जाणून घ्या बहुगुणी पळसाबद्दल..!

Sacred Tree flowers
Sacred Tree flowers

शास्त्रीय नावः ब्युटीया मोनोस्पर्मा वनस्पतीचे वर्णन  

  • हा मध्यम उंच पर्णझडी वृक्ष विंध्य, सह्याद्री, हिमालयाच्या पायथ्याच्या जंगलात आढळतो.  
  • फुले लाल, केशरी रंगाची असून पाने गळून पडल्यानंतर येतात.  
  • या वृक्षापासून मिळणाऱ्या डिंकाचा व्यापार बेंगालकिनो या नावाने चालतो.  
  • पळसाचे झाड १० ते १५ मीटरपर्यंत उंच वाढते.  
  • हिवाळ्यात पानगळ होऊन वसंतात नवीन पाने येतात. पाने येण्यापूर्वीच फुले येतात.  
  • फुले लाल, केशरी रंगाची असून गुच्छाने येतात, त्यामुळे याला वणव्याचा वृक्ष असेही म्हणतात.  
  • शेंगा चपट्या फिकट हिरव्या असून वाळल्यावर तपकिरी, राखाडी रंगाच्या होतात. शेगेंच्या टोकाशी एकच बी येते.
  • उपयोगी भाग   पाने, फुले, बिया, मुळे आणि डिंक औषधी उपयोग

  • दम्यासाठी फुले रात्री पाण्यात भिजत ठेवून, सकाळी मीठ अथवा खडीसाखर मिसळून सेवन करतात.  
  • बियांपासून मिळणारे पिवळे तेल विविध औषधात वापरले जाते.  
  • फुले व डिंकाचा काढा करून दिल्यास मोडलेले हाड लवकर सांधले जाते.  
  • पळसाच्या बियांचे चूर्ण लिंबाच्या रसात मिसळून खरुज, गजकर्ण व त्वचारोगांवर लावतात.  
  • मुत्राशयाचे आणि किडनीच्या विकारांसाठी फुले गुणकारी आहेत.
  • जमीन व हवामान  

  • लागवड मुरमाड, हलकी ते मध्यम निचऱ्याच्या जमिनीत करावी.  
  • वृक्षाच्या वाढीसाठी उष्ण व समशितोष्ण हवामान पोषक आहे.
  • लागवड 

  • या बहुवार्षिक वृक्षवर्गीय वनस्पतीची लागवड वर्षभरात कधीही करता येते.  
  • लागवड ५ बाय ५ मीटर अंतरावर करावी. लागवडीपूर्वी बियाणे २ ते ३ तास कोमट पाण्यात ठेवून नंतर पेरणी करावी. बियाणे उगविण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागतो.  
  • खत, पाणी आणि तणाचे योग्य व्यवस्थापन केल्यास झाडांची वाढ चांगली होते.
  • इतर उपयोग

  • पानाचा उपयोग द्रोण, पत्रावळी, बिडीनिर्मितीसाठी होतो.  
  • फुले रंग निर्मितीसाठी वापरली जातात.
  • संपर्कः डॉ. विक्रम जांभळे, (०२४२६) २४३२९२ औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com