागी दोन तासांपेक्षा जास्त वेळ तुषार संच चालू ठेवू नये. पाइप निसटून पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी.

करडई पिकासाठी पाण्याच्या संवेदनशील अवस्था
जमिनीत ओलावा कमी असल्यास उगवणीसाठी,

 • पेरणीनंतर ३० ते ४० दिवसांनी
 • पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी
 • पेरणीनंतर ९० ते ९५ दिवसांनी 

पीक संरक्षण 

 • करडई मावा कीडनियंत्रणात ठेवण्यासाठी वेळेवर पेरणी करावी. 
 • पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी माव्याचा प्रादुर्भाव दिसतो. प्रादुर्भाव दिसताच डायमिथोएट (३० ईसी) १.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. यासाठी ट्रॅक्टरचलित बुम स्प्रेअरचा वापर करता येतो. फवारणीची सुरुवात बांधाच्या कडेच्या ओळीपासून करावी. 

काढणी व मळणी 
पेरणीनंतर १३० ते १३५ दिवसांनी करडईची झाडे वाळल्यानंतर पीक काढणी करावी. यासाठी कंबाईन हार्वेस्टर उपयुक्त ठरतो. कंबाईन हार्वेस्टरने कमी वेळेत अधिक क्षेत्रावरील काढणी करता येते. 

बियाणाचे प्रमाण व अंतर 

 • हेक्टरी १० ते १२ किलो बियाणे 
 • वापरावे.
 • पेरणीचे अंतर ४५ बाय २० सेंमी. ठेवावे 
 • पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची १० ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. 

संपर्क- प्रीतम भुतडा (सहाय्यक  कृषी विद्यावेत्ता), ९४२१८२२०६६              
व्ही. एम. पांचाळ (कनिष्ठ संशोधन सहायक), ७९७२६३४७०८
(अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर तेलबिया पिके
उन्हाळी भुईमुगाची शास्त्रीय लागवड पद्धतखरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात जास्त...
उन्हाळी भुईमुगातील एकात्मिक कीड...भुईमूग पीक तीनही हंगामांत घेतले जाणारे पीक...
तीळ पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनतीळ पिकामध्ये तीळ + मूग (३:३), तीळ + सोयाबीन (२:१...
उन्हाळी भुईमूगाचे लागवड तंत्रउन्हाळी हंगामामध्ये भरपूर सूर्यप्रकाश आणि...
उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्रगत खरीप हंगामामध्ये काढणीवेळी झालेल्या पावसाने...
करडईवरील मावा किडीचे व्यवस्थापनसध्याच्या वातावरणामध्ये करडई पिकावर मावा किडीचा...
करडईची सुधारित लागवड करडई हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
खत, पाणी व्यवस्थापनातून वाढवा करडई...योग्य प्रकारे लागवडीसह खत व्यवस्थापन, विरळणी आणि...
सुधारित जवस वाणांची लागवड कराजवसाच्या सुधारित वाणाची निवड केल्यास...
अधिक पावसामुळे उद्भवलेल्या सोयाबीन...गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सतत व अधिक...
सोयाबीनवरील हिरव्या उंट अळीचे नियंत्रणसद्य परिस्थितीत सोयाबीन वाढीच्या अवस्थेत असून...
सोयाबीन पिकांवरील किडींचे एकात्मिक...सोयाबीन पिकात ९० ते ११० दिवसात येणाऱ्या ...
सोयाबीन पाने पिवळी पडण्याचे कारण जाणून...यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीला समाधानकारक पाऊस...
तीळ लागवड तंत्रतीळ हे भारतातील सर्वांत जुने तेलबिया पीक आहे....
सोयाबीन लागवडीतील समस्यावरील उपाययोजनासोयाबीनचे योग्य वाण निवडताना... सध्या बाजारात...
सूर्यफूल लागवड नियोजन जमीन : सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा चांगला...
गादीवाफ्यावर भुईमूग लागवड फायदेशीरजून महिन्याचा पहिल्या आठवडा ते शेवटचा आठवड्याच्या...
सोयाबीन उत्पादन वाढीचे व्यवस्थापन...सोयाबीन पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. हे...
रुंद वरंबा सरी पद्धती भुईमुगासाठी आहे...भुईमुगाची पेरणी जानेवारीच्या तिसऱ्या व चौथ्या...